इराणने युद्धविरामाची घोषणा करताच युक्रेनचे डोळे चमकले आणि रशियाच्या संदर्भात ट्रम्प यांच्याकडे एक महत्त्वपूर्ण मागणी करत ते म्हणाले, "आता पुतिन यांची पाळी आहे..." ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Ukraine demands Russia ceasefire from Trump : जागतिक राजकारणात आज एक अत्यंत ऐतिहासिक वळण पाहायला मिळाले. मध्य-पूर्वेतील रणांगणावर (US-Israel Iran War) गेल्या ३८ दिवसांपासून सुरू असलेला अमेरिका आणि इराणमधील रक्तरंजित संघर्ष अखेर तात्पुरता थांबला आहे. दोन्ही देशांनी दोन आठवड्यांच्या ‘सीझफायर’वर (युद्धविराम) स्वाक्षरी केली आहे. या काळात दोन्ही देशांचे प्रतिनिधी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये एकत्र येऊन कायमस्वरूपी करारावर चर्चा करणार आहेत. इराणमधील ही शांततेची बातमी येताच, गेल्या चार वर्षांपासून रशियाच्या (Russia Ukraine War) आक्रमणाचा सामना करणाऱ्या युक्रेनच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धविरामाचे युक्रेनने मनापासून स्वागत केले आहे. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री अँड्री त्सिबिहा यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडताना ट्रम्प यांच्या ‘डिसायसिव्हनेस’चे (निर्णायकता) कौतुक केले. त्सिबिहा म्हणाले की, “ज्याप्रमाणे अमेरिकेने इराणला चर्चेच्या टेबलावर आणले, त्याच निर्णायकतेने आता रशियालाही युद्धविराम करण्यास भाग पाडले पाहिजे.” युक्रेनचा विश्वास आहे की जर ट्रम्प यांनी रशियावर दबाव वाढवला, तर वर्षानुवर्षे चाललेले हे युद्ध देखील संपुष्टात येऊ शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Crisis: इराण संकटात पाकिस्तानची स्क्रिप्ट व्हाईट हाऊसने लिहिली? शहबाज शरीफ यांची ती ‘पोस्ट’ धक्कादायक अन् पुरावे VIRAL
अमेरिकेच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी या युद्धविरामाला अमेरिकेचा मोठा विजय म्हणून घोषित केले आहे. त्यांनी सांगितले की, ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ या लष्करी मोहिमेने आपली सर्व उद्दिष्टे वेळेच्या आधीच पूर्ण केली आहेत. ट्रम्प यांनी सुरुवातीला हे युद्ध ४ ते ६ आठवडे चालेल असा अंदाज वर्तवला होता, परंतु अमेरिकन लष्कराच्या जबरदस्त कामगिरीमुळे अवघ्या ३८ दिवसांत इराणला नमवण्यात यश आले आहे. या यशाने डोनाल्ड ट्रम्प यांची जागतिक स्तरावर ‘पीसमेकर’ (शांतता प्रस्थापित करणारा) म्हणून प्रतिमा निर्माण करण्यास मदत केली आहे.
White House claims victory, welcomes opening for ‘long-term peace’ White House Press Secretary Karoline Leavitt has lauded the ceasefire as a victory for the US that she said Trump and the American military “made happen”. From the beginning, she said, Trump had estimated the… pic.twitter.com/7xI70Lqiho — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) April 8, 2026
credit – social media and Twitter
या संपूर्ण युद्धविराम प्रक्रियेत पाकिस्तानने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दोन्ही देशांना एकत्र आणण्यासाठी पाकिस्तानने केलेली मध्यस्थी यशस्वी ठरली आहे. आता पुढचे १४ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. इस्लामाबादमध्ये होणाऱ्या चर्चेत इराण आपल्या अणुकार्यक्रमाबाबत आणि अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांबाबत काय तडजोड करतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. जर इराणचे हे मॉडेल यशस्वी झाले, तर तेच मॉडेल रशिया-युक्रेन युद्धासाठी देखील वापरले जाऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : White House Protest: इराण युद्धाला 15 दिवसांचा ‘विश्राम’! ट्रम्प यांच्या निर्णयाने वॉशिंग्टन पेटलं; व्हाईट हाऊसला आंदोलकांचा वेढा
तज्ज्ञांच्या मते, इराणमधील युद्धविराम हा जागतिक अर्थव्यवस्थेसाठी मोठा दिलासा आहे. यामुळे तेलाच्या किमतीत स्थिरता येण्याची शक्यता आहे. मात्र, युक्रेनची मागणी पाहता आता चेंडू रशियाच्या कोर्टात आहे. पुतिन या युद्धविरामाला कसा प्रतिसाद देतात आणि ट्रम्प रशियावर कशाप्रकारे दबाव आणतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. युक्रेनला आशा आहे की ट्रम्प यांची ही ‘डिसायसिव्ह’ भूमिका त्यांना न्याय मिळवून देईल.
Ans: अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांच्या (१४ दिवस) युद्धविरामावर सहमती झाली आहे.
Ans: 'ऑपरेशन एपिक फ्युरी' ही अमेरिकेने इराणविरुद्ध राबवलेली ३८ दिवसांची लष्करी मोहीम आहे, जी यशस्वी झाल्याचा दावा व्हाईट हाऊसने केला आहे.
Ans: ज्याप्रमाणे इराणला युद्धविराम करण्यास भाग पाडले, त्याचप्रमाणे रशियालाही युद्ध थांबवण्यासाठी दबाव आणण्याची मागणी युक्रेनने केली आहे.






