Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East Update : युद्ध टळलं? इराणचा ‘तो’ निर्णय अन् ट्रम्पचे सूर मवाळ; पडद्यामगं नेमकं काय घडलं?

US Iran Relations : अमेरिका आणि इराणच्या संबंधात एक नवा ट्विस्ट आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानाक इराणचे आभार मानले आहेत. यामुळे जागतिक स्तरावर आश्चर्यात्मक प्रतिक्रिया उमटली आहे. नेमकं काय घडलं? ....

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 17, 2026 | 10:44 AM
trump thanks iran

trump thanks iran

Follow Us
Close
Follow Us:
  • इराणमध्ये लोकांची फाशी रद्द होताचा ट्रम्पचा युटर्न
  • अमेरिकेने मानले इराणचे आभार
  •  आखाती देशांच्या दबावाला झुकले ट्रम्प?
Trump Thanks to Iran for Halting Executions : वॉशिंग्टन : इराण (Iran) आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तणावाचे वातावरण होते. इराणमध्ये सुरु असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर हा तणाव निर्माण झाला होता. दोन्ही देशात युद्धजन्य परिस्थितीचे वातावरण होतो. परंतु आता डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणबद्दल आपली भूमिका अचानक बदलली आहे. ट्रम्प यांनी इराणचे आभारा मानले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आश्चर्यात्मक प्रतिक्रीया उमटत आहे. हे नेमकं कसं घडलं? असा प्रश्न सर्वजण विचारत आहे.

Iran US Conflict: ‘थांबा, नका करू हल्ला!’ इराणवरील अमेरिकन हल्ला रोखण्यासाठी रात्रभर या देशांमध्ये चाललं ‘राजनैतिक युद्ध’

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनुसार, इराणने ८०० हून अधिक लोकांच्या फाशीची शिक्षा रद्द केली आहे. याबद्दल ट्रम्प यांनी इराणचे आभारा मानले आहेत.  काही दिवसांपूर्वीच दोन्ही देशांतील युद्धाची परिस्थिती पाहता ट्रम्प यांचा हा यु-टर्नमुळे जागतिक राजकारणात चर्चांणा उधाण आले आहे.

इराणमधील निदर्शने

इराणमध्ये २८ डिसेंबर २०२५ पासून तीव्र निदर्शने सुरु होती. सरकारवरील वाढत्या अविश्वासामुळे, देशातील आर्थिक संकट, रियालची घसरण, महागाई याविरोधात जनतेने बंड पुकारला होता. सरकारने हे आंदोलन चिरडण्यासाठी बळाचा वापर केला, ज्यामुळे हे आंदोलन अधिक चिघळले. सरकारच्या कारवाईत २००० हून अधिकांचा बळी गेला. तसेच अनेकांना ताब्यात घेण्यात आले होते. या सर्वांना मृत्यदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र आंतरराष्ट्रीय दबावामुळे आणि अंतर्गत परिस्थिती पाहता इराणने फाशीच्या शिक्षा रद्द केल्या आहेत.

ट्रम्पने मानले इराणचे आभार

याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ट्रुथवर पोस्ट करत लिहिले आहे की, इतक्या मोठ्या संख्येने फाशीची शिक्षा रद्द होणे एक चांगली बाब आहे, सकारात्मकतेच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. इराणच्या या निर्णयाबद्दल मी त्यांचे आभार मानतो असे ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.  ट्रम्प यांचे हे मवाळ सुर पाहून अनेकजण बुचकळ्यात पडले आहेत. काही दिवसांपूर्वीच लष्करी कारवाईचे संकेत अमेरिकेडून मिळाले होते. यामुळे मध्यपूर्वेत प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

मध्यपूर्वेतील आखाती देशांचा इशारा

दरम्यान तज्ज्ञांच्या मते, मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबिया (Saudi Arabia), कतार (Quatar) या अमेरिकेच्या मित्र देशांनी इराणवर कारवाई झाल्यास युद्ध भडकण्याचा इशारा दिला होता. याच कुटनीतिक दबावापुढे अमेरिका झुकली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. परंतु यामुळे इस्रायलकडून मात्र यावर चिंता व्यक्त केली जात आहे. इस्रायलच्या मते इराणने हा निर्णय केवळ वेळ मिळवण्यासाठी घेतला आहे. यामुळे नेतन्याहूंनी इराणच्या हेंतूवर संशय व्यक्त केला आहे.


US Middle East Strategy : जगाच्या नकाशातून इराणचं नाव मिटणार? ट्रम्पचा ‘तो’ एक डाव अन् इराणचा खेळ खल्लास, काय आहे मास्टर प्लॅन?

💡

Frequently Asked Questions

  • Que: डोनाल्ड ट्रम्पने इराणचे आभार का मानले?

    Ans: इराणने शेकडो फाशीच्या शिक्षा रद्द केल्याने इराणचे आभार मानले आहेत.

  • Que: इराणने किती का फाशीच्या शिक्षा रद्द केल्या आहेत? का?

    Ans: इराणने आंतरराष्ट्रीय दबावामुळे आणि देशांतर्गत परिस्थिती पाहता ८०० फाशीच्या शिक्षा रद्द केल्या आहेत.

  • Que: इराणच्या या निर्णयाचा काय परिणाम झाला आहे?

    Ans: इराणच्या या निर्णयामुळे मध्यपूर्वेतील अमेरिका-इराणमधील युद्धजन्य परिस्थिती काही काळासाठी टळली आहे. धोका अद्यापही कायम आहे.

Web Title: Middle east update trump thanks iran halt 800 executions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 10:44 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

 Indian H-1B visa crisis: H-1B व्हिसा विलंबाचा फटका; अमेरिकेतील भारतीयांची नोकरी धोक्यात
1

 Indian H-1B visa crisis: H-1B व्हिसा विलंबाचा फटका; अमेरिकेतील भारतीयांची नोकरी धोक्यात

Nobel Prize : ‘आम्ही आमचे पदक देऊ शकतो, पण नाव नाही!’ नोबेल समितीने ट्रम्पला चांगलेच सुनावले, जगभरात बनले हसू
2

Nobel Prize : ‘आम्ही आमचे पदक देऊ शकतो, पण नाव नाही!’ नोबेल समितीने ट्रम्पला चांगलेच सुनावले, जगभरात बनले हसू

Iran US Conflict: ‘थांबा, नका करू हल्ला!’ इराणवरील अमेरिकन हल्ला रोखण्यासाठी रात्रभर या देशांमध्ये चाललं ‘राजनैतिक युद्ध’
3

Iran US Conflict: ‘थांबा, नका करू हल्ला!’ इराणवरील अमेरिकन हल्ला रोखण्यासाठी रात्रभर या देशांमध्ये चाललं ‘राजनैतिक युद्ध’

Greenland Crisis : खनिजांची भूक अन् सत्तेची हाव! वॉशिंग्टनमध्ये चर्चा फिसकटली; ग्रीनलँडच्या मालकीवरून पुन्हा ‘महाभारत’
4

Greenland Crisis : खनिजांची भूक अन् सत्तेची हाव! वॉशिंग्टनमध्ये चर्चा फिसकटली; ग्रीनलँडच्या मालकीवरून पुन्हा ‘महाभारत’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.