US Middle East Strategy : जगाच्या नकाशातून इराणचं नाव मिटणार? ट्रम्पचा 'तो' एक डाव अन् इराणचा खेळ खल्लास, काय आहे मास्टर प्लॅन?
Iran Crisis : इराण पेटलं! हवाई क्षेत्र बंद, भारतीय उड्डाणांवर थेट परिणाम, प्रवाशांसाठी मोठी अपडेट
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प इराणमध्ये देखील Venezuela Model वापरत आहेत. व्हेनेझुएलापमध्ये वापरलेल्या स्ट्रॅटेजीनुसारच ट्रम्प इराणव दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. इराणवर आर्थिक निर्बंध लादणे, तेलाच्या निर्यायातीत मर्यादा आणणे, देशातील अर्थव्यवस्था कमकुवत करणे, तसेच इराणशी व्यापार करणाऱ्या देशावर अतिरिक्त कर, याशिवाय वाहतुकीसाठीच्या सर्व वाहनांवर लक्ष ठेवत आहेत. तज्ज्ञाच्या मते याचा उद्देश थेट युद्ध करणे नसून इराणला आर्थिक आणि धोरणात्मकदृष्ट्या कमजोर करणे आहे.
यापूर्वी ट्रम्प यांनी व्हेनेझुएलामध्ये देखील अशीच धोरणे राबली होती. व्हेनेझुएलावर आर्थिक निर्बंध लादून तेथील सत्ता कमकुवत करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर व्हेनेझुएलावर हल्ला करत तेथील कंपन्या अमेरिकेच्या नियंत्रणाखाली घेतल्या होत्या. याच पद्धतीने ट्रम्प इराणवरही दबाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. संधी साधून अमेरिका इराणवर हल्ला करेल असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
इराण देखील व्हेनेझुएलाप्रमाणे जगातील तिसऱ्या क्रमांकाचा तेल उत्पादनाचा सर्वात मोठा देश आहे. येथील तेलाचा साठा मोट्या प्रमाणात चीनला विकला जातो. ट्रम्प प्रशासन मध्यपूर्वेतूनही चीनचे प्रभुत्व कमी करण्याचा हेतू ठेवत आहे. चीनला अमेरिकेने मुख्य स्पर्धक मानले असून त्याच्या उर्जा पुरवठ्यावर हल्ला करुन दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका इराणची सर्वात मोठी तेल सामुद्रधुनी होमुर्झवर लक्ष्य केंद्रित करुन आहे. इराणवरील तेल निर्बंधामुळे जागतिक स्तरावर तेलाच्या किंमतीत वाढ होईल. याचा इराणच्या अर्थव्यवस्थेवर आणि जागतिक स्तरावर मोठा परिणाम होईल. यानंतर याचा फायदा घेत इराणवर हल्ला करुन त्याच्या तेलावर नियंत्रण मिळवेल. यातूनच तेल बाजारात पुन्हा अमेरिकेला फायदा होईल आणि चीनवर दबाव निर्माण होईल. परंतु याचा भारतासह अनेक देशांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
यामागचे आणखी एक महत्त्वपूर्ण कारण म्हणजे, ट्रम्प जागतिक बाजारात डॉलरचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. डॉलरचे भाव वाढल्यास सर्व आंतरराष्ट्रीय व्यवहार हा डॉलरमध्ये होईल आणि इतर देशांच्या चलनाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या अमेरिका इराणवर हल्ला करतो का नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






