
Bangladesh News
शेख हसीनाचे ढाका येथे प्रत्यार्पण करण्याची विनंती; बांगलादेशची मागणी भारत पूर्ण करणार का?
मंगळवारी (२५ नोव्हेंबर) रोजी ढाकातील कोरेल झोपडपट्टीला आग लागली होती, जी १६ तासांच्या प्रयत्नांनतर बुधवारी (२६ नोव्हेंबरला विझवण्यात आली. अग्निशमन दल आणि नागरी संरक्षण विभाने दिलेल्या माहितीनुसार, आग इतकी भीषण होती की त्याच्यावर नियंत्रण मिळवणे कठीण जात होते. अग्निशमन दलाचे संचालक लेफ्टनंट कर्नल मोहम्मद यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीत १,५०० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर आले आहे.
Korail slum in Bangladesh’s Dhaka, home to tens of thousands of residents, engulfed in flames; firefighters work alongside residents using hoses and buckets to control the fire. Reportedly 50,000 people became homeless.
Now many will try to sneak back to India. pic.twitter.com/l2nJ24DnoV — Oxomiya Jiyori 🇮🇳 (@SouleFacts) November 26, 2025
मीडिया रिपोर्टनुसार, कोरेल झोपडपट्टीची लोकसंख्या सुमारे ६०,००० आहे. ही झोपडपट्टी १६० एकरपेक्षा अधिक क्षेत्रात पसरलेली असून यामध्ये स्थलांतरित लोकांचे वास्तव करतात. या आगीमुळे रात्रभर लोक रस्त्यावर होते. हवेत प्रचंड धुर साठला होता. अनेकांची घरे जळून खाक झाली आहेत. शिवाय धुरामुळे लोकांना श्वास घेण्याचा त्रास होत आहे. य आगीमागचे कारण सध्या अस्पष्ट आहे. सखोल चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहे.
दरम्यान याच वेळी बांगलादेशात मोठा राजकीय गोंधळही सुरु आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांना बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकारणाने (ICT-BD) फाशीची शिक्षा सुनावली आहे. यामुळे अवामी लीग पक्षामध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
देशात ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहे. याच वेळी बांगलदेश अंतरिम सरकार हसीनाच्या भारतातून प्रत्यार्पणाची तयार करत आहे. हसीना यांना जुलै २०२४ ते ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर अमानवीय कारवाईचे आदेश देण्याच्या आणि मानव अधिकाराचे उल्लंघन करण्याच्या आरोपाखाली मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सध्या बांगलादेशातील परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.
Sheikh Hasina च्या फाशीवर जगभरातून विविध प्रतिक्रिया; मात्र ब्रिटन अन् अमेरिका मौन
Ans: बांगलादेशात मंगळवारी (२५ नोव्हेंबर) रोजी ढाकातील कोरेल झोपडपट्टीला आग लागली होती.
Ans: बांगलादेशात झोपडपट्टीला लागलेल्या आगीत कोणच्याही मृत्यूचे वृत्त समोर आलेले नाही. मात्र १५०० झोपड्या जळून खाक झाल्या असून हजारो लोक बेघर झाले आहेत.
Ans: कोरेल झोपडपट्टीची लोकसंख्या सुमारे ६०,००० आहे. ही झोपडपट्टी १६० एकरपेक्षा अधिक क्षेत्रात पसरलेली असून यामध्ये स्थलांतरित लोकांचे वास्तव आहे.