दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) कुठेही राहत असला तरी त्याची नजर नेहमीच भारतावर असते. तो दुबईत असो किंवा पाकिस्तानात लपलेला असो, तो आपल्या देशात दहशत पसरवण्याच्या योजना आखतो. आता या अंडरवर्ल्ड डॉनने एक नवीन युक्ती लढवली आहे. दाऊदची देशातील सर्वात मोठ्या गुंडाशी मैत्री आहे. होय, मिळालेल्या बातमीनुसार पंजाबचा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि दाऊद इब्राहिम (Lawrence Bishnoi) यांनी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे आता अंडरवर्ल्ड आणि गुंड मिळून देशात दहशत पसरवणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने पाकिस्तानबाहेरील डी कंपनीच्या एका मोठ्या व्यक्तीची भेट घेतली आहे. खुद्द गुप्तचर संस्थेनेच हा दावा केला आहे. अनमोल हा लॉरेन्स बिश्नोईचा चुलत भाऊ असून तो बऱ्याच दिवसांपासून फरार होता. गेल्या वर्षी कॅलिफोर्नियातील एका लग्नाच्या कार्यक्रमातून त्याचा फोटो समोर आला होता. यानंतर एकदा तो केनियामध्येही दिसला होता. आता गुप्तचर यंत्रणेचा हा नवा दावा अत्यंत धोकादायक आहे.
सर्वप्रथम या मैत्रीमागे दाऊदचा हेतू काय आहे हे जाणून घ्या. लॉरेन्स बिश्नोई हा देशातील सर्वात मोठा गुंड बनला आहे. त्याच्या टोळीत 700 हून अधिक शूटर्स आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात त्याचे जाळे पसरले आहे. प्रत्येक मोठ्या गुन्ह्यामागे त्याची टोळी असते. गेल्या काही वर्षांत दाऊदचा दबदबा काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. अशा स्थितीत दाऊदला पुन्हा पाय पसरण्यासाठी कुणाची तरी गरज होती. त्यामुळे तो लॉरेन्स बिश्नोईच्या मदतीने पुन्हा एकदा देशात डी कंपनीची दहशत निर्माण करण्याच्या विचाराता आहे.
दुसरीकडे, लॉरेन्स बिश्नोईच्या दाऊदसोबतच्या मैत्रीचा फायदाही जाणून घ्या. लॉरेन्स हा बिश्नोई गँग नावाने काम करतो. सुरुवातीपासूनच आपली ताकद दाखवणे हा या टोळीचा उद्देश आहे. जेव्हा दाऊदचे नाव या टोळीशी जोडले जाते तेव्हा लॉरेन्स बिश्नोईचे नाव देशातच नाही तर देशाबाहेरही प्रसिद्ध होते. याशिवाय लॉरेन्स आणि त्याच्या टोळीला सतत नवीन शस्त्रे आणि पैशांची गरज भासत असते. लॉरेन्सला टोळी चालू ठेवण्यासाठी डी कंपनीकडून मोठा निधी मिळणार होता. याशिवाय लॉरेन्स टोळीला नवीन शस्त्रे मिळवणेही सोपे होणार आहे.
दाऊद इब्राहिम आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील मैत्रीचे महत्त्वाचे कारण बनलेल्या काही गोष्टी आहेत, पण या मैत्रीमागील दाऊदचा छुपा अजेंडा लॉरेन्स बिश्नोईलाही समजला नसावा. वर्षानुवर्षे मुंबईवर कब्जा करणाऱ्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला खरे तर लॉरेन्स बिश्नोईला आपला साथीदार बनवून आपले छुपे मनसुबे पूर्ण करायचे आहेत. त्याला देशात दहशत पसरवायची आहे. म्हणून त्याने मैत्रीचा हात पुढे केला आहे. असं दिसतय.