US Iran Peace Talks : इराण झुकला? अमेरिकेसोबतच्या शांतता चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये हालचालींना वेग, जगभरात खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Donald Trump यांचा ‘LOCKED IN MODE’ ॲक्टिव्ह! आता फक्त विजयच; व्हाईट हाऊसच्या एका पोस्टने जगात खळबळ
द न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ या चर्चेचे नेतृत्व करणार आहेत. तर दुसरीकडे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष या चर्चेत स्वत: उपस्थित असतील तर ही चर्चा होईल असे इराणने म्हटले आहे. दोन्ही देशांमधील अटींचा खेळ, एकमेकांवरील अविश्वास उच्चस्तरीय वचनबद्धतेची गरज अधोरेखित करतो असे तज्ज्ञांचे मत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या आठवड्यात पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे दोन्ही देशांची शिष्टमंडळे दाखल होण्याची शक्यता बळावली जात आहे. याच दरम्यान अमेरिकेचे अनेक अधिकारी यापूर्वीच इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, वाटाघाटी चर्चेसाठी जेरेड कुशनर आणि स्टीव्ह वीटकॉफ देखील सहभागी होण्याची शक्यता आहे. यावरुन अमेरिका शांतता चर्चेला गांभीर्याने घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र जेडी वेंस यांची उपस्थितीची अट इराणने ठेवली आहे. तरच ही चर्चा पुढे जाऊ शकते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सातत्याने ही चर्चा होणार असल्याचे संकेत दिले होते. पंरतु त्यांनी युद्धबंदीचा प्रस्ताव यशस्वी झाला नाही, तर परिस्थिती गंभीर होईल असा इशाराही दिला होता. दरम्यान सुरुवातील इराणकडून चर्चेसाठी सहमती मिळत नव्हती. पण, अमेरिकेने इराणने अणु कार्यक्रम पूर्णपणे बंद करावा याएकाच मुख्य अटीवर सतत लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे इराणने आपल्या भूमिकेत नरमाई घेतली असावी असे तज्ज्ञांचे मत आहे.
सध्या दोन्ही देशांकडून या चर्चेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. होर्मुझमध्ये इराणच्या कार्गो शिप नाकेंबदीमुळे मोठा वाद पेटला आहे. यामुळे जोपर्यंत अमेरिका इराणी जहाजांची लूटमार थांबवत नाही, तोपर्यंत होर्मुझ (Hormuz) खुला करणार नाही असे संकेत इराणने दिले आहे. सध्या होर्मझवरील तणावामुळे चर्चेबाबत अनिश्चितता कायम आहे. दुसरीकडे इस्लामाबदमध्ये चर्चेसाठी हालचाली सुरु असल्याचे संकेत मिळाले आहे. ही चर्चा यशस्वी झाल्यास मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरेल.
Iran-US War : ‘इराणसोबतचा नवीन करार जगात शांतता प्रस्थापित करेल’; डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Ans: अमेरिकन माध्यांमाच्या दाव्यानुसार, या आठवड्यात अमेरिका इराणमध्ये पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे चर्चा होणार असून यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे.
Ans: द न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, या आठवड्यात होणाऱ्या शांतता चर्चेत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांवी स्वत: उपस्थित रहावे अशी अट इराणने ठेवली आहे.
Ans: ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, इराणने आपला अण्वस्त्र बनवण्याचा कार्यक्रम पूर्णपणे रद्द करावा.






