Middle East War : इस्रायलचा भीषण प्रहार! तेहरानमधील स्पेस सेंटर अन् संरक्षण प्रकल्पांना केले उद्ध्वस्त, आता काय करणार इराण? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्रायलच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, इराण (Iran) या स्पेस सेंटरमध्ये लष्करी उपग्रहांचे संशोधन सुरु होता. भविष्यात याद्वारे इराण मध्यपूर्वेतील इस्रायल ठिकाणांवर पाळत ठेऊ शकतो. या उपग्रहांचा वापर इस्रायल-अमेरिकेच्या लष्करी तळांवर अचूक हल्ल्यासाठी केला जाऊ शकतो. यामुळे इस्रायलने स्पेस सेंटर नष्ट केले असून आता इराणची अंतराळ संशोधन आणि गुप्तहेर संस्था खाक झाली असल्याचा दावा केला आहे.
याच वेळी इस्रायलने इराणच्या हवाई संरक्षण प्रणाली विकसित करण्याच्या कारखान्यालाही नष्ट केले आहे. या कारावाईमुळे इराणची हवाई संरक्षण क्षमता कमकुवत झाली आहे. इस्रायलने स्पष्ट केले आहे की, इराणला कमकुवत करण्यासाठी आणि धोक्याला मुळापासून उपटून टाकण्यासाठी हा हल्ला करण्यात आला आहे.
याच वेळी इराणने आणखी एक मोठा डाव खेळला आहे. येमेनमधील हुथी बंडखोरांनी ‘बाब अल-मंडेब’ हा समुद्री मार्ग बंद करण्याची धमकी दिली आहे. हा मार्ग लाल समुद्र आणि हिंद महासागराला जोडणार एकमेवर मार्ग आहे. हा मार्ग बंद करण्यामागे इराणची ‘थ्री-स्टेज’ रणनीती असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. असे करुन इराण पाश्चात्य देशांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. हा मार्ग बंद झाल्यास जागतिक तेल बाजारात इंधन आणि गॅसच्या किमती उच्चांक गाठण्याची शक्यता आहे.
सध्या या युद्धामुळे जागतिक स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर ओमान आणि इजिप्तसारख्या देशांनी अमेरिका-इराणसमोर युद्धबंदीसाठी शांतता चर्चेचा प्रस्ताव मांडला होता. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी हा प्रस्ताव फेटाळत चर्चेची वेळ निघून गेली असल्याचे म्हटले आहे. तसेच इराणनेही त्यांच्यावरील हल्ले जोपर्यंत थांबत नाहीत तोपर्यंत कोणत्याही चर्चेच नकार दिला आहे. यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.
Ans: इस्रायलच्या संरक्षण दलाने इराणती राजधानी तेहरान स्पेस रिसर्च सेंटर आणि हवाई संरक्षण प्रणाली तयार करणाऱ्या कारखान्याला पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे.
Ans: इस्रायलने दावा केला आहे की, इराण या स्पेस सेंटरमध्ये लष्करी उपग्रह आणि देखरेख तंत्रज्ञान विकसित करत होता. ज्याचा वापर इस्रायलविरोधी हल्ल्यांसाठी होऊ शकतो. यामुळे इस्रायलने स्पेस सेंटरवर हल्ला केल्याचे म्हटले,






