Hyundai ने लॉंच केले कमर्शियल मॉडेल्स (फोटो- hyundai. com )
ह्युंदाई कंपनी भारतात एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध कंपनी
कंपनीची कमर्शियल सेगमेंटमध्ये दमदार एन्ट्री
कंपनीने लॉंच केले नवीन मॉडेल्स
ह्युंदाई कंपनी भारतात एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध अशी ऑटोमोबाइल कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी सातत्याने नवनवीन मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत लॉंच करत असते. नुकतीच कंपनीने एक नवीन मॉडेल बाजारात आणले आहे. ह्युंदाई कंपनी नुकतेच कमर्शियल मोबीलिटी सेगमेंटमध्ये प्रवेश केला. कंपनीने नवीन प्राइम टॅक्सी रेंज लॉंच केली आहे. यामध्ये काय खास फीचर्स आहेत आणि त्याची किंमत काय असणार आहे , हे जाणून घेऊयात.
ह्युंदाई कंपनीने हे मॉडेल खास करून, टॅक्सी ऑपरेटर्स यांना लक्षात घेऊन तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या सेगमेंटमध्ये दोन मॉडेल्सचा समावेश असणार आहे. एक ग्रँड आय टेन Nios वर तर दुसरे मॉडेल प्राइम सेडान Aura वर आधारित आहे. प्राइम हॅचबॅकची किंमत 5.99 लाख तर सेडान मॉडेलची किंमत 6.89 लाख रुपये इतकी असणार आहे.
कसे असणार इंजिन?
कंपनीने लॉंच केलेल्या दोन्ही मॉडेल्समध्ये 1.2 लीटरचे चार सिलेंडर असलेले इंजिन असणार आहे. जे कंपनीने फिट केलेल्या सीएनजी किटसह येते. रोज जास्त अंतर धावणाऱ्या टॅक्सीसाठी असे इंजिन तयार करण्यात आले आहे. यामुळे ऑपरेटिंग खर्च कमी येतो. व्यावसायिक नियमांचे पालन करून यामध्ये वेग मर्यादेचे फीचर दिले आहे. जे गाडीला ताशी 80 किमी इतके मर्यादित करते.
नव्या अवतारात येतेय Renault Duster, 26 जानेवारीला होणार लाँच; फिचर्स आणि किंमत वाचून लगेच खरेदी कराल
फीचर्स आणि मायलेज
यामधील सेडान मॉडेल हे 28.40 इतके तर हॅचबॅक मॉडेल 27.32 किमी इतके मायलेज देते. या मॉडेल्सचा प्रती किमी खर्च हा 47 पैसे इतका येऊ शकतो. कामर्शियल मॉडेल्स असून देखील कंपनीने याच्या सेफ्टी फीचर्समध्ये आजीतबत तडजोड केलेली नाही. दोन्ही मॉडेलमध्ये 6 एअरबॅग्स, रिअर एसी व्हेंटस, रिअर पॉवर विंडो, पार्किंग सेन्सर, स्टॉप सिग्नल आणि अन्य फीचर्स देण्यात आले आहेत.
बुकिंग सुरू
देशभरात या मॉडेल्सचे बुकिंग सुरू झाले आहे. यामध्ये 5 वर्षांपर्यंत 1.80 लाख किमीपर्यन्त वॉरंटी देण्यात आली आहे. देशभरात सर्वत्र 5000 रुपयांमध्ये या मॉडेल्सचे बुकिंग सुरू झाले आहे.
रोजच्या प्रवासासाठी Best Car शोधताय? 5 लाखांच्या बजेटमध्ये एकापेक्षा एक पर्याय उपलब्ध
Renault Duster, 26 जानेवारीला होणार लाँच
कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंट हा सध्या भारतीय ऑटो मार्केटमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला सेगमेंट आहे. दरम्यान, रेनॉल्ट इंडियाने त्यांच्या आयकॉनिक SUV, Duster चा टीझर रिलीज केला आहे. ही तीच डस्टर आहे ज्याने २०१२ मध्ये भारतात कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटचा पाया घातला होता. आता, जवळजवळ एक दशकानंतर, रेनॉल्ट डस्टर एका नवीन अवतारात परत येणार आहे. कंपनीने त्याचे वर्णन “आयकॉनचे पुनरागमन” असे केले आहे आणि २६ जानेवारी २०२६ ही लाँच तारीख निश्चित केली आहे.






