'Kirana Hills' आहे सीझफायरमागचं खरं कारण; पाहा काय आहे पाकिस्तानच काळ सत्य? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Kirana Hills : भारत-पाकिस्तान संबंधांच्या नव्या वास्तवात एका धक्कादायक प्रकरणाची चर्चा जोरात सुरू आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरगोधा हवाई तळाजवळील किराणा टेकड्या (Kirana Hills) या भागात अण्वस्त्र साठवण्यासंदर्भातील गंभीर आरोप समोर येत आहेत. एवढंच नव्हे, तर या भागातून अणुकिरणोत्सर्ग होत असल्याची शंका उपस्थित झाली असून, हीच बाब सीझफायर मागील ‘खरं कारण’ असल्याची जोरदार चर्चा आहे.
या प्रकरणात महत्त्वाची बाब म्हणजे, भारत आता पाकिस्तानकडून होणाऱ्या अणु ब्लॅकमेलला झुकणार नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी आदमपूर एअरबेसवरून सैनिकांना उद्देशून सांगितलं की, “दहशतवादाचा एकच परिणाम – विनाश!” भारत आता त्याच्या अटींवर आणि वेळेनुसार प्रत्युत्तर देणार आहे.
१९८० च्या दशकापासून किराणा टेकड्या हे पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठवणुकीसाठी एक प्रमुख केंद्र मानलं जात आहे. या टेकड्यांमध्ये मजबूत खडकांमध्ये बॉम्बप्रूफ बोगदे खोदण्यात आले असून, त्यामध्ये अणुबॉम्ब लपवले जात असल्याचा दावा करण्यात येतो. गूगल अर्थवरील निरीक्षणानुसार, सरगोधा हवाई तळाच्या पश्चिमोत्तर दिशेला सुमारे ८ किमी अंतरावर ही टेकडी आहे, जिचं सर्वात उंच शिखर फक्त ३२० मीटर असलं तरी ती ‘ब्लॅक हिल’ म्हणून ओळखली जाते.
अलीकडच्या काळात, सोशल मीडियावर काही व्हिडीओ आणि रिपोर्ट्स व्हायरल झाले, ज्यामध्ये किराणा टेकड्यांच्या परिसरात अणुकिरणोत्सर्ग झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले. विशेष म्हणजे, अमेरिकेच्या ऊर्जा विभागाच्या विशेष ‘बीचक्राफ्ट B350 AMS’ विमानाने पाकिस्तानच्या हद्दीत उड्डाण केल्याचं फ्लाइट रडारवर आढळलं. हे विमान अणुकिरण गळतीच्या तपासणीत माहिर असून, यामुळे किराणा टेकड्यांतील गुपिताला नवा आयाम मिळाला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानमध्ये 4 दिवसांत महाविध्वंस, न्यूयॉर्क टाइम्सनेही मान्य केली भारताची ताकद; पाहा Satellite Images
पाकिस्तानमध्ये अफवा पसरली की भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सरगोधा परिसरातील अकरा हवाई तळांवर लक्ष्य केलं आणि किराणा टेकड्यांवरही हल्ला केला. मात्र भारत सरकारने यावर स्पष्ट आणि अधिकारिक स्पष्टीकरण दिलं की, किराणा टेकड्यांवर कुठलाही हल्ला करण्यात आलेला नाही. संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांपासून ते परराष्ट्र मंत्रालयापर्यंत याचा पुनरुच्चार करण्यात आला.
Truth: India directly struck near
Pakistan’s nuclear arsenal at Kirana Hills (Sargodha).With nuke weapons & missiles there, Pak panicked. DGMO pleaded, UK & US intervened.
We dlid not hit nuclear facility at Kirana Hills. 😎#KiranaHills #ViratKohli Adampur #radiation… pic.twitter.com/aLYXFKNeVK— Nayika .. (@nayika_nayika) May 13, 2025
credit : social media
पाकिस्तानने अणुशक्ती मिळवण्यासाठी केवळ संशोधनच नाही तर तंत्रज्ञान चोरी आणि तस्करीचाही आधार घेतल्याचा इतिहास आहे. अब्दुल कादीर खान यांनी युरोपियन कंपनी URENCO कडून ब्लूप्रिंट चोरी करून अणुतंत्रज्ञान विकसित केलं आणि नंतर ते इराण, लिबिया आणि उत्तर कोरियासारख्या देशांना विकलं, जे आंतरराष्ट्रीय कायद्यांचे गंभीर उल्लंघन ठरतं.
पंतप्रधान मोदींनी भारताची नवीन “नो टॉलरन्स” पॉलिसी स्पष्ट केली आहे. भारत आता पाकिस्तानच्या अणुशस्त्रधारी दहशतवादाला कोणतीही छूट देणार नाही. भारताचे धोरण तीन ठोस तत्त्वांवर आधारित आहे.
1. हल्ल्याचे उत्तर आमच्या अटींवर दिलं जाईल
2. आणुब्लॅकमेलला आता थारा नाही
3. दहशतवाद्यांना आणि त्यांना आश्रय देणाऱ्या सरकारांना वेगळं मानलं जाणार नाही
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताचा Kirana Hills वरील अणु केंद्रावर हल्ला? अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया, तपासणीसाठी पथक रवाना
किराणा टेकड्यांभोवतीचं गूढ आणि सोशल मीडियावरील वादळ पाकिस्तानच्या अणु धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. भारताने आता स्पष्ट भूमिका घेत पाकिस्तानला सडेतोड संदेश दिला आहे. “आम्ही सहन करणार नाही!” या पार्श्वभूमीवर, भारत-पाकिस्तान संबंध नव्या टप्प्यावर पोहोचले असून, किराणा टेकड्यांमधील ‘अंधारात लपलेली अणुवास्तवता’ लवकरच उजेडात येण्याची शक्यता आहे.