Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mojtaba Khamenei गायब की ठार? 28 फेब्रुवारीच्या हल्ल्यानंतरचे सर्वात मोठे गूढ; इस्रायलच्या रडारवर आता खामेनींचा वारस

Mojtaba Khamenei: २८ फेब्रुवारी रोजी तेहरानमध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून अयातुल्ला अली खामेनी यांचा मुलगा मोज्तबा बचावला. सर्वोच्च नेत्याच्या संभाव्य उमेदवार म्हणून त्यांचे नाव आता बातम्यांमध्ये येत आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 08, 2026 | 01:30 PM
is mojtaba khamenei missing or killed iran supreme leader succession mystery

is mojtaba khamenei missing or killed iran supreme leader succession mystery

Follow Us
Close
Follow Us:
  • मोज्तबा खामेनी बेपत्ता
  • बंकरमधील गूढ
  • ट्रम्प यांचा विरोध

Mojtaba Khamenei missing updates 2026 : इराण आणि इस्रायल-अमेरिका(US-Israel Iran War) यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाला आता एक आठवडा पूर्ण झाला आहे. २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या महाविनाशक हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी(Ayatollah Ali Khamenei) यांचा अंत झाला, हे आता जगाने स्वीकारले आहे. मात्र, या विनाशानंतर इराणची धुरा कोणाच्या हातात जाणार, हा प्रश्न आता अधिक गडद झाला आहे. खामेनींचे पुत्र आणि त्यांच्या सत्तेचे प्रमुख दावेदार मानले जाणारे मोज्तबा खामेनी (Mojtaba Khamenei) हे गेल्या आठ दिवसांपासून पूर्णपणे बेपत्ता आहेत. त्यांच्याबद्दल इराण सरकार किंवा लष्कराने कोणतेही अधिकृत निवेदन न दिल्यामुळे, मोज्तबा जिवंत आहेत की त्यांचाही वडिलांसोबत अंत झाला आहे, याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

वडिलांच्या मृत्यूनंतर मोज्तबा यांचे ‘सायलन्स’

२८ फेब्रुवारी रोजी तेहरानमधील खामेनींच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्यात केवळ सर्वोच्च नेतेच नाही, तर त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य – ज्यात त्यांची पत्नी, सून आणि नातू यांचा समावेश आहे – मृत्युमुखी पडले. सुरुवातीला मोज्तबा या हल्ल्यातून वाचल्याचे वृत्त आले होते आणि तीन दिवसांनंतर त्यांनाच इराणचा पुढचा सर्वोच्च नेता म्हणून घोषित केले जाईल अशी शक्यता होती. मात्र, मोज्तबा यांनी अद्याप जगासमोर येऊन किंवा व्हिडिओ संदेशाद्वारे आपल्या अस्तित्वाचा पुरावा दिलेला नाही. इस्रायलने उघडपणे म्हटले आहे की, ते खामेनींच्या कोणत्याही उत्तराधिकाऱ्याला जिवंत सोडणार नाहीत, ज्यामुळे मोज्तबा यांच्या जीवाला असलेला धोका वाढला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran War: इराणच्या भूमीवर उतरणार अमेरिकन सैन्य; इराणची 43 जहाजे उद्ध्वस्त, आता अमेरिकेचे लक्ष्य थेट तेहरानचे युरेनियम साठे

५० विमानांचा हल्ला आणि भूमिगत बंकरचे रहस्य

शनिवारी पहाटे इस्रायली हवाई दलाने (IAF) पुन्हा एकदा तेहरानमधील खामेनींच्या आधीच उद्ध्वस्त झालेल्या कार्यालयावर भीषण बॉम्बवर्षाव केला. यावेळी हे लक्ष्य केवळ इमारतीचे अवशेष नव्हते, तर जमिनीखाली असलेला एक अतिशय खोल आणि सुरक्षित भूमिगत बंकर होता. ‘Ynet News’ या इस्रायली प्रसारमाध्यमाच्या मते, या बंकरमध्ये इराणच्या राजवटीतील एक अतिशय महत्त्वाची व्यक्ती दडलेली असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. या हल्ल्यात बंकर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून, यात मोज्तबा खामेनी तर नव्हते ना? अशी शंका आता व्यक्त केली जात आहे.

कोण आहेत मोज्तबा खामेनी?

५६ वर्षांचे मोज्तबा खामेनी हे केवळ अयातुल्ला यांचे पुत्र नाहीत, तर इराणच्या सत्तेतील ‘पडद्यामागचे खेळाडू’ मानले जातात.

  • प्रभाव: त्यांनी कधीही कोणतेही अधिकृत सरकारी पद भूषवले नाही, परंतु त्यांच्या वडिलांच्या अंतर्गत वर्तुळात ते सर्वात प्रभावशाली व्यक्ती होते.
  • विचारधारा: ते वडिलांप्रमाणेच कट्टर रूढीवादी असून, अंतर्गत विरोध दडपण्यात त्यांचा मोठा हात मानला जातो.
  • अमेरिकन निर्बंध: २०१९ मध्ये अमेरिकेने त्यांच्यावर निर्बंध लादले होते, कारण त्यांच्याकडे कोणतीही अधिकृत भूमिका नसली तरी ते प्रत्यक्षात सर्वोच्च नेत्याचे प्रतिनिधित्व करत होते.

डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट विरोध

इराणच्या उत्तराधिकारी निवडीवर अमेरिकेनेही कडक लक्ष ठेवले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, मोज्तबा खामेनी हे उत्तराधिकारी म्हणून त्यांची पसंती नाही. अमेरिकेला इराणमध्ये अशा नेतृत्वाची अपेक्षा आहे जे अण्वस्त्र कार्यक्रम थांबवेल आणि पाश्चात्य जगाशी संघर्ष करणार नाही. मोज्तबा यांची पार्श्वभूमी पाहता, ते अमेरिकेसाठी कधीही अनुकूल ठरणार नाहीत, हे स्पष्ट आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Gulf War 2026: सौदीचा संयम सुटला! इराणला दिला थेट युद्धाचा इशारा; ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला झाल्यास तेहरान मोजणार मोठी किंमत

इराणच्या सत्तेची अनिश्चितता

सध्या इराणचे संभाव्य पुढचे सर्वोच्च नेता कोम (Qom) येथील मदरशामध्ये शिया धर्मशास्त्र शिकवणारे एक धर्मगुरू आहेत की ते काळाच्या पडद्याआड गेले आहेत, हे कोडं अजूनही सुटलेले नाही. जर मोज्तबा यांचा मृत्यू झाला असेल, तर इराणमध्ये सत्तेसाठी मोठी यादवी (Civil War) माजण्याची शक्यता नाकारता येत नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मोज्तबा खामेनी इराणच्या सत्तेत इतके महत्त्वाचे का आहेत?

    Ans: मोज्तबा हे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे पुत्र असून, वडिलांच्या अंतर्गत वर्तुळात त्यांचा प्रचंड प्रभाव होता. ते इराणच्या धोरणांचे मुख्य रणनीतीकार मानले जात होते.

  • Que: २८ फेब्रुवारीच्या हल्ल्यात खामेनींच्या कुटुंबातील कोणाकोणाचा मृत्यू झाला?

    Ans: अहवालानुसार, या हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह त्यांची पत्नी, सून, नातू आणि इतर जवळचे नातेवाईक मारले गेले आहेत.

  • Que: इस्रायलने मोज्तबा खामेनी यांच्याबद्दल काय म्हटले आहे?

    Ans: इस्रायलने स्पष्ट केले आहे की, ते खामेनींच्या कोणत्याही उत्तराधिकाऱ्याला लक्ष्य करतील आणि इराणच्या जुन्या राजवटीचा वारस सत्तेत येऊ देणार नाहीत.

Web Title: Is mojtaba khamenei missing or killed iran supreme leader succession mystery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • Ayatollah Ali Khamenei
  • Iran-Israel War
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Hormuz Strait: समुद्रात ‘घोस्ट फ्लीट’चा थरार! अमेरिकेच्या नाकाखालून इराणने विकलं अब्जावधींचं तेल; भारत-पाकिस्तान पण सामील
1

Hormuz Strait: समुद्रात ‘घोस्ट फ्लीट’चा थरार! अमेरिकेच्या नाकाखालून इराणने विकलं अब्जावधींचं तेल; भारत-पाकिस्तान पण सामील

US Iran Conflict : ट्रम्प यांचा दुहेरी खेळ! इराणजवळ अमेरिकेची तिसरी घातक युद्धनौका तैनात, शांतता चर्चेआड मोठा गेम प्लॅन?
2

US Iran Conflict : ट्रम्प यांचा दुहेरी खेळ! इराणजवळ अमेरिकेची तिसरी घातक युद्धनौका तैनात, शांतता चर्चेआड मोठा गेम प्लॅन?

Kuwait Attack : कुवेत सीमेवर महासंग्राम! इराकी ड्रोनचा उत्तरेकडील चौक्यांवर भीषण हल्ला; फायबर-ऑप्टिक तंत्रज्ञानाने जगाला हादरवले
3

Kuwait Attack : कुवेत सीमेवर महासंग्राम! इराकी ड्रोनचा उत्तरेकडील चौक्यांवर भीषण हल्ला; फायबर-ऑप्टिक तंत्रज्ञानाने जगाला हादरवले

Iran US Talks: इराणचा ट्रम्पना ‘ठेंगा’! इस्लामाबादमध्ये अमेरिकेशी चर्चेला स्पष्ट नकार; अजूनही आखाती देशांवर युद्धाची टांगती तलवार
4

Iran US Talks: इराणचा ट्रम्पना ‘ठेंगा’! इस्लामाबादमध्ये अमेरिकेशी चर्चेला स्पष्ट नकार; अजूनही आखाती देशांवर युद्धाची टांगती तलवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.