इस्रायलचे गाझावर हल्ले सुरुच! आता इस्रायली सैन्याचा गाझातील 15 रुग्णालयांवर हल्ला केल्याचा दावा

इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात हमासने ताब्यात घेतलेल्या 240 हून अधिक ओलिसांपैकी काही जणांची सुटका केल्यास युद्धविराम देण्याचं नेत्यानाहू यांनी म्हटलं आहे

    इस्रायल-हमास युद्धाला (Israel Hamas War) मंगळवारी एक महिना पूर्ण झाला असून, यादरम्यान इस्रायली लष्कराने हमासवर अनेक हल्ले केले. हल्ल्यांच हे सत्र अद्याप पुर्णपणे थांबलेलं नाही आहे. हमास गाझा पट्टीत रुग्णालयांच्या खालून भूमिगतरित्या दहशतवादी कारवाया करत असल्याचा दावा इस्रायली सैन्याकडून केला जात आहे. त्यामुळे आता इस्रायली लष्कराने गाझातील 15 रुग्णालयांवर हल्ला (Israel attack on hospitals in gaza) करत ते नेस्तानाभूत केल्याचा दावा केला आहे.

    ‘हा युद्धविराम नाही’

    7 ऑक्टोबरला पासून इस्रायल-हमास युद्ध सुरु आहे. हे युद्ध कधी थांबणार असा प्रश्न जगभरातुन विचारल् जात असताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, इस्रायल गाझा पट्टीतून मदत पुरवठ्याच्या प्रवेशासाठी किंवा अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी लढाईत थोडा विराम देईल. तसेच, इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात हमासने ताब्यात घेतलेल्या 240 हून अधिक ओलिसांपैकी काही जणांची सुटका केल्यास युद्धविराम देऊ, असेही त्यांनी म्हण्टलं आहे. इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत सुमारे 4,100 मुलांसह 10,000 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. हा सगळा विध्वंस पाहता यूएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी तात्काळ युद्धबंदीचे आवाहन केले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता पुन्हा एकदा युद्धबंदीचे आवाहन फेटाळण्यात आले आहे.

    आतापर्यंत 4100 मुलांसह 10 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू

    गाझा आरोग्य अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की इस्रायली हल्ल्यात सुमारे 4,100 मुलांसह 10,000 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. इस्रायल आणि हमास या दोघांनीही लढाई थांबवण्याचे वाढते आवाहन नाकारले आहे. ओलिसांना आधी सोडण्यात यावे, असे इस्रायलचे म्हणणे आहे. हमासचे म्हणणे आहे की गाझावर हल्ले होत असताना ते ओलीस सोडणार नाहीत किंवा लढाई थांबवणार नाहीत.