
israel slams pakistan mediation claims iran us ceasefire khawaja asif 2026
Israel slams Pakistan mediation Iran US : आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीच्या रिंगणात स्वतःची पाठ थोपटून घेण्याची सवय असलेल्या पाकिस्तानला (Pakistan) पुन्हा एकदा जागतिक स्तरावर नामुष्कीचा सामना करावा लागला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात नुकत्याच झालेल्या दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीचे (Ceasefire) संपूर्ण श्रेय पाकिस्तान सरकार लाटण्याचा प्रयत्न करत असतानाच, इस्रायलने (Israel) त्यांच्या दाव्यातील हवा काढून घेतली आहे. भारतातील इस्रायली राजदूत रुवेन अझर यांनी पाकिस्तानच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांना “अविश्वसनीय पक्ष” असे संबोधले आहे. यामुळे शहबाज शरीफ सरकारची आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी नाचक्की झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तान मध्यस्थी करत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी ८ एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये मोठ्या अभिमानाने जाहीर केले की, पाकिस्तान आता एक ‘विश्वसनीय मध्यस्थ’ म्हणून उदयास आला आहे. मात्र, इस्रायली राजदूत रुवेन अझर यांनी ही फुशारकी खोडून काढली. ते म्हणाले, “आम्ही पाकिस्तानला विश्वासार्ह मानत नाही. अमेरिकेने कदाचित त्यांच्या स्वतःच्या काही राजकीय कारणांसाठी पाकिस्तानचा वापर केला असावा, पण याचा अर्थ पाकिस्तान एक मुत्सद्दी मध्यस्थ आहे असा होत नाही.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran US Ceasefire: ‘पाकिस्तानला पुन्हा भारतात विलीन करा!’ नोबेल मागणाऱ्या शहबाज आणि मुनीर यांची ब्रिटिश पत्रकाराने मोडली खोड
रुवेन अझर यांनी कतार आणि तुर्कस्तानचे उदाहरण देत सांगितले की, अमेरिकेने पूर्वी हमासशी चर्चा करण्यासाठी ज्याप्रमाणे समस्याग्रस्त देशांचा वापर केला, तसाच वापर सध्या पाकिस्तानचा होत आहे. त्यांच्या मते, अमेरिका केवळ संदेश पोहोचवण्यासाठी पाकिस्तानचा वापर करत आहे. “इस्रायलसाठी अमेरिकेसोबतचा समन्वय महत्त्वाचा आहे, पाकिस्तानची भूमिका नाही,” असे म्हणत त्यांनी पाकिस्तानला त्यांची खरी जागा दाखवून दिली. या विधानामुळे पाकिस्तान केवळ अमेरिकेचे एक ‘प्यादे’ म्हणून काम करत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
‘US used their services…’: Israel envoy’s BIG statement on ‘not credible’ Pakistan after Lebanon issue in Iran-US ceasefire READ: https://t.co/wIJ14ZzmnD https://t.co/wIJ14ZzmnD — WION (@WIONews) April 9, 2026
credit – social media and Twitter
दुसरीकडे, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी या शस्त्रसंधीला पाकिस्तानच्या नेतृत्वाचे मोठे यश असल्याचे म्हटले होते. “अरब देशांनी आणि आपल्या शेजारी भाऊ इराणने पाकिस्तानवर विश्वास दाखवला आहे, आता जग आमच्याकडे आदराने पाहत आहे,” असे विधान त्यांनी केले होते. पाकिस्तान आता एका ‘नव्या युगात’ प्रवेश करत असल्याचे स्वप्न त्यांनी जनतेला दाखवले. मात्र, इस्रायलच्या सडेतोड टीकेनंतर पाकिस्तानचा हा दावा केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ‘या’ अटीमूळे थांबेल युद्ध? लेबनॉनवरील इस्रायली हल्ल्यामुळे इराणचा संयम सुटला; अराघची व्हाईट हाऊसवर कडाडले
इराण आणि अमेरिका यांच्यातील हा १४ दिवसांचा युद्धविराम किती टिकेल, याबद्दल शंका आहेच, पण त्याआधीच श्रेयासाठी सुरू असलेल्या लढाईत पाकिस्तान तोंडावर पडला आहे. इस्रायलसारख्या प्रभावी देशाने उघडपणे नाराजी व्यक्त केल्यामुळे पाकिस्तानच्या तथाकथित मुत्सद्देगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारता शेजारील या देशाची अवस्था आता ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशी झाली असून, त्यांना जागतिक स्तरावर विश्वासार्हता मिळवण्यासाठी केवळ दावे करून चालणार नाही, तर तशी कृतीही करावी लागेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
Ans: इस्रायलच्या मते, पाकिस्तानची भूमिका तटस्थ नसून अमेरिका केवळ आपल्या सोयीसाठी त्यांचा वापर करत आहे, म्हणून त्यांनी पाकिस्तानच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
Ans: ख्वाजा आसिफ यांनी दावा केला की पाकिस्तानच्या मध्यस्थीमुळेच अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला असून पाकिस्तान आता जागतिक स्तरावर मोठा मध्यस्थ बनला आहे.
Ans: रुवेन अझर हे भारतातील इस्रायली राजदूत आहेत. त्यांनी पाकिस्तानला अमेरिकेचे प्यादे संबोधत त्यांच्या मध्यस्थीच्या दाव्याची खिल्ली उडवली.