Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : आता फक्त भारतच जगाला वाचवू शकतो? युद्ध थांबवण्यासाठी फिनलँडची PM मोदींकडे धाव

Finland President appeal India : सध्या मध्यपूर्वेतील युद्धामुळे जागतिक स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर फिनलँडने भारताकडे संघर्ष थांबण्यासाठी शांतीदूत बनण्याचे आवाहन केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 17, 2026 | 03:31 PM
Middle East Crisis Finland Urges PM Modi to Intervene and Help End the War

Middle East Crisis Finland Urges PM Modi to Intervene and Help End the War

Follow Us
Follow Us:
  • युद्ध थांबवण्यासाठी फिनलँडचे भारताला साकडं
  • शांतीदूत म्हणून PM मोदी करणार मध्यस्थी?
  • जगाच्या नजरा खिळल्या भारतावर
India peace mediator Middle East : नवी दिल्ली : आज पश्चिम आशियातील (Middle East) संघर्षाचा १८ वा दिवस आहे. अमेरिका इराणच्या भीषण संघर्षामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. या विनााशकारी युद्धला थांबवण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरु आहेत. परंतु युद्ध थांबण्याचे नाव काही घेईना. यामुळे आता जगाच्या नजरा भारताकडे वळल्या आहे. फिनलँडने भारताकडे मध्यपूर्वेतील तणावात मध्यस्थी कारावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Middle East War : इराणने ओलांडली ‘रेड लाईन’! या चुकीमुळे आखाती देश एकवटले; ट्रम्प यांना ट्रम्पला पाठिंबा, जगभरात खळबळ

फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींनी मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण (US-Israel VS Iran) संघर्षात शांतीदूत बनण्याचे आवाहन केले आहे. भारताची संतुलित परराष्ट्र धोरणे आणि जागतिक स्तरावरील प्रतिमेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही विनंती केली आहे. भारतच जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या संकटातून बाहेर काढू शकतो असा विश्वास व्यक्त केला आहे.

फिनलँडचा भारतावर विश्वास

फिनलँढचे राष्ट्राध्यक्ष स्टॅब यांनी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या रायसीना डायलॉग २०२६’ बोलताना म्हटले की, भारता हा एकमेव असा देश आहे ज्यावर इराण आणि अमेरिका-इस्रायल दोन्ही गट पूर्णपणे विश्वास ठेवतील. त्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या इराणच्या नेत्यांशी केलेल्या चर्चेचा उल्लेख करत म्हटले की, भारताच्या सकारात्मक कूटनीतीमुळे त्यांची जहाजे संकटातून बाहेर पडली.

यामुळे भारताने सक्रियपणे मध्यस्थीची भूमिका घेतल्यास युद्ध नक्कीच थांबेल असा विश्वास व्यक्त केला आहे. अमेरिकेने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इस्रायलसोबक मिळून इराणविरोधात ऑपरेशन एपिक फ्युरी ही लष्करी मोहिम सुरु केली होती. या मोहिमेअंतर्गत इराणच्या लष्करी तळांवर, अणु केंद्रावर, मुख्यालयांवर आणि काही महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला होता.

यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei )आणि इराणचे अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी कमांडर मारले गेले होते. यामुळे इराणने आक्रमक पवित्रा घेत अमेकिका-इस्रायलवर तीव्र हल्ले सुरु केले. यामध्ये इराणने मध्यपूर्वेतील आखाती देशांमध्ये अमेरिका-इस्रायलच्या लष्करी तळांना आणि दूतावासांना लक्ष्य केले होते. इस्रायल-अमेरिका सैन्यही यावर प्रतिहल्ला करत होते.

युद्धात मोठी हानी

या हल्ल्यात आतापर्यंत २००० हून अधिक निरापराध नागरिकांचा बळी गेला आहे. यामध्ये १६५ लहान मुलींचा समावेश आहे. इराणमधील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा, वीज केंद्रे आणि विमानतळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. इस्रायल-अमेरिकेचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. धक्कादाक बाब म्हणजे इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने जागतिक बाजारात तेल आणि गॅस पुरवठा खंडित झाला आहे.

ज्याचा जागतिक अर्थव्यस्थेला मोठा फटका बसला आहे. जागतिक स्तरावर मोठे उर्जा संकट निर्माण झाले आहे. यामुळे भारतावरही परिणाम झाला आहे. युद्धाचा १८ दिवस उलटून गेला असून विनाश थांबण्याचे नाव घेत नाहीय. अशा परिस्थिती जागतिक स्तरावर भारताकडे कूटनीतिक दबावाची मागणी केली जात आहे.

Middle East War : युद्ध थांबणार? ट्रम्प यांच्या शिलेदारानं इराणला झुकवलं? ‘त्या’ गुप्त मेसेजने जगभरात खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: फिनलँडच्या राष्ट्रांध्यक्षांनी भारताकडे कोणती मागणी केली?

    Ans: फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी भारताने मध्यपूर्वेतल सुरु असलेल्या इराण अमेरिका युद्धाला थांबवण्यासाठी मध्यस्थी करुन शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली आहे.

  • Que: मध्यपूर्वेतील संघर्षात भारताची भूमिका महत्त्वाची का मान जात आहे?

    Ans: भारताची संतुलित परराष्ट्र नीती आणि इराण अमेरिकेशी असलेल्या चांगल्या संबंधामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भारत प्रभावशाली शांतीदूत ठरु शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे.

  • Que: मध्यपूर्वेतील संघर्षाचा जागतिक पातळीवर काय परिणाम होत आहे?

    Ans: मध्यपूर्वेतील संघर्षामुळे प्रचंड अस्थिरता निर्माण झाली असून जाागतिक स्तरावर तेल आणि गॅस पुरवठ्यात तुटवडा पडला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याने मोठे जागतिक उर्जा संकट निर्माण होण्याची भीती वाढली आहे.

Web Title: Middle east crisis finland urges pm modi to intervene and help end the war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • narendra modi
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.