Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चोराच्या उलट्या बोंबा! जम्मू काश्मीरमधील हल्ल्यावर पाकिस्तानच्या परराष्ट्रीय मंत्रालयाने व्यक्त केल्या संवेदना

J&K Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जम्मू-काश्मीरच्या प्रमुख पर्यंटन स्थळ पहलगाम येथे 5 ते 6 दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 23, 2025 | 12:31 PM
Pahalgam Terror Attack Ministry of Foreign Affairs Pkistan statement on Pahalgam Terror Attack

Pahalgam Terror Attack Ministry of Foreign Affairs Pkistan statement on Pahalgam Terror Attack

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद: जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जम्मू-काश्मीरच्या प्रमुख पर्यंटन स्थळ पहलगाम येथे 5 ते 6 दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर डझनभर लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानच्या दहशतवादी गट लष्कर-ए-तोयबा (TRF) म्हणजेच ‘द रेझिस्टंट्स फ्रंट’ ने घेतली आहे. दरम्यान या हल्ल्यावर पाकिस्तानची प्रतिक्रिया समोर आली आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, अनंतनाग जिल्ह्यातील हल्ल्यात पर्यंटकांच्या जीवीतहानीबद्दल आम्हाला चिंता आहे. आम्ही मृतांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त करत आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.

🔊: Statement by the Spokesperson Regarding Attack in Anantnag District of the Indian Illegally Occupied Jammu and Kashmir. 🔗⬇️https://t.co/hFst99nk3d pic.twitter.com/jesywt2XBQ — Ministry of Foreign Affairs – Pakistan (@ForeignOfficePk) April 23, 2025


Pahalgam attack: सौदी दौऱ्यावरुन परतले पंतप्रधान मोदी; पहलगाम हल्ल्यावर डोभाल-जयशंकर यांच्यासोबत विमानतळावरच तातडीची चर्चा

पाकिस्तानचे हे विधान अशा वेळी करण्यात आले आहे जेव्हा या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबा म्हणजेच द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या संघटनेने घेतली आहे. ही संघटना हाफिज सईच्या नेतृत्वाखाली कार्य करते. ही पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना आहे. हाफिज सईद हा मुंबई 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमांइड आहे.

दरम्यान काही आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान विधान हे दुतोंडी असल्यासारखे वाटते. यामागचे कारण पाकिस्तानमधून दहशतवाद्यांना पाठिंबा आणि प्रशिक्षण दिले जात असल्याचा आरोप गेल्या अनेक दशकांपासून होत आहे. तज्ञांच्या मते, पाकिस्तानने जारी केलेल्या निवेदनात हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांची नावे घेतली नाही. यामुळे पाकिस्तानचे दुप्पटी धोरण उघडपणे समोर आले आहे.

हल्ल्याचा कट पाकिस्तानच्या रावेलकोटमद्ये रचण्यात आला

असेही सांगण्यात येत आहे की, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानच्या रावेलकोटमध्ये रचण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर घुसलेल्या ठिकाणाचा मार्ग आणि नकाशाची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांनी पीर जंजाल टेकड्या ओलांडत राजौरीतून चतरु आणि वाधवन मार्गे पहलगाममध्ये प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे.

पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची प्रतिक्रिया

पहलगाममधील दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानमदून पहिली प्रतिक्रिया ही पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी दिली होती. त्यांनी म्हटले होते की, या हल्ल्यामागे पाकिस्तानचा काही एक हात नाही. हा हल्ला काश्मीरमधील लोकांनीच घडवून आणला आहे आणि तेथील सरकार लोकांचे हक्क हिरावून घेत आहेत. यामुळे त्यांच्याविरोधात बंड पुकारला जात आहे.

Pahalgam attack: पहलगाम हल्ल्यानंतर ‘या’ मुस्लिम देशाने केला संताप व्यक्त; दहशतवाद्यांना दिला संदेश, म्हणाला…

Web Title: Pahalgam terror attack ministry of foreign affairs pkistan statement on pahalgam terror attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 12:27 PM

Topics:  

  • Jammu Kashmir Terror Attack
  • Pahalgam Terror Attack
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

हमासच्या अस्तित्वाला धोका? डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटींवर गाझात होणार का युद्धबंदी?
1

हमासच्या अस्तित्वाला धोका? डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटींवर गाझात होणार का युद्धबंदी?

बलुचिस्तान हादरला! क्वेटा शहरात मोठा आत्मघातकी हल्ला; १० ठार, अनेक जखमी
2

बलुचिस्तान हादरला! क्वेटा शहरात मोठा आत्मघातकी हल्ला; १० ठार, अनेक जखमी

गांधी जयंतीपूर्वी मोठी घटना! लंडनमध्ये महात्मा गांधींच्या स्मारकाची विटंबना, वातावरण तापणार
3

गांधी जयंतीपूर्वी मोठी घटना! लंडनमध्ये महात्मा गांधींच्या स्मारकाची विटंबना, वातावरण तापणार

इंडोनेशियात भीषण दुर्घटना! इस्लामिक शाळेची इमारत कोसळली अन् निरागस विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले
4

इंडोनेशियात भीषण दुर्घटना! इस्लामिक शाळेची इमारत कोसळली अन् निरागस विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.