‘बडीबडी बाते वडापाव खाते’, पाकिस्तान पाहतेय 25 अब्ज डॉलरचे स्वप्नं; UAE चा बदला घेण्यासाठी ग्वादरची दुबईशी तुलना? (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
ग्वादर बंदर हे चीनच्या ६० अब्ज डॉवर्सच्या चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) चा मुख्य आणि महत्त्वाचा भाग आहे. हे बंदर पाकिस्तान(Pakistan) साठी भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. हे बंदर इराणच्या सीमेपासून केवळ ८७ किलोमीटर अतंरावर आहे. जगातील सर्वा महत्त्वाचा तेल व्यापारासाठीचा होर्मुझ मार्गच्या तोंडाशी हे बंदर आहे. या बंदरावरुन अफगाणिस्तान (Afghanistan)आणि मध्य आशियाई देशांना समुद्रातपर्यंत लवकर पोहचण्यासाठी मदत मिळू शकते.
रिपोर्टनुसार, पाकिस्तान ग्वादरच्या माध्यमातून दुबईतील प्रसिद्ध जेबेल अली बंदराला पर्यायी बंदर बनवण्याचा प्रयत्न करत आहे. ग्वादर पोर्ट अथॉरिटीचे अधयक्ष नूर-उल-हक यांच्या मते, इराण (Iran) आणि मध्य आशियाई देशांशी असलेला संपर्कामुळे ग्वादर इतर प्रादेशिक बंदराच्या तुलनेत आघाडीवर जाईल. गेल्या वर्षभरात या बंदरावरुन जहाजांची ये-जा वाढली आहे. यामुळे लवकरच या पोर्टवरुन व्यावसायिक वाहतूकही चालू होईल असा विश्वास पाकिस्तानने व्यक्त केला आहे.
Ans: पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, ग्वादर बंदर पूर्ण क्षमतेने कार्यन्वित झाले तर सुमारे २५ अब्ज डॉलर्सची भर त्यांच्या अर्थव्यवस्थेत पडेल.
Ans: भौगोलिकदृष्ट्या ग्वादर हे होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आहे, ज्यामुळे त्याला महत्त्व प्राप्त होते. परंतु दुबईच्या जेबेल अली बंदराशी याची तुलना होऊ शकत नाही. जेबेल अली हे जगातील सर्वात मोठे मानवनिर्मित बंदर असून येथे अत्यंत प्रगतं तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा आहेत. ज्या पाकिस्तानच्या ग्वादर बंदरावर नाही.






