पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रायलच्या दौऱ्यावर (फोटो- ट्विटर)
पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रायलच्या दौऱ्यावर
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केले जोरदार स्वागत
अनेक मोठे करार होण्याची शक्यता
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय इस्त्रायलच्या दौऱ्यावर आहेत. आज तेल अवीव एअरपोर्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाल्यावर त्यांचे जोरदार स्वगत करण्यात आले. पंतप्रधान मोदी एअरपोर्टवर दाखल होताच इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवत पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. एअरपोर्टवर दोन्ही देशांचे राष्ट्रगीताची धून वाजवली गेली.
इस्त्रायलच्या एका वृत्तपत्राच्या पानावर पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी हिंदीमध्ये ‘नमस्ते’ आणि हिब्रूमध्ये ‘शालोम’ लिहून एक ऐतिहासिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. शालोमचा अर्थ शांतता असा होतो. जो आजच्या जागतिक परिस्थितीमध्ये भारताच्या भूमिकेचे वर्णन करतो.
Landed in Israel. I am extremely honoured to be received by Prime Minister Netanyahu and Mrs. Netanyahu at the airport. I look forward to engaging in bilateral discussions and fruitful outcomes that strengthen the India-Israel friendship.@netanyahu pic.twitter.com/FYGDv0M3Xy — Narendra Modi (@narendramodi) February 25, 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 9 वर्षांनी इस्त्रायलच्या दौऱ्यावर आले आहेत. आज ते इस्त्रायलच्या संसदेला संबोधित करणार आहेत. असा गौरव होणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान असणार आहेत. दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान भारत आणि इस्रायलमध्ये संरक्षण क्षेत्राशी संबंधित काही करार होण्याची शक्यता आहे.
अत्याधुनिक ड्रोन, अॅंटी बॅलेस्टीक मिसाईल्स याबाबत भारत-इस्त्रायल मोठा करार करू शकतात. हा करार झाल्यास चीन आणि आणि पाकिस्तानला लागून असलेली भारताची सीमा अधिक संरक्षित होण्यास मदत होणार आहे. इस्त्रायलमध्ये झालेल्या स्वागताबबत पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट देखील केली आहे.
71 हजार कोटींच्या कराराकडे लागले लक्ष
पंतप्रधान मोदींचा दौरा केवळ राजकीय आणि राजनैतिक मैलाचा दगड ठरणार नाही तर एक सखोल संरक्षण भागीदारी देखील करेल. शिवाय, भारतातील इस्रायलचे राजदूत, रुवेन अझर यांनी असेही म्हटले आहे की, इस्रायल भारताला असे गुप्त तंत्रज्ञान प्रदान करण्यास तयार आहे जे यापूर्वी कधीही प्रदान केले गेले नाही. भारत आणि इस्रायल दहशतवादाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी संयुक्तपणे नवीन पद्धती विकसित करतील. दोन्ही देश क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालींवर देखील एकत्र काम करतील.
71 हजार कोटींच्या कराराकडे लागले लक्ष
मोदींच्या भेटीदरम्यान अंदाजे 71 हजार कोटी रुपयांचे संरक्षण करार होऊ शकतात. यामध्ये स्पाइस १००० प्रिसिजन बॉम्ब, हवेतून जमिनीवर मारा करणारे रॅम्पेज क्षेपणास्त्रे आणि एअर लोरा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे यांचा समावेश आहे. शिवाय, कमी पल्ल्याच्या धोक्यांना निष्प्रभ करण्यासाठी प्रगत लेसर शस्त्रांवरील तांत्रिक सहकार्यावर देखील चर्चा होऊ शकते.






