इस्लामाबाद : एकीकडे पाकिस्तानवरच भयंकर आर्थिक संकट (Pakistan Financial Crisis) संपण्याची काही चिन्हं दिसत नाही आहे तर दुसरीकडे तहरीक-ए-तालिबानने (TTP) पाकिस्तानच्या नाकी नऊ आणले आहे. पेशावरमध्ये सोमवारी झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Peshawar Terrorists’ Attack) ही संघटना शांत बसणार नसल्याचे सिद्ध झाले आहे. या हल्यात 100 लोकांचा मृत्यू झाला त्यामुळे पाकिस्तानमध्ये दहशतवादाचा शक्तिशाली प्रभाव असल्याच सिद्ध झालं आहे.
[read_also content=”सिंधु कराराचा वाद टोकाला! पाकिस्तानच्या सांगण्यावरून जागतिक बँकेकडून लवाद न्यायालयाची स्थापना, भारताचा विरोध https://www.navarashtra.com/india/establishment-of-arbitration-court-by-world-bank-at-the-behest-of-pakistan-opposed-by-india-366898.html”]
अफगाणिस्तानात मारल्या गेलेल्या आपल्या दहशतवाद्याच्या मृत्यूचा बदला म्हणून टीटीपीने हा हल्ला केला. खैबर पख्तूनख्वा प्रांतात टीटीपी खूप शक्तिशाली आहे. देशाचा हा भाग दहशतवादी तालिबानच्या ताब्यात आहे. देशाचे लष्करही या ठिकाणी हतबल होते.
मशिदीवरील दहशतवादी हल्ल्याच्या दोन आठवड्यांपूर्वी टीटीपीच्या अतिरेक्यांनी पेशावरच्या बाहेरील पोलीस चौक्यांना लक्ष्य केले होते. हे दहशतवादी आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होते आणि त्यांच्याकडे नाइट व्हिजन चष्मा होता. या दहशतवाद्यांनी स्नायपरसह अधिकाऱ्यांवर हल्ला केला आणि पोलिस स्टेशनवर ग्रेनेड फेकले.
रझा खान या पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या म्हणण्यानुसार, देशातील परिस्थिती अत्यंत भयावह आहे आणि सुरक्षा यंत्रणांना लक्ष्य केले जात आहे. अफगाण तालिबानपासून फुटून निघालेली टीटीपी ही संघटना तालिबानसारखीच कट्टरतावादी इस्लामिक विचारसरणी मानते. गेल्या 15 वर्षांपासून ते पाकिस्तानमध्ये रक्तरंजित बंडखोरी करत आहे. ही संघटना देशात इस्लामिक शरिया कायदा लागू करण्यासाठी लढा देत आहे.
2014 आणि 2017 मधील लष्करी कारवायांमुळे प्रचंड रक्तपात झाला आणि TTP कमकुवत झाला. मात्र गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून या संघटनेने पुन्हा ताकद एकवटली आहे. पाकिस्तानी लष्कराला जनरल असीम मुनीर यांच्या रूपाने नवा लष्करप्रमुख मिळताच टीटीपीने युद्धविराम संपुष्टात आणण्याचा आदेश जारी केला. या संघटनेने आपल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या लष्कर किंवा पोलिस दलावर हल्ला होऊ शकतो तेथे हल्ले करण्याचे आदेश दिले आहेत. तेव्हापासून खैबर पख्तूनख्वामधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. हा प्रांत अफगाणिस्तानला लागून आहे.
टीटीपीने नोव्हेंबरपासून आतापर्यंत अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत. डिसेंबरमध्ये झालेल्या हल्ल्यात तालिबानने दहशतवादविरोधी युनिटलाच ताब्यात घेतले. २४ तास चाललेल्या या कारवाईत डझनहून अधिक लष्कर आणि पोलिस अधिकारी मारले गेले. खैबर पख्तुनख्वामध्ये तालिबानच्या खुराफती करण्याला अफगाणिस्तानच जबाबदार आहे. पर्वतांनी वेढलेला वझिरीस्तान अफगाणिस्तानच्या अगदी जवळ आहे. हे ठिकाण शस्त्रांनी सज्ज असलेल्या टीटीपी दहशतवाद्यांचा बालेकिल्ला आहे. खैबरमधील अनेक भागातील पोलीस चौक्या टीटीपीच्या दहशतवाद्यांच्या ताब्यात आहेत. लष्कराच्या अनेक चौक्यांवर रात्रीच्या वेळी दहशतवादी हजर असतात. स्थानिक नागरिकांनाच भीतीने जगावे लागत आहे असे नाही, तर आता लष्कर आणि पोलिसांचेही धाबे दणाणले आहेत.