Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

17 वर्षानंतर भारतीय पंतप्रधानांचा नायजेरिया दौरा; होणार द्विपक्षीय संबंध वाढवण्यावर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नायजेरिला भेट देणार आहेत. ही भेट गेल्या 17 वर्षातमध्ये भारतीय पंतप्रधानांची पहिलीच भेट असेल. याआधी 2007ला तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी नायजेरियाला भेट दिली होती.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 16, 2024 | 12:06 PM
पंतप्रधान मोदींची नायजेरियाला भेट; राष्ट्रपती टिनबू यांच्याशी करणार द्विपक्षीय संबंध वाढवण्यावर चर्चा

पंतप्रधान मोदींची नायजेरियाला भेट; राष्ट्रपती टिनबू यांच्याशी करणार द्विपक्षीय संबंध वाढवण्यावर चर्चा

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नायजेरिला भेट देणार आहेत. ही भेट गेल्या 17 वर्षातमध्ये भारतीय पंतप्रधानांची पहिलीच भेट असेल. याआधी 2007ला तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी नायजेरियाला भेट दिली होती. त्यानंतर आज नरेंद्र मोदी यांची ही भेट नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष अहमद टिनुबू यांच्या निमंत्रणावरून होत आहे. या भेटीदरम्यान नरेंद्र मोदी राष्ट्राध्यक्ष टिनुबू यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करणार आहेत. या भेटीत ऊर्जा, व्यापार, माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्माण आणि खाणकाम यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वृद्धिंगत करण्यावर भर दिला जाईल. यानंतर पंतप्रधान भारतीय समुदायाला अबुजामध्ये संबोधित करतील.

नायजेरिया भारतासाठी महत्त्वाचे का आहे?

नायजेरिया तेल आणि वायूच्या प्रचंड साठ्यांमुळे भारतासाठी महत्त्वाचा देश आहे. नायजेरिया भारताच्या ऊर्जेच्या गरजा भागवतो. ऊर्जा आणि खनिजस्रोतांसोबत भारताच्या आफ्रिकेतील गुंतवणुकीसाठी नायजेरिया एक प्रमुख केंद्र आहे. नायजेरियाच्या स्वातंत्र्यानंतर भारताने आफ्रिकन देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्थन केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांतील राजनैतिक संबंध सुरू स्वातंत्र्यापूर्वीच दृढ झाले होते. 1962 मध्ये पंडित जवाहरलाला यांच्या भेटीनंतर भारत-नायजेरिया संबंधाचा पाया अधिक दृढ रचला गेला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- न्यूझीलंडच्या संसदेत हाना रावहितींचा जोरदार विरोध: पारंपारिक हाका नृत्याद्वारे स्वदेशी हक्कांचे समर्थन

भारताचे नायजेरियासोबतचे संबंध 1958 पासून सुरू झाले आहेत. 1960 मध्ये नायजेरियाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे संबंध अधिक दृढ झाले. नायजेरिया ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज (OIC) आणि ऑर्गनायझेशन ऑफ ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC) चा सदस्य असल्याने जागतिक स्तरावरही महत्त्वाचा आहे. भारत आणि नायजेरिया हे दोन्ही लोकशाही देश असल्याने दोघांमध्ये सहकार्याचे ऐतिहासिक संबंध आहेत.

नायजेरियाची लोकसंख्या 23 कोटी असून, 2050 पर्यंत लोकसंख्येत वाढ होऊन 40 कोटी होईल, असा अंदाज आहे. हा देश आर्थिक प्रगती करीत असून, उत्तरेकडील मुस्लिमबहुल भागात गरीबी अधिक आहे, तर ख्रिश्चनबहुल दक्षिण आणि पूर्व भाग तुलनेने अधिक समृद्ध आहेत. या सामाजिक आणि धार्मिक विविधतेमुळे देशात काही वेळा वाद निर्माण होतात.

17 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांचा दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज नायजेरियाला भेट देणार आहेत. ही भेट 17 वर्षांतील भारतीय पंतप्रधानांची पहिली भेट असेल. राष्ट्राध्यक्ष बोला अहमद टिनुबू यांच्या निमंत्रणावरून ही भेट होत आहे. यादरम्यान दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी आणखी वाढविण्यावर चर्चा होणार आहे. भारत आणि नायजेरियामध्ये 2007 पासून धोरणात्मक भागीदारी आहे. यामध्ये ऊर्जा, आर्थिक आणि संरक्षण सहकार्याचा समावेश आहे. या भेटीदरम्यान पंतप्रधान भारतीय समुदायालाही संबोधित करतील. यामुळे दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होतील. ही भेट भारताच्या जागतिक धोरणांसाठी महत्त्वाची आहे.

जागतिक घडामोडी संबंधाच्या बातम्या- बांगलादेशात प्रेसचे स्वातंत्र्य धोक्यात; 167 पत्रकारांची मान्यता रद्द, पत्रकारांमध्ये तीव्र आक्रोष

Web Title: Pm modis visit to nigeria strenthning bilateral relations after 17 years nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2024 | 12:06 PM

Topics:  

  • narendra modi
  • world

संबंधित बातम्या

‘मोदींशी चांगले संबंध…’ ; ट्रम्प यांचे PM मोदींबाबत मोठे विधान, भारतावरील टॅरिफ कमी होणार?
1

‘मोदींशी चांगले संबंध…’ ; ट्रम्प यांचे PM मोदींबाबत मोठे विधान, भारतावरील टॅरिफ कमी होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.