
Benazir Bhutto and Imran Khan and Fatima Jinnah
पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिराची अवस्था पाहून येईल डोळ्यात पाणी; हजारो देवस्थानं झाली खंडर
लष्कराने इम्रान खान यांना देशासाठी धोका ठरवले आहे. पण लष्कराने एखाद्या नेत्याला देशासाठी धोकादायक ठरवण्याची ही पहिलीच वेळ नाही. पाकिस्तानमध्ये सत्ता संघर्ष हा देशाच्या स्थापनेपासूनच सुरु आहे. लोकशाही वादी नेते आणि लष्करामध्ये अनेक दशकांपासून वर्चस्वाची लढाई सुरु आहे. यापूर्वी पाकिस्तानच्या लष्कराने फातिमा जिन्ना, बेनजीर भुट्टो आणि सध्याच्या घडीला इम्रान खान यांना राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायाक ठरवले आहे. या नेत्यांच्या लोप्रियतेते जेव्हा जेव्हा वाढ झाली, तेव्हा लष्कराने त्यांच्याविरोधात खेळी खेळली आहे. अशा लोकशाही वादी नेत्यांना देशद्रोही घोषित करणे ही पाकिस्तानमध्ये एक परंपराच बनली आहे.
फातिमा जिन्ना यांच्या काळात लष्करप्रमुख अय्यूब खानने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याविरोधात जनतेमध्ये विष पेरण्याचा प्रयत्न केला होता.राष्ट्रीपती निवडणुकांमध्ये त्यांना देशद्रोही म्हटले गेले होते. फातिमा यांच्या चारित्र्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. तसेच त्यांना पाकिस्तानला तोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यावेळी पाकिस्तानचे संस्थापक मुहम्मद अली जिन्ना यांनी अय्यूब खानच्या राजकीय हेतूंबद्दल चिंता व्यक्त केली होती.
असेच काहीसे जुल्फिकार अली भुट्टो यांच्या सोबतही घडले होते. पाकिस्तानच्या संविधानाची रचना भुट्टो यांनी केली होती. पंरतु त्यांना लष्कराने देशद्रोही ठरवले आणि फाशीची शिक्षा दिली. त्यांची मुलगी बेनजीर भुट्टो यांना देखील लष्कराने राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरवत होते. बेनजिर यांच्या कारकिर्दीतही सत्तेसाठी लष्कर आणि सरकारमध्ये संघर्ष कायम राहिला.
सध्या देखील पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या बाबतीत हीच परिस्थिती आहे. इम्रान खान २०२३ पासून तुरुंगात कैद आहेत. त्यांच्यावर तुरुंगहात अत्याचाराच्या, एकाकीकरणाच्या आणि भेटींवर निर्बंधाच्या तक्रारी आल्या आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या मते, खान यांना जाणूनबुजून त्रास दिला जात आहे. त्यांची लोकप्रियता कमी करण्यासाठी मुनीरने त्यांच्यावर देशद्रोहाचा लेबल लावले आहे. सध्या परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.
Ans: पाकिस्तानच्या लष्कराने फातिमा जिन्ना, बेनजिर भुट्टो आणि इम्रान खान या नेत्यांना देशासाठी धोकादायक म्हटले आहे,
Ans: सध्या पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्यावर देशासाठी धोक्याचा ठप्पा लावण्यात आला आहे. यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आणि कुटुंबीयांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. सरकार आणि लष्कराविरोधात मोर्चे सुरु आहे.
Ans: फातिमा यांच्या चारित्र्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. तसेच त्यांनी पाकिस्तानला तोडण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप फातिमा यांच्यावर करण्यात आला होता.