US Iran War : 'Welcome To Iran, Habibi' ; अमेरिकन कमांडर्सना इराणचं थेट आव्हानं; VIDEO शेअर करत दिला गंभीर इशारा (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने आपल्या सर्वात घातक मानल्या जाणाऱ्या 82nd Airborne Division च्या ३००० पॅराट्रूपर्सची तुकडी मध्यपुर्वेत तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या या लष्करी हालचालींमुळे इराणने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत अमेरिकेला कडक शब्दात इशारा दिला आहे.
इराणने त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये “Welcome to Iran, Habibi!” असे लिहित इशारा दिला आहे की, इराण केवळ एक देश नाही, तर योद्धाचा प्रदेश आहे. येथील योध्यांनी वर्षानुवर्षे युद्धात जमिनीवरील युद्धात लढा दिला आहे. पॅलेस्टिनी, लेबनॉनी, इराकी आणि येमेनी लढाऊ सैनिक अमेरिकन सैनिकांचे स्वागत करण्यास तयार असून हे अत्यंत घातक ठरेल असे इराणने स्पष्ट केले आहे.
To All American Soldiers! We hope you’ve been informed that #IRAN is the place where Palestinian, Lebanese, Iraqi, and Yemeni fighters have mastered ground combat at a highly professional level! You’re about to face a true master of ground warfare:
Welcome To IRAN, Habibi! pic.twitter.com/rEd0XFRlaU — Iran Military Media (@IRMilitaryMedia) March 26, 2026
US Iran War : अमेरिकेला शरण गेला इराण? ट्रम्प यांना थेट ‘सर्वोच्च नेता’ बनण्याची ऑफर, जगभरात खळबळ
Ans: इराणने अमेरिकन सैनिकांना गंभीर इशारा दिला आहे. इराणने म्हटले आहे की, युद्धभूमीवर संघर्ष झाला तर अमेरिकी सैन्याला त्यांच्या अत्यंत अनुभवी आणि प्रशिक्षित सैनिकांचा सामना करावा लागणार आहे.
Ans: ८२वी एयर बोर्न डिव्हीजन एक अत्यंत वेगवान आणि प्रभावी सैन्य तुकडी आहे. ही तुकडी १८ तासांच्या आज जगात कुठेही पोहोचून कारवाई करु शकते. या तुकडीतील सैनिक पॅराशूटच्या मदतीने थेट शत्रूच्या क्षेत्रात उतरतात.
Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यपूर्वेत सैनिकांची तैनाती त्यांच्या लष्करी तळांच्या संरक्षणासाठी आणि इराणशी संभाव्य संघर्षात प्रतिसागद देण्यासाठी पाठवली असल्याचे सांगितले जात आहे.






