फोटो सौजन्य सोशल मीडिया
जपानमध्ये १०० वर्षावरील नागरिकांची संख्या सलग ५६ व्या वर्षी वाढली आहे . १९६३ मध्ये या वयोगटातील केवळ १५३ नागरिकांची नोंद होती . त्यानंतर हा आकडा सातत्याने वाढत गेला . २०१२ मध्ये देशातील शतकवीरांची संख्या ५० हजारांवर पोहोचली होती . आता अवघ्या १४ वर्षात ती दुप्पट होऊन एक लाखांच्या पुढे गेली आहे . ही वाढ जपानमधील वाढत्या आयुर्मानाचे एक महत्वाचे चित्र दाखवते .
Global Economy : तेलाच्या वाढत्या दरांचा रुपयावर दबाव; डॉलरसमोर रुपया कमजोर
या विक्रमात महिलांचा वाटा विशेष लक्षवेधी १,०७,६७७ शतकवीरांपैकी ९४, २९८ महिला म्हणजेच तब्बल ८७.६ टक्के आहेत . पुरुषांची संख्या १३,३७९ इतकी आहे . जपानमधील दीर्घायुष्याचा आकडेवारीत महिलांचे वर्चस्व अनेक वर्षांपासून दिसून येत आहे . देशातील सर्वाधिक वयाची व्यक्तीही महिला असून क्युटो शहरातील फ़ुयो किशिमोटो या ११४ वर्षाच्या आहेत .
AI Governance : ‘धमकीच्या कथा’ थांबवा! चीनचा आंतरराष्ट्रीय सहकार्याचा आग्रह; AI विकासावरून नवा वाद
शतकवीरांची वाढ ही आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या दृष्टीने सकारात्मक बाब मानली जात असली, तरी जपानसमोर वृद्ध होत चाललेल्या लोकसंख्येचे मोठे आव्हान आहे. कमी जन्मदर आणि वाढती वृद्ध लोकसंख्या यामुळे देशाच्या सामाजिक सुरक्षा व्यवस्थेवर आणि आरोग्यसेवेवरील खर्चावर दबाव वाढत आहे. त्यामुळे १०० वर्षांवरील नागरिकांची संख्या वाढणे हा केवळ विक्रम नसून, जपानच्या भविष्यातील लोकसंख्यात्मक रचनेचेही संकेत देणारा महत्त्वाचा आकडा ठरला आहे .






