पाकिस्तान सतत आर्थिक संकटातून जात (Pakistan Economic Crisis) असून, त्यामुळे वाढत्या महागाईने (inflation) लोक हैराण झाले आहेत. दिवसेंदिवस पाकिस्तामधील परिस्थिती बिघडत चालली आहे. येथील रुग्णालये अत्यावश्यक औषधांच्या तुटवड्याने त्रस्त आहेत. डॉलरच्या कमतरतेमुळे बहुतांश औषध उत्पादकांना आयात केलेले साहित्य मिळत नाही. पाकिस्तान फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (पीपीएमए) ने म्हटले आहे की जर आयातीवरील बंदी आणखी चार ते पाच आठवडे कायम राहिली तर देशाला सर्वात वाईट वैद्यकीय संकटाचा सामना करावा लागेल.