
इस्रायल आणि हमास यांच्यात जोरदार युद्ध सुरू असल्याने जगासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. आतापर्यंत हजारो निष्पाप नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पॅलेस्टाइनमधील ‘हमास’ ही दहशतवादी संघटना आणि इस्त्रायलमध्ये सध्या युद्ध सुरु असून जगासमोर एक नवं संकट उभं राहिलं आहे. या युद्धाचा परिणाम पुढे काय होईल याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.
बाबा वेंगाने दर्शवलेली भविष्यवाणीही चर्चेत
यादरम्यान बाबा वेंगाने दर्शवलेली एक भविष्यवाणीही चर्चेत आहे. त्यांनी मुस्लीम देशांमधील युद्धाबाबत भविष्यवाणी केली होती. बाबा वेंगाने सोव्हियत युनिअनचं विघटन, अमेरिकेतील 9/11 दहशतवादी हल्ला, आयएसआयचा उदय यासंबंधी भविष्यवाणी वर्तवली होती जी तंतोतंत खरी ठरली होती. यामुळेच जगभरात अनेकजण या भविष्यवाणीवर विश्वास ठेवतात. त्यामुळेच इस्त्रायल-हमास संघर्षादरम्यान त्यांनी केलेल्या मुस्लीम युद्धासंदर्भातील भविष्यवाणी चर्चेत आहे.
बल्गेरियातील एक फकीर महिला
बाबा वेंगाचं नाव वांगेलिया पांडेवा गुश्तारोवा होतं. ती बल्गेरियातील एक फकीर महिला होती. बाबा वेंगा यांचा जन्म 1911 साली झाला होता. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांची दृष्टी गेली. 11 ऑगस्ट 1996 रोजी वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचं निधन झाले. बाबा वेंगा यांनी मृत्यूपूर्वी अनेक भविष्यवाणी केल्या होत्या.
बाबा वेंगाच्या अंदाजानुसार 2023 मध्ये तिसरं महायुद्ध होऊ शकतं. यासोबतच त्यांनी सांगितलं होतं की, अण्वस्त्र हल्लादेखील होऊ शकतो, ज्यामुळे पृथ्वीवर विध्वंस होऊ शकतो. सध्या इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात सुरू झालेल्या युद्धामुळे लोक घाबरले आहेत. त्यामुळे हे तिसरे महायुद्ध सुरू झाले आहे का? अशी शंका लोकांना सतावत आहे.