
Pakistan Viral Vidoe
अमेरिका आणि इराण यांच्या शांतता (US Iran Peace Talks) प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान मध्यस्थीची भूमिका बजावत आहे. मात्र असे करुन पाकिस्तानने स्वत:साठीच मोठी अडचण निर्माण केली आहे. सोशल मीडियावर एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामुळे जागतिक राजकारणा मोठी खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या सुरक्षा आणि निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस पाकिस्तानी शिष्टमंडळाची भेट घेताना दिसत आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे या अधिकृत शिष्टमंडळात एका गुन्हेगाराचा चेहरा पाहायला मिळत आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून आंतरराष्ट्रीय स्तरावर फसवणुकीचे आरोप असलेला उमर फारुक जहूर असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे मोठा वाद पेटला आहे.
उमर जहूर हा पाकिस्तानी व्यापारी असून दुबईत स्थित आहे. त्याच्यावर नॉर्वेत बँक फसवणुकीचे आरोप आहेत. आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणा त्याचा अनेक दिवासांपासून शोध घेत आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगार म्हणून त्याची ओळख असून पाकिस्तानी प्रतिनिधींसोबकत फारुक कसा सामील झाला असा प्रश्न उपस्थिक केला जात आहे.
धक्कादायक म्हणजे आसपास पाकिस्तानी अधिकारी आणि सुरक्षा रक्षकही दिसत आहेत. हा दावा खरा असला तर ही केवळ प्रशासकीय चूक नाही तर पाकिस्तनच्या डिप्लोमॅटिक प्रोटोकॉलचे अपयश असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर लोकांनी पाकिस्तानवर टीकेचा भडीमार केला आहे. गुन्हेगारांना सरकारी पाहुणचार देणार देश अशी टीका केली जात आहे.
सध्या या व्हिडिओची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे आणि फारुक खरच तिथे उपस्थित होता का हे अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतु यामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा नाच्चकी झाली आहे.
Umar Farooq Zahoor, who is wanted in Norway in a $6 million bank fraud case, is part of a Pakistani negotiation team… pic.twitter.com/1DtD6ii4DV — THE UNKNOWN MAN (@Theunk5555) April 20, 2026
Ans: व्हायरल व्हिडिओत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस पाकिस्तानच्या शिष्टमंडळाची भेट घेत आहेत. या भेटीत अधिकारी आणि गार्ड्ससोबत उमर फारुप जहूर हा सुट-बूट घालू उभा असलेला वेंस यांच्याशी चर्चा करताना दिसत आहे.
Ans: उमर फारुक जहूर हा दुबईस्थित पाकिस्तानी उद्योजक आहे. त्याच्यावर नॉर्वेत अनेक बँकाची फसवणुकीचा आरोप असून आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणा शोध घेत आहे. पाकिस्तानच्या शिष्टमंडळात त्याचा समावेश असल्याने मोठा वाद पेटला आहे
Ans: सध्या या व्हायरल व्हिडिओची अधिकृत पुष्टी झालेली नाही. हा व्हिडिओ नेमका कधीता आहे. तसेच उमर खरच उपस्थित होता का हे प्रश्न अनुत्तरित आहेत.