Pahalgam attack: पहलगाम हल्ल्यानंतर 'या' मुस्लिम देशाने केला संताप व्यक्त; दहशतवाद्यांना दिला संदेश, म्हणाला... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अबू धाबी: जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतीने थैमान घातले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील प्रमुख पर्यटन स्थळ पहलगाम येथे मंगळवारी (22 एप्रिल) दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 26 पर्यंटकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहे. सध्या त्यांच्यावर स्थानिक रुग्णलयात उपचार सुरु आहेत. तसेच दहशतवाद्यांच्या या भ्याड कृत्याचा केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर तीव्र निषेध केला जात आहे. अमेरिका, इस्रायल, इराण, रशिया, श्रीलंका, सौदी अरेबिया या देशांकडून तीव्र निषेध केला जात आहे. दरम्यान मुस्लिम देश संयुक्त अरब अमिराती (UAE) ने देखील या हल्ल्याचा निषेध केला आहे.
यूएईने दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत आणि पीडितांबद्दल सहानुभूती व्यक्त करणारे निवेदन जारी केले आहे. या निवेदनात यूएईने म्हटले आहे की, यूएई या दहशतवाद्यांच्या या भ्याड कृत्याचा तीव्र निषेध करतो. आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघ करुन अस्थिरता निर्माण करण्याच्या सर्व प्रकराच्या हिसांचार आणि दहशतवादाला आमाचा विरोध आहे. तसेच यूएईच्या मंत्रालयाने भारत सरकार, जनता आणि या भयावह हल्ल्यात बळी गेलेल्या कुटुंबियांबद्दल संवेदना आणि सहानुभूती व्यक्त केली आहे. तसेच जखमींना लवकर बरे होण्याची आशा व्यक्त केली आहे.”
الإمارات تدين الهجوم الإرهابي على سياح في باهالجام في جامو وكشميرhttps://t.co/eOVbY93LBX pic.twitter.com/znDfk7Uwmw
— MoFA وزارة الخارجية (@mofauae) April 22, 2025
या हल्ल्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले होते. दरम्यान हल्ल्याची माहिती मिळताच त्यांनी जेद्दाहमधून काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेताल. त्यांनी सोशल मीडियावर या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. तसेच यासंबंधी पंतप्रधान मोदी आणि सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचीही चर्चा झाली. त्यानंतर तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी दौरा अर्ध्यावर सोडून दिल्लीत परतले.
दिल्लीत परत येताच पंतप्रधान मोदींनी, दिल्ली विमानतळवरतच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिवासोबत बैठक घेतली. सध्या दिल्लीमध्ये उच्चस्तरीय बैठका सुरु आहेत. तसेच दुसरीकडे गृहमंत्री अमित शाह जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहलगाममध्ये 5 ते 6 दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला करत मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच डझनभर लोक जखमी झाले आहे. भारताचे गृहमंत्री अमित शाह सध्या जम्मू आणि कश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. गृहमंत्र्यांनी सुरक्षा बंदोबस्त कडक करण्याचे आदेश दिले आहेत. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी कारवाई सुरु केली आहे. या हल्ल्यामुळे देशात भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे. भारतातील प्रत्येक भागांतून या हल्ल्याचा तीव्र विरोध केला जात आहे.