Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fazlur Rehman: ‘कारगिल युद्धाचे सर्वात मोठे पाप, पाकिस्तानी लष्कराने स्वतःच्या सैनिकांचे मृतदेह’ मौलाना डिझेल यांचा खळबळजनक दावा

Fazlur Rehman: जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजल (जेयूआय-एफ) चे प्रमुख मौलाना फजलुर रहमान हे पाकिस्तानी लष्करावर सातत्याने हल्ले करत आहेत. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तरीही ते आसिम मुनीर यांच्यावर तीव्र टीका करणे सुरूच ठेवतात.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 20, 2026 | 03:29 PM
maulana fazlur rehman attacks pakistan army kargil war dead bodies colonel sher khan asim munir treason

maulana fazlur rehman attacks pakistan army kargil war dead bodies colonel sher khan asim munir treason

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानी लष्करावर थेट हल्ला
  • कारगिल युद्धाचा वादग्रस्त उलगडा
  • कर्नल शेर खान यांच्या मृतदेहाचे रहस्य

पाकिस्तानमधील राजकीय आणि लष्करी वर्तुळात सध्या एका मोठ्या वक्तव्याने भूकंप आणला आहे. ‘मौलाना डिझेल’ या नावाने कुप्रसिद्ध असलेले आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजल (JUI-F) चे सर्वेसर्वा मौलाना फजलुर रहमान यांनी पाकिस्तानी लष्कराच्या (Pakistan News) सर्वोच्च नेतृत्वावर आतापर्यंतचा सर्वात भीषण आणि थेट हल्ला चढवला आहे. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना मौलानांनी थेट कारगिल युद्धाचा दाखला देत पाकिस्तानी लष्कराने स्वतःच्याच सैनिकांचा आणि हुतात्म्यांचा अपमान केल्याचा गंभीर आरोप केला. मौलाना फजलुर रहमान यांच्यावर सध्या पाकिस्तान सरकारने देशद्रोहाचा खटला दाखल केला आहे, तरीही लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांच्या हुकूमशाही वृत्तीला न जुमानता त्यांनी हा बॉम्बगोळा टाकला आहे.

मौलाना फजलुर रहमान यांनी पाकिस्तानी लष्कराच्या कारभाराचे वाभाडे काढताना थेट भारतीय लष्कराचा आणि कारगिल युद्धाचा संदर्भ दिला. ते म्हणाले, “पाकिस्तानी लष्कराच्या नजरेत स्वतःच्या देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या शहीदांची किंमत काय आहे, हे त्यांनी आधी स्पष्ट करावे. कारगिलच्या युद्धात नेमके किती पाकिस्तानी सैनिक मारले गेले आणि लष्कराने त्यापैकी किती जणांचे मृतदेह सन्मानाने मायदेशी परत आणले, याची आकडेवारी जाहीर करण्याचे धाडस लष्करामध्ये आहे का?” लष्कराने स्वतःचे अपयश लपवण्यासाठी शेकडो सैनिकांचे मृतदेह युद्धभूमीतच सोडून दिले होते, असा खळबळजनक दावा त्यांनी केला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran War: ‘बॉम्ब पडण्याआधी शेवटचा फोन…’ अमेरिकेला इराणचा थेट सवाल; परराष्ट्र मंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ

“शहीद हिंदूंच्या हवाली केले, भारतानेच केले अंत्यसंस्कार”

पाकिस्तानी लष्कराच्या सर्वात संवेदनशील नसलेल्या ‘हुतात्म्यांचा आदर’ या मुद्द्याला हात घालत मौलानांनी पुढे म्हटले की, “तुम्ही (पाकिस्तानी लष्कराने) स्वतःच्याच सैनिकांचे मृतदेह हिंदूंच्या (भारताच्या) स्वाधीन केले. त्यानंतर भारताकडून अधिकृत निवेदने आली की, भारतीय लष्कराने या पाकिस्तानी सैनिकांवर संपूर्ण इस्लामी रितीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार केले आहेत. ही पाकिस्तानसाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. युद्धात मारल्या गेलेल्या पाकिस्तानी सैनिकांची संख्या शेकडोंमध्ये आहे, पण लष्कराने आपल्या देशातील जनतेपासून ही सत्य परिस्थिती लपवून ठेवली.”

You yourselves have dishonored, insulted, and disrespected your own martyrs more than anyone else. To hide your own crimes, you try to shield yourselves behind the martyrs. We accepted Colonel Sher Khan’s body only after India 🇮🇳 insistence. You left your own martyrs in the… pic.twitter.com/xUtrGzvbMF — برهان الدین ‏| Burhan uddin (@burhan_uddin_0) July 19, 2026

credit – social media and Twitter

मौलाना एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी कारगिल युद्धातील पाकिस्तानचे सर्वात मोठे नायक मानले गेलेले कर्नल शेर खान यांच्याबाबतही मोठा गौप्यस्फोट केला. मौलाना म्हणाले, “पाकिस्तानला जर कर्नल शेर खान यांचा मृतदेह मिळाला असेल, तर तो केवळ आणि केवळ भारताच्या आग्रहामुळे आणि विनंतीमुळे मिळाला. भारताने वारंवार आग्रह धरल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने आपल्या या अधिकाऱ्याचा मृतदेह स्वीकारला. तुम्ही स्वतःच्या हुतात्म्यांचा अपमान केला आहे आणि आता आपले संस्थात्मक अपयश अन् गुन्हे लपवण्यासाठी तुम्ही याच हुतात्म्यांच्या बलिदानामागे आश्रय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहात.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Adani Power: अदानीच्या वीज करारावरून बांगलादेशात राजकीय युद्ध; भारताला कोंडीत पकडण्याचा नवा डाव?

राजकीय प्रभाव मजबूत करण्यासाठी लष्कराचा गैरवापर

पाकिस्तान सध्या अत्यंत बिकट आर्थिक आणि सुरक्षा परिस्थितीचा सामना करत आहे. या पार्श्वभूमीवर लष्कर आपल्या घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडण्याऐवजी देशातील राजकीय व्यवस्था पूर्णपणे स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी धडपडत आहे, असा थेट आरोप मौलानांनी केला. पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणा आणि लष्करी जनरल हे देशाच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करत असून, त्यांची संपूर्ण शक्ती केवळ स्वतःचा राजकीय प्रभाव मजबूत करण्यासाठी वापरली जात आहे, असे ते म्हणाले.

मौलानांनी जनरल आसिम मुनीर यांना इशारा देताना म्हटले की, पाकिस्तान हा कायद्याने चालणारा देश आहे, जिथे प्रत्येक संस्थेचे अधिकारक्षेत्र संविधानाने स्पष्टपणे ठरवून दिले आहे. लष्कराला त्यांच्या मर्यादांची आठवण करून देणे म्हणजे सशस्त्र दलांवर किंवा देशावर झालेला हल्ला नव्हे. तसेच, पाकिस्तानात बिघडत चाललेल्या सुरक्षा व्यवस्थेवर पांघरूण घालण्यासाठी लष्कर आता सामान्य नागरिकांची जबरदस्तीने भरती करण्याचा प्रयत्न करत आहे. लष्कराच्या या आत्मघातकी डावपेचांमुळे भविष्यात देशातील जनतेमध्ये सरकार आणि सैन्याविरोधात कधीही न संपणारे गृहयुद्ध पेटू शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Maulana fazlur rehman attacks pakistan army kargil war dead bodies colonel sher khan asim munir treason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • Asim Munir
  • Disel
  • Kargil
  • Pakistan News

संबंधित बातम्या

US-Iran War : ‘युरेनियमचा एक ग्रॅमही नाही’, पाकिस्तानी लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या मध्यस्थीवर इराणचा बिनधास्त पवित्रा
1

US-Iran War : ‘युरेनियमचा एक ग्रॅमही नाही’, पाकिस्तानी लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या मध्यस्थीवर इराणचा बिनधास्त पवित्रा

World News : दहशतवादावर दुटप्पी भूमिका खपवून घेणार नाही! एससीओ बैठकीत राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा
2

World News : दहशतवादावर दुटप्पी भूमिका खपवून घेणार नाही! एससीओ बैठकीत राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

LeT Terrorist Abu Hashim: हाफिज सईदच्या जवळचा साथीदार अबू हाशिमचा लाहोरमध्ये गूढ मृत्यू; इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडला
3

LeT Terrorist Abu Hashim: हाफिज सईदच्या जवळचा साथीदार अबू हाशिमचा लाहोरमध्ये गूढ मृत्यू; इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडला

Middle East : सौदीच्या मदतीला धावला इजिप्त ;हुथींच्या हल्यांमुळे सौदी बेजार
4

Middle East : सौदीच्या मदतीला धावला इजिप्त ;हुथींच्या हल्यांमुळे सौदी बेजार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.