कीव हादरलं! रशियाने पुन्हा युक्रेनवर डागली ड्रोन अन् क्षेपणास्त्रे; हलल्यात १ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Russia Ukraine War news in Marathi : रशिया आणि युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ सुरु आहे. जगभरातून हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. परंतु सर्व प्रयत्न अपयशी होताना दिसत आहे. पुन्हा एकदा रशियाने युक्रेनची राजधानी किववर हल्ला केला आहे. पुन्हा एकदा कीव हादरले आहे.
रशियाने रविवारी (०७ सप्टेंबर) पहाटे युक्रेनवर ८०० हून अधिक ड्रोन्स डागले आहे. तसेच डेकॉय शस्त्रांचाही हल्ला केला आहे. रशियाच्या या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. दिवसेंदिवस हे युद्ध तीव्र रुप धारण करत आहेत. रशियाने रविवारी केलेला हल्ला एवढा भयानक होता की कीवसह इतर शहरेही हादरली. यामुळे संपूर्ण युक्रेनमध्ये भीतीचे वातावरण आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे मानसिक संतुलन बिघडले? अमेरिकेच्या जेष्ठ पत्रकाराचे खळबळजनक विधान
रशियाच्या या हल्ल्यानंतर कीवमधील एका कॅबिनेट इमारतीमधून प्रचंड धूर निघतानाही दिसत आहे. यामुळे लोकांना बाहेर पडणे कठीण झाले होते.
Russia launched a major drone and missile strike on Kyiv, causing a fire at Ukraine’s Cabinet of Ministers building.
The attack hit residential areas and multiple regions across Ukraine.
About 1,000 drones attacked Ukraine overnight, which may be a record. pic.twitter.com/opopiqxUmG
— Clash Report (@clashreport) September 7, 2025
कीवच्या स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दोण जणांना हल्ल्यात मृत्यू झाला असून, यामध्ये एक वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. चिमुकल्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. कीवचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाने कीवर डागलेल्या ड्रान्स आणि डेकॉय एका निवासी इमारतीवर पडले आहे. यामध्ये १० जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
या हल्ल्याच्या एक दिवस आधीच युक्रेनने रशियाने हल्ला केला असल्याचे म्हटले होते. पण युक्रेनच्या सैनिकांनी रशियाच्या ड्रोनला हाणून पाडले असल्याचा दावा त्यांनी केली. परंतु सर्व हल्ल्यांना रोखण्यात युक्रेनला यश मिळाले नाही. रशिया सातत्याने युक्रेनवर हल्ले करत आहे. याच वेळी एक मोठी माहिती समोर आली आहे. रशियाने डोनेट्स्क प्रजेशातील मार्कोव्ह आणि मोक्याचे शहर ताब्यात घेतले असल्याचे युक्रेनने म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे युद्धबंदीचे प्रयत्न अपयशी
याच वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये प्रतिनिधींसोबतच्या बैठकीदरम्यान युद्ध थांबवण्यात अपयशी ठरल्याचे कबुल केले आहे. त्यांनी म्हटले होते की, मला वाटले हे युद्ध थांबवणे सर्वात सोपे असेल, परंतु असे नाही. पुतिन यांच्याशी चांगले संबंध असून देखील मी मदत करु शकलो नाही असे त्यांनी म्हटले आहे.
ब्रिटीश पथकाची तिहार तुरुंगाला भेट; माल्ल्या-नीरव मोदीसह फरार आरोपींना लवकरच भारतात आणणार?