
jd vance iran talks fail us warships enter hormuz strait mines removal 2026
JD Vance leaves Pakistan Iran talks fail : जगाची ‘लाईफलाईन’ समजल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये (Strait of Hormuz) सध्या अत्यंत तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये सुरू असलेली अमेरिका-इराण शांतता चर्चा कोणत्याही निष्कर्षाशिवाय संपली आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांनी रिकाम्या हाताने पाकिस्तान सोडले असून, त्यांनी दिलेला इशारा इराणसाठी “विनाशकारी” ठरू शकतो. या राजनैतिक अपयशानंतर लगेचच अमेरिकेच्या सेंटकॉमने (CENTCOM) आपल्या दोन शक्तिशाली युद्धनौका होर्मुझच्या समुद्रात उतरवल्या आहेत, ज्यामुळे इराण आणि अमेरिका आता थेट समोरासमोर आले आहेत.
इस्लामाबादमधील प्रदीर्घ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जे. डी. व्हान्स यांचा चेहरा गंभीर होता. ते म्हणाले, “आम्ही कोणत्याही करारावर पोहोचू शकलो नाही, ही अत्यंत वाईट बातमी आहे. मला वाटते की याचा फटका अमेरिकेपेक्षा इराणलाच जास्त बसेल.” व्हान्स यांच्या या विधानामुळे अमेरिका आता राजनैतिक मार्ग सोडून लष्करी कारवाईचा मार्ग स्वीकारणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. इराणने दिलेला १०-कलमी प्रस्ताव, ज्यामध्ये होर्मुझवर पूर्ण नियंत्रणाची मागणी होती, तो अमेरिकेने साफ फेटाळून लावला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nizar Amidi: इराकच्या राजकारणात मोठे सत्तांतर! निझार अमिदी यांच्या खांद्यावर देशाची धुरा; काय असणार युद्धात इराकची भूमिका?
मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानने या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये “संयुक्त गस्ती”चा (Joint Patrolling) प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावामुळे इराण आणि अमेरिका किंवा इतर प्रादेशिक देश मिळून या जलमार्गाची सुरक्षा करतील, अशी योजना होती. मात्र, इराणने याला सहमती देण्यास नकार दिला. इस्फहान विद्यापीठातील तज्ज्ञांच्या मते, इराणसाठी होर्मुझवरील नियंत्रण ही ‘अंतिम मर्यादा’ (Red Line) आहे. इराणचे म्हणणे आहे की, या भागात अमेरिकेला ढवळाढवळ करण्याचा कोणताही अधिकार नाही आणि ते आपल्या हक्कांसाठी कोणतीही तडजोड करणार नाहीत.
USS Frank E. Peterson (DDG 121) and USS Michael Murphy (DDG 112) transited the Strait of Hormuz and operated in the Arabian Gulf as part of a broader mission to ensure the strait is fully clear of sea mines previously laid by Iran’s Islamic Revolutionary Guards Corps. https://t.co/BKHbMp7qpG — Pete Hegseth (@PeteHegseth) April 11, 2026
credit – social media and Twitter
एककीडे चर्चा अपयशी ठरत असतानाच, अमेरिकेच्या ‘यूएसएस फ्रँक ई. पीटरसन’ आणि ‘यूएसएस मायकल मर्फी’ या दोन विनाशिकांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास केला. अमेरिकेचे ॲडमिरल ब्रॅड कूपर यांनी याला “निर्णायक वळण” म्हटले आहे. इराणच्या आयआरजीसीने (IRGC) पेरलेल्या सुरुंगांमुळे हा मार्ग जहाजांसाठी ‘डेथ ट्रॅप’ बनला होता. आता अमेरिकन नौदलाने हे सुरुंग शोधून नष्ट करण्याची आणि व्यापारासाठी एक “सुरक्षित मार्ग” तयार करण्याची मोहीम हाती घेतली आहे. जरी इराणने या युद्धनौकांच्या उपस्थितीचा दावा फेटाळला असला, तरी उपग्रहावरून मिळालेल्या माहितीनुसार समुद्रात हालचाली वाढल्या आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Islamabad Talks: ‘इराणला सोडणार नाही!’ नेतान्याहूंचा महाभयंकर इशारा; शांतता चर्चेपूर्वीच इस्रायलचा हिजबुल्लाहवर हल्ला
फेब्रुवारीपासून इराणने हा मार्ग बंद केल्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. भारतासारख्या देशांसाठी, जे आपल्या ऊर्जेसाठी या मार्गावर अवलंबून आहेत, हा काळ अत्यंत कठीण आहे. अमेरिकेने आता स्वतःहून हा मार्ग उघडण्याचा विडा उचलला आहे, पण यामुळे इराण संतप्त होऊन थेट हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर होर्मुझमध्ये नवीन युद्ध सुरू झाले, तर जागतिक इंधन पुरवठा साखळी पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकते. पुढील ४८ तास या संपूर्ण प्रकरणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
Ans: व्हान्स यांनी जाहीर केले की इराणसोबतची शांतता चर्चा अयशस्वी झाली आहे आणि कोणताही करार झालेला नाही.
Ans: अमेरिकेने 'यूएसएस फ्रँक ई. पीटरसन' आणि 'यूएसएस मायकल मर्फी' या दोन विनाशिका (Destroyers) होर्मुझमध्ये पाठवल्या आहेत.
Ans: पाकिस्तानने सुचवलेला "संयुक्त गस्ती"चा (Joint Patrolling) प्रस्ताव इराणने फेटाळून लावला आहे.