Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान मोदी पोहोचले फ्रान्सला; अध्यक्ष मॅक्रॉनसोबत AI शिखर परिषदेत होणार सहभागी

पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सची राजधानी पॅरिसला पोहोचले आहेत. या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यादरम्यान ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत AI शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 11, 2025 | 10:39 AM
PM Modi reaches France will participate in AI Summit with President Macron

PM Modi reaches France will participate in AI Summit with President Macron

Follow Us
Close
Follow Us:

पॅरिस: पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सची राजधानी पॅरिसला पोहोचले आहेत. सध्या ते दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर असून पॅरिसमधून याची सुरुवात झाली आहे. या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत ‘AI ॲक्शन समिट’चे सह-संस्थापक सहभागी होणार आहेत. या शिखर परिषदेचा उद्देश आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रातील धोरणे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक मजबूत करणे हा आहे. या समिटमध्ये जगभरातील तंत्रज्ञान तज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय नेते आणि मोठ्या तांत्रिक कंपन्यांचे CEO सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

ही परिषद केवळ भारत-फ्रान्स AI सहकार्यास चालना देणार नाही, तर इतर देशांसाठी देखील एक आदर्श निर्माण करेल. या चर्चेत AI तंत्रज्ञानाच्या सुरक्षित आणि जबाबदार वापरावर भर दिला जाणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- सॅम अल्टमन कसे झाले ट्रम्पचे ‘खास’? एका फोनवर मिळवला मोठा प्रोजेक्ट, वाचा संपूर्ण प्रकरण

Je viens d’atterrir à Paris. Je suis impatient d’y participer à différents événements dédiés à des secteurs d’avenir comme l’IA, la technologie et l’innovation. pic.twitter.com/hrR6xJu7o8 — Narendra Modi (@narendramodi) February 10, 2025

मोदी-मॅक्रॉन द्विपक्षीय चर्चेचे मुख्य मुद्दे

या दौऱ्यादरम्यान भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणि 2047 च्या होरायझन रोडमॅप च्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार, संरक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, उर्जा आणि इतर अनेक क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यावर चर्चा होईल. या बैठकीत संरक्षण उत्पादन, हरित ऊर्जा आणि नवीन तंत्रज्ञान विकास यावरही चर्चा होणार आहे.

मार्सेली शहराचा दौरा आणि ऐतिहासिक उपक्रम

याशिवाय, या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या ऐतिहासिक मार्सेली शहरालाही भेट देणार आहेत. या ठिकाणी भारताच्या वाणिज्य धूतावासाचे उद्घाटन करण्यात येणार असून, याद्वारे भारतीय समुदाय आणि व्यवसायाच्या क्षेत्राच्या वाढीवर भर देण्यात येणार आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय थर्मोन्यूक्लियर प्रायोगिक रिअॅक्टर (ITER) प्रकल्पाला नरेंद्र मोदी भेट देणार आहेत.

शेवटी, पंतप्रधान मोदी मार्सेली येथील मजार्ग युद्ध स्मारकाला भेट देऊन, पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. त्यांच्या या दौर्‍यामुळे भारत-फ्रान्स संबंध अधिक दृढ होतील आणि तांत्रिक तसेच धोरणात्मक सहकार्याला नवी दिशा मिळेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- बांगलादेशच्या ‘या’ कृत्याने संतापला चीन; अध्यक्ष शी जिनपिंग यांनी मोहम्मद युनूस यांना पाठवले पत्र, म्हणाले…

Web Title: Pm modi reaches france will participate in ai summit with president macron

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2025 | 10:39 AM

Topics:  

  • France
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
2

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
3

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी
4

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.