Sheikh Hasina च्या फाशीवर जगभरातून विविध प्रतिक्रिया; मात्र ब्रिटन अन् अमेरिका मौन (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
बांगलादेशची झाली फजिती! शेख हसीनाला मृत्युदंड तर सुनावला पण फाशीची जागाच नाही
शेख हसीनाला फाशीची शिक्षा सुनावून दोन दिवस झाले आहे, परंतु अद्यापही अमेरिका (America) आणि ब्रिटनने (Britain) या निकालावरही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया जाहीर केलेली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे अमेरिका आणि ब्रिटन मानवाधिकारांचे उल्लंघन करण्याच्या सतत विरोधात असतात. अशा वेळी त्यांच्याकडून एकही शब्द ऐकायला न मिळणे अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. शिवाय ICT व गेल्या अनेक काळापासून पारदर्शक न्याय आणि कायद्याच्या मूलभूत तत्वांचे पालन न केल्याचा आरोप आहे.
सध्या जगभरात शेख हसीनाच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने ICT च्या निर्णयावर टिका केली आहे. हसीनावरील खटला निष्पक्ष आणि न्यायिक नसल्याचे अॅम्नेस्टी इंटरनॅशनले म्हटले आहे. तर दुसरीकडे संयुक्त राष्ट्रांनी दुटप्पी निकष दिला आहे. संयुक्त राष्ट्रांनी हसीनाच्या शिक्षेवर खेद व्यक्त केला आहे, पण मानव अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. तर चीनने हसीनाच्या फाशीवर प्रतिक्रिया देताना हा त्यांचा अंतर्गत निर्णय असल्याचे म्हटले आहे. तर हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने ICT चा निर्णय नाकारला आहे.
भारताने देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारताने भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी अधिकृत निवेदन जारी केले आहे. भारताच्या निवेदनानुसार, बांगलादेशातील घडामोडींवर भारताचे बारकाईने लक्ष आहे. ICT च्या निर्णयानंतर बांगलादेशात निर्माण होणारे राजकीय वातावरण, वेगवेगळ्या गटांमधील संवाद आणि राष्ट्रातील शांतता याबाबत भारताची चिंता व्यक्त केली आहे.
अमेरिका नेहमी जगभरातील मानवी हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या घटनवांवर जोरदार आवाज उठवते. परंतु यावेळी हसीना आणि त्यांच्यावरील आरोपांवर, ICT च्या निकालावर अमेरिकेने मौन साधले आहे. २०२३ मध्ये अमेरिकेचे राजदूत पीटर हास यांनी ह्युमन राइट्सला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, अमेरिकेला बांगलादेशातील मानवी हक्क आणि लोकशाहीच्या परस्थितीबद्दल चिंता आहे. तसेच अमेरिकेने मानवी हक्कांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यास वचनबद्ध असल्याचे म्हटले आहे.
शिवाय ब्रिटनने देखील अनेक वेळा मानवी हक्क आणि मूलबूत स्वातंत्र्याचा आदर करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. २०२४ पासून ब्रिटन बांगलादेशाच्या सरकार आणि राजकीय पक्षांशी समन्वय साधून आहे. ब्रिटनच्या अनेक पंतप्रधान केयर स्टारमरसह अनेक खासदारांनी देखील बांगलादेशातील मानवी हक्कांच्या उल्लंघनावर चिंता व्यक्त केली होती. परंतु यावेळी हसीनाच्या शिक्षेवर ब्रिटनने कोणतेही भाष्य केलेले नाही. याचे कारणही सध्या अस्पष्ट आहे.
शेख हसीना नाही तर इतर नेत्यांच्याही गळ्याभोवती अडकला आहे फास; ‘या’ नेत्यांना मिळाला आहे मृत्युदंड






