Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahshahr Attack : इस्रायली क्षेपणास्त्रांचा इराणच्या पेट्रोकेमिकल प्रकल्पावर हल्ला; नेतान्याहू यांनी बोलावली तातडीची बैठक

Israel Petrochemical Plant Attack: इस्रायली हवाई दलाने इराणच्या प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या महशहरमध्ये मोठा हल्ला करून एका पेट्रोकेमिकल प्रकल्पाचे मोठे नुकसान केले आहे, त्यामुळे या प्रदेशातील तणाव वाढला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 08, 2026 | 02:50 PM
israel missile attack iran petrochemical plant mahshahr netanyahu emergency meeting

israel missile attack iran petrochemical plant mahshahr netanyahu emergency meeting

Follow Us
Follow Us:
  • थेट लष्करी संघर्ष
  • तेहरानसह प्रमुख शहरे हादरली
  • नेतान्याहूंची तातडीची बैठक

Israel attack Iran petrochemical plant : पश्चिम आशिया म्हणजेच मिडल इस्टमध्ये गेल्या काही महिन्यांपासून धुसपुसत असलेल्या तणावाचा अखेर स्फोट झाला आहे. एप्रिल महिन्यात आंतरराष्ट्रीय दबावानंतर दोन्ही देशांमध्ये झालेली शस्त्रसंधी आता पूर्णपणे मोडीत निघाली आहे. बरोबर दोन महिन्यांनी म्हणजेच ७ जूनच्या रात्रीपासून इराण आणि इस्रायल (US-Israel Iran War) यांच्यात थेट आणि भीषण लष्करी कारवाई सुरू झाली आहे. इस्रायली हवाई दलाने सोमवारी (८ जून २०२६) पहाटे इराणच्या आर्थिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाच्या आणि संवेदनशील औद्योगिक क्षेत्रांवर जोरदार बॉम्बहल्ला केला. या विनाशकारी हल्ल्यामुळे संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण पसरले असून जागतिक बाजारावरही याचे मोठे सावट पाहायला मिळत आहे.

इस्रायलने इराणच्या ‘या’ महत्त्वाच्या पेट्रोकेमिकल प्लांटला का लक्ष्य केले?

या युद्धाची ठिणगी रविवारी रात्री पडली, जेव्हा लेबनॉनमधील हिजबुल्लाहवरील इस्रायली हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी इराणने इस्रायलच्या दिशेने एकामागून एक अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलने अवघ्या काही तासांत आपली अत्याधुनिक लढाऊ विमाने इराणच्या आकाशात पाठवली. इस्रायली हवाई दलाने इराणच्या खुझेस्तान प्रांतातील ‘महशहर’ या शहराला मुख्य लक्ष्य केले. येथील एका विशाल पेट्रोकेमिकल प्रकल्पावर इस्रायलची क्षेपणास्त्रे थेट जाऊन आदळली. या भीषण स्फोटात प्लांटच्या मुख्य पायाभूत सुविधांचे अतोनात नुकसान झाले आहे. महशहर हे इराणचे प्रमुख ऊर्जा केंद्र मानले जाते, जेथून इराणला मोठा आर्थिक महसूल मिळतो. या भागावर हल्ला करून इस्रायलने थेट इराणच्या आर्थिक नाडीवरच पाय दिला आहे. इस्रायली लष्कराने (IDF) अधिकृतपणे या यशस्वी मोहिमेची पुष्टी केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Politics: मैत्रीमुळे की रशियाचा मुद्दा? सात वर्षांनंतर शी जिनपिंग यांच्या उत्तर कोरियाच्या दौऱ्याने बदलणार जागतिक समीकरणे

राजधानी तेहरानसह अनेक शहरे स्फोटांच्या आवाजाने हादरली

हा हल्ला केवळ एका औद्योगिक प्रकल्पापुरता मर्यादित नव्हता. इराणी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे राजधानी तेहरान, तब्रीझ आणि इस्फाहान या प्रमुख शहरांमध्ये एकापाठोपाठ एक झालेल्या प्रचंड स्फोटांमुळे नागरिक भयभीत झाले. इस्रायली संरक्षण दलाने दावा केला आहे की, त्यांच्या विमानांनी पश्चिम आणि मध्य इराणमधील इराणी लष्कराच्या रडार यंत्रणा आणि महत्त्वाच्या लष्करी तळांना अचूकपणे उद्ध्वस्त केले आहे. दुसरीकडे, इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) ने आरोप केला आहे की, इस्रायलने या हल्ल्यात अत्यंत घातक आणि आधुनिक ‘हवाई-प्रक्षेपित बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा’ (Air-Launched Ballistic Missiles) वापर केला आहे, ज्यामुळे त्यांच्या संरक्षण यंत्रणेला मोठा चकवा बसला.

The petrochemical plant in Mahshahr, southwestern Iran, remains burning hours after Israel struck it this morning. pic.twitter.com/AiczZ701M6 — Open Source Intel (@Osint613) June 8, 2026

credit – social media and Twitter

इराणचा इस्रायली हवाई तळांवर पलटवार; युद्ध पेटले!

इराणच्या आयआरजीसीने (IRGC) एक अधिकृत निवेदन जारी करून म्हटले आहे की, त्यांनी यापूर्वीच इस्रायलच्या अंतर्गत भागात घुसून ‘नेवातिम’ आणि ‘तेल नोफ’ या दोन सर्वात महत्त्वाच्या हवाई तळांवर (Air Bases) थेट मारा केला होता. इराणच्या मते, इस्रायलने आधी केलेल्या रडार साइट्सवरील हल्ल्यांचा हा केवळ एक ट्रेलर होता. तथापि, इस्रायली लष्कराने इराणचा हा दावा फेटाळून लावला असून, त्यांच्या ‘अँटी-मिसाईल डिफेन्स सिस्टीम’ने इराणकडून आलेली बहुतांश क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवले, असे सांगितले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : SUPARCO : भारताच्या प्रत्येक इंच जमिनीवर शत्रूची नजर; चीनच्या मदतीने पाकिस्तानने 16 महिन्यांत सोडले 6 Spy Satellites

बेंजामिन नेतान्याहू यांनी बोलावली आणीबाणीची हाय-लेव्हल बैठक

सध्याची परिस्थिती अत्यंत नाजूक बनली असून कोणत्याही क्षणी पूर्ण क्षमतेचे युद्ध सुरू होऊ शकते. हीच गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सोमवारी दुपारी (भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता) तेल अवीव येथे ‘सुरक्षा मंत्रिमंडळाची’ (Security Cabinet) अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत केवळ देशातील सर्वोच्च लष्करी अधिकारी, गुप्तहेर यंत्रणांचे प्रमुख आणि निवडक ज्येष्ठ मंत्री सहभागी झाले आहेत. इराणने केलेल्या हल्ल्यांचे मूल्यमापन करणे, पुढील २४ तासांत इराणवर करायच्या संभाव्य मोठ्या लष्करी कारवाईची रणनीती आखणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला तोंड देणे, हा या बैठकीचा मुख्य अजेंडा आहे. या बैठकीनंतर इस्रायल मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Israel missile attack iran petrochemical plant mahshahr netanyahu emergency meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Iran Attack
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

IranWarning :५०० मीटर अमेरेकी सैन्यापासून दूर रहा , इराणने आखातातल्या नागरिकांना केलं खुलं आवाहन
1

IranWarning :५०० मीटर अमेरेकी सैन्यापासून दूर रहा , इराणने आखातातल्या नागरिकांना केलं खुलं आवाहन

Russia-Ukraine: युक्रेनच्या ‘या’ महास्त्राने उडवली पुतिन यांची झोप; रशियाचा कोपरान् कोपरा युक्रेनच्या टप्प्यात, 10,000 किमी पल्ला
2

Russia-Ukraine: युक्रेनच्या ‘या’ महास्त्राने उडवली पुतिन यांची झोप; रशियाचा कोपरान् कोपरा युक्रेनच्या टप्प्यात, 10,000 किमी पल्ला

Hunger Index: पाकिस्तानची दुटप्पी नीती! जनता उपाशी अन् लष्करावर 10.8 अब्ज डॉलर्सचा प्रचंड खर्च; UN च्या अहवालाने केली पोलखोल
3

Hunger Index: पाकिस्तानची दुटप्पी नीती! जनता उपाशी अन् लष्करावर 10.8 अब्ज डॉलर्सचा प्रचंड खर्च; UN च्या अहवालाने केली पोलखोल

Viral Video:  ट्रॅफिक कॅमेऱ्यात कैद झाला कॉमिक्समधील रिअल स्पायडर-मॅन; अमेरिकेतील ‘या’ घटनेने केले सर्वानाच अचंबित
4

Viral Video: ट्रॅफिक कॅमेऱ्यात कैद झाला कॉमिक्समधील रिअल स्पायडर-मॅन; अमेरिकेतील ‘या’ घटनेने केले सर्वानाच अचंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.