न्यूजर्सीत नगरपरिषदेच्या बैठकीत कर वाढीला अनोखा निषेध; उमेदवाराने केला 'ब्रेक डान्स', Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
क्रॅनफर्ड : सोशल मीडियावर एका अनोख्या निषेधाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ न्यू जर्सीतील क्रॅनफर्डच्या टाऊन हॉल बैठकीतील आहे. येथे एका उमेदवाराने प्रॉपर्टी कर वाढीचा अनोखा निषेध केला आहे. क्रॅनफर्ड टाउनशिप कमिटीचे उमेदवार विल थिली यांनी निषेध करण्यासाठी ब्रेक डान्स केला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नगरपरिषदेच्या बैठकीदरम्यान प्रॉपर्टी कर वाढीच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी त्यांनी असे केले. या बैठकीत लोक आपली मते माडंतात, अधिकाऱ्यांना थेट प्रश्न विचारतात. मात्र थिली यांनी वेगळा मार्ग निवडला आहे. त्यांनी बैठकीत अचानक उठून ब्रेक डान्स करायला सुरुवात केली. यामुळे बैठकीतील अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले गेले. त्यांचा डान्स पाहून संपूर्ण सभागृहात हशा पिकला होता.
विल थिली हे स्थानिक स्तरावर त्यांच्या वेगळ्या आणि अतरंगी आंदोलानासाठी ओळखले जातात. विल थिली नेहमी नाट्यमय पद्धतीने नागरिकांशी संवाद साधतात. यमुळे यावेळी क्रॅनफर्डच्या लोकांसाठी त्यांचा हा ब्रेक डान्स फार धक्कादायक नव्हता, परंतु सध्या त्यांचा हा अतरंगी निषेध सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
A man has gone viral after breakdancing during a city council town hall meeting in protest of a property tax hike. Will Thilly, a candidate for the Cranford Township Committee in New Jersey, is known locally for antics at civic meetings. #breakdance #dance #townhall #NewJersey… pic.twitter.com/8FcktWz1i6
— 7NEWS Australia (@7NewsAustralia) September 4, 2025
बैठकीत उपस्थित लोकांनी त्यांचा हा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ शेअर करताच काही तासांतच ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवर व्हायरल झाला. कर वाढीचा निषेध नृत्याने असे कॅप्शन सध्या ट्रेंड करत आहे. अनेकांनी ही अतरंगी पद्धत गंभीर समस्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी उत्तम असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी याला विरोध केला आहे.
दरम्यान विल थिली यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांचा उद्देश केवळ लोकांचे लक्ष वेधणे नव्हता, तर कर वाढीचा परिणाम हा अधिक करुन सामान्यांवर होऊ शकतो हे दाखवून देणे होता. त्यांनी म्हटले की, लांब आणि नेहमीच्या भाषणांना कोणी ऐकत नाही, मात्र अशी कृतींमूळे लोकांचे लक्ष वेधता येते आणि आवज उठवण्यास मदत होते.
सध्या या प्रसंगामुळे क्रॅनफर्ड प्रॉपर्टी कराच्या चर्चेला उधाण आहे. राजकारण, आंदोलन आणि मंनोरंजन यांचे असे एकत्रिकरणे क्वचितच पाहायला मिळते. सध्या थिली निवडणूक प्रचारात ब्रेकडान्स कपुमन फायदा करुन घेतात की याचा तोटा होता हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे मानसिक संतुलन बिघडले? अमेरिकेच्या जेष्ठ पत्रकाराचे खळबळजनक विधान