फोटो सौजन्य AI
‘द न्यूज पाकिस्तान‘मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, २०२५ पर्यंत पाकिस्तानच्या लोकसंख्येपैकी जवळपास दोन-तृतीयांश लोकांना किमान आरोग्यदायी आहार घेणे परवडणार नाही. दक्षिण आशियामध्ये पौष्टिक पदार्थांच्या सर्वात कमी किमती असूनही, आरोग्यदायी अन्नाच्या उपलब्धतेच्या बाबतीत पाकिस्तान या प्रदेशातील सर्वात वाईट देशांपैकी एक आहे.
याचा परिणाम लोकांच्या आहारावर स्पष्ट दिसू लागला आहे . दोन ताज्या सर्वेक्षणांदरम्यान १४ प्रमुख अन्नपदार्थांपैकी १३ पदार्थांचा दरडोई वापर घटला. तांदळाचा दरडोई मासिक वापर सुमारे १९ टक्क्यांनी, डाळींचा २६ टक्क्यांनी आणि दुधाचा १० टक्क्यांनी घटला. मटण, बीफ आणि चिकन यांचा एकत्रित वापर १८ टक्क्यांनी घटला.
जागतिक भूकबळी च्या टक्केवारी मध्ये यावर्षी घसरण झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत भूकबळी कमी झाले आहेत . ही चांगली बाब असल्याचे जाणकार म्हणतात . आलेल्या रिपोर्ट नुसार २०२५ मध्ये ७. ८ टक्के लोकं भूकबळीचे शिकार झाले . आणि हा आकडा २०२४ मध्ये ८.१ टक्के आणि २०२२ मध्ये ८.६ टक्के होता . पाकिस्तानमध्ये खाद्य वस्तूंची महागाई २०२३ च्या महागाई पेक्षा कमी असली तरी जेवणाची दुरावस्था ही आजही चिंतेची आणि इशाऱ्याची बाब आहे .
Iran-US : अमेरिकेने अटी मान्य केल्याशिवाय होर्मुझ खुला नाही; IRGC चा स्पष्ट इशारा
तसेच वे विश्लेषकांच्या मते महागाईचे स्पीड संथ झाले आहे . परंतु मोठ्या महागाई मुळे लोकांच्या इन्कम मध्ये खालची पातळी गाठत आहे . तर घरातल्या इन्कम दरात १३ टक्क्यांची पातळी खाली गेली आहे . हा सर्वात कमी दार नोंदवला गेला आहे . आणि गरिबी दार २१.९ टक्के यावरून वाढून २८.९ टक्के झाला आहे . याला देशातील असुरक्षित वातावरण , बेरोजगारी , आणि आर्थिक स्थिरता नसणे अशासारखे अनेक प्रश्न पाकिस्तानसमोर उभे आहेत . आणि याच्या अंदाजानुसार २.५ करोड अतिरिक्त लोक गरिबीच्या रेषेच्या खाली समाविष्ट झाले आहेत .






