Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Peace Talks : शांतता चर्चेदरम्यान पाकिस्तानने सौदीत तैनात केली लढाऊ विमाने; काय आहे शाहबाज यांचा गेम प्लॅन?

US Iran Peace Talks : इस्लामाबाद येथे अमेरिका इराणमध्ये वाटाघाटी चर्चेला सुरुवात झाली आहे. याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. याच वेळी पाकिस्तानने सौदी अरेबियात लढाऊ विमानांची तैनाती केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 11, 2026 | 07:20 PM
Pakistan Deploys Fighter Jets in Saudi Arabia in between US Iran Peace Talks

Pakistan Deploys Fighter Jets in Saudi Arabia in between US Iran Peace Talks

Follow Us
Follow Us:
  • शांतता चर्चेदरम्यान पाकिस्तानचा मोठा निर्णय
  • सौदी अरेबियात तैनात केली लढाऊ विमाने
  • काय आहे शाहबाज सरकारचा गेम प्लॅन?
Pakistan Deploys Fighter Jets in Saudi Arabia : रियाध/इस्लामाबाद : अमेरिका इराण तणाव (US Iran Conflict) कमी करण्यासाठी शांतता चर्चेला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानच्या मध्यस्थीने इस्लामाबाद येथे ही चर्चा सुरु आहे. या दरम्यान एक मोठे खळबळजनक वृत्त समोर आले आहे. पाकिस्तानने सौदी अरेबियात आपली लढाऊ विमाने तैनात केली आहे. सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून याची पुष्टी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या लढाऊ विमानांची एक तुकडी किंग अब्दुलअजीज एअरबेसवर दाखल झाली आहे.

Peace Talks : अमेरिकेसाठी धोक्याची घंटा? चीन इराणला गुपचूप पुरवतोय घातक शस्त्र, शांतता बैठकीपूर्वी मोठा खुलासा

सध्या सुरु असलेल्या शांतता चर्चेदरम्यान पाकिस्तान(Pakistan)ने मोठे पाऊल उचलले असून जगभरात खळबळ उडाली आहे. यामागे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा नेमका गेम प्लॅन काय आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सौदी अरेबिया (Saudi Arabia) च्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही तैनाती पाकिस्तान आणि सौदी अरेबियातील संयुक्त धोरणात्मक संरक्षण कराराचा भाग आहे. याचा उद्देश दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमधील समन्वय वाढवणे, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरक्षा आणि स्थिरता मजबूत करणे आणि लष्करी सज्जतेची पातळी वाढवणे आहे.

अमेरिका इराण वादात पाकिस्तानची मध्यस्थी

तज्ज्ञांच्या मते, या तैनाती मागे केवळ सौदी-पाक करार नसून भू-राजकीय परिस्थिती देखील आहे. इराण अमेरिका यांच्यातील तणालेले संबंध कमी करण्यासाठी सध्या पाकिस्तान मध्यस्थीची भूमिका बजावत आहे. ही चर्चा यशस्वी झाल्यास संपूर्ण जगाला दिलासा मिळणार आहे. परंतु चर्चा असफल ठरल्यास मध्यपूर्वेतील आखाती देशांमध्ये धोका वाढण्याची शक्यता आहे.

काही काळापूर्वीच इराणने सौदीतील अमेरिकन तळांवर हल्ले केले होते. शिवाय इराणने त्यांच्या अटी मान्य न झाल्यास पुन्हा आक्रमक होण्याचे संकेत दिले आहे. अशी परिस्थिती सौदी अरेबियाशी केलेल्या करारानुसार, एका देशावरील हल्ला हा दुसऱ्या देशावर हल्ला मानला जाईल. यामुळे सौदीवर संभाव्य इराणी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरच पाकिस्तानने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

इस्लामाबादमध्ये चर्चेला सुरुवात

सध्या इस्लामाबाद येथे चर्चेला सुरुवात झाली आहे. या शांतता चर्चेवर संपूर्ण जगाचे आणि आखाती देशांचे भवितव्य टिकून आहे. तसेच पाकिस्तान अमेरिका इराणमध्ये शांतता घडवून आणण्यास यशस्वी होणार का याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Middle East Tension : इराणमधून भारतीयांची ‘घरवापसी’! युद्धाच्या खाईतून मच्छिमारांची सुटका; ‘या’ देशाचे मानले जयशंकर यांनी आभार

Web Title: Pakistan deploys fighter jets in saudi arabia in between us iran peace talks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Pakistan News
  • Saudi Arabia
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

Air India Saudi: सौदी अरेबियाला जाणारी सर्व उड्डाणे रद्द, एअर इंडिया, इंडिगोने जारी केली सूचना, प्रवाशांना रिफंड मिळणार का?
1

Air India Saudi: सौदी अरेबियाला जाणारी सर्व उड्डाणे रद्द, एअर इंडिया, इंडिगोने जारी केली सूचना, प्रवाशांना रिफंड मिळणार का?

Asian Cup 2027 : आम्ही घाबरणार नाही, हल्ल्यांनंतरही आशियाई फुटबॉल स्पर्धेची जोरदार तयारी; आयोजकांची माहिती
2

Asian Cup 2027 : आम्ही घाबरणार नाही, हल्ल्यांनंतरही आशियाई फुटबॉल स्पर्धेची जोरदार तयारी; आयोजकांची माहिती

Pakistan : देश पेटला अन् पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचे विचित्र चाळे; मर्लिन मनरोच्या फोटोवरील ख्वाजा आसिफची ‘ती’ कमेंट VIRAL
3

Pakistan : देश पेटला अन् पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचे विचित्र चाळे; मर्लिन मनरोच्या फोटोवरील ख्वाजा आसिफची ‘ती’ कमेंट VIRAL

Saudi Arabia मध्ये हल्ल्यानंतर फीफाने फीफा- ई -फायनल्स केले स्थगित, रियाधच्या इंटरनॅशनल विमानतळावर झाला होता मोठा हल्ला
4

Saudi Arabia मध्ये हल्ल्यानंतर फीफाने फीफा- ई -फायनल्स केले स्थगित, रियाधच्या इंटरनॅशनल विमानतळावर झाला होता मोठा हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.