पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिराची अवस्था पाहून येईल डोळ्यात पाणी; हजारो देवस्थानं झाली खंडर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पाकिस्तानात हिंदू मंदिरांची संख्या किती? संख्या ऐकून मिळेल आश्चर्याचा झटका
पाकिस्तानच्या संसदीय समितीच्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये १८०० पैकी केवळ ३७ हिंदू धार्मिक स्थळे कार्यरत आहेत. यामागचे कारण म्हणजे येथे हिंदू आणि शीख लोकंसख्या कमी आहे. यामुळे देखभालीची कमतरता पडत आहे. शिवाय ज्या संस्थांवर याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, त्यांच्यांकडून मंदिरांची, गुरुद्वांरांची योग्य ती काळजी घेतली जात नाही. यामुळे आजच्या परिस्थिती पाकिस्तानमध्ये अनेक मंदिरे खंडर बनली आहे.
नुकतेच पाकिस्तानच्या संसदेने ३ डिसेंबर २०२५ रोजी इस्लामाबाद येथे अल्पसंख्याक कॉकसची बैठकी घेतली होती. या बैठकीत हिंदू आणि शिख मंदिरांच्या आणि इतर अल्पसंख्यांकाच्या हक्कांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर अल्पंसख्यांक समितीने पाकिस्तान सरकारा सर्व अल्पसंख्यांक धार्मिक स्थळांची पुनर्संचयित करण्याची मागणी केली आहे. तसेच अल्पसंख्यांकाच्या शिक्षणात आणि रोजगारासाठी चांगल्या सुरविधांची मागणी देखील करण्यात आली आहे.
सध्या पाकिस्तानमध्ये एकूण १,२८५ हिंदू मंदिरे आहेत, तर ५३२ शीख गुरुद्वारा आहेत. यातील केवळ ३७ मंदिरे आणि गुरुद्वारे कार्यरत आहेत. १९४७ च्या फाळणीनंतर हिंदू आणि शीख समुदायांनी पाकिस्तान सोडून भारतात आले. तेव्हापासूनच तेथील अनेक मंदिरांची दयनीय अवस्था आहे. सध्या मंदिरांच्या देखभालीची जबाबदारी सराकरी संस्था इक्वेटोरियल ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डकडे (ETPB) आहे. मात्र या संस्थेकडून जबाबदारी योग्यरित्या पार पाडली जात नाही. यामुळे पाकिस्तानमध्ये शीख समुदायाचे नेते डॉ. रमेश कुमार वांकवानी यांनी या संस्थेवर टीका केली आहे.






