
pok protest rawalakot altaf hussain slams pakistan army asim munir balochistan india nuclear submarine
पाकिस्तान सध्या इतिहासातील सर्वात मोठ्या अंतर्गत बंडाचा आणि विनाशाचा सामना करत आहे. एकीकडे देश आर्थिक गर्तेत सापडला असताना, दुसरीकडे पाकिस्तानच्या (Pakistan News) वेगवेगळ्या प्रांतांमधून स्वातंत्र्याचा आणि हक्कांसाठीचा आवाज तीव्र झाला आहे. या अत्यंत गंभीर परिस्थितीवर लंडनमध्ये निर्वासित असलेले प्रसिद्ध मुहाजिर नेते आणि मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट (MQM) चे संस्थापक अल्ताफ हुसेन यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. अल्ताफ हुसेन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (आधीचे ट्विटर) एक व्हिडिओ पोस्ट करत पाकिस्तानच्या ढोंगी परराष्ट्र धोरणाचा आणि अंतर्गत अपयशाचा बुरखा टराटरा फाडला आहे.
अल्ताफ हुसेन यांनी पाकिस्तानी लष्कराला थेट आव्हान दिले आहे. ते म्हणाले की, “आज पाकव्याप्त काश्मीर (PoJK) आणि गिलगिट-बाल्टिस्तानमधील जनता आपल्या मूलभूत हक्कांसाठी रस्त्यावर उतरली आहे. बलुचिस्तानमध्ये माता आजही आपल्या बेपत्ता आणि मारल्या गेलेल्या मुलांच्या मृतदेहांसोबत धरणे आंदोलनाला बसल्या आहेत, त्यांच्यावर अंत्यसंस्कारही झालेले नाहीत. खैबर पख्तुनख्वा (KPK) मधील सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. या संपूर्ण भीषण गृहयुद्धाच्या परिस्थितीत भर म्हणजे, भारताने आपल्या अण्वस्त्रधारी पाणबुड्या (Nuclear Submarines) तैनात करून त्या पाकिस्तानच्या दिशेने पाठवल्या आहेत. पाकिस्तान अंतर्गत समस्यांनी जळत आहे, पण इथले राज्यकर्ते आणि लष्करप्रमुख मात्र अमेरिका, इराण आणि सौदी अरेबियाच्या परराष्ट्र धोरणांवर गप्पा मारण्यात व्यस्त आहेत.“
अल्ताफ हुसेन यांचे हे खळबळजनक वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) रावलकोट येथे पाकिस्तान सरकारविरुद्ध अभूतपूर्व आणि ऐतिहासिक बंड पुकारण्यात आले आहे. काल झालेल्या प्रचंड आंदोलनात १ लाखांहून अधिक स्थानिक काश्मिरी जनता रस्त्यावर उतरली होती. या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या स्थानिक नेत्यांनी पाकिस्तानच्या अवैध ताब्याविरोधात थेट युद्ध पुकारले आहे. त्यांनी उघडपणे घोषणा केली आहे की, “पाकव्याप्त काश्मीर आता कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानचा गुलाम राहणार नाही.” काश्मिरी जनतेवर पाकिस्तानी रेंजर्स आणि पोलिसांकडून गोळीबार केला जात असून, हक्कांऐवजी त्यांना मृतदेह दिले जात असल्याचा गंभीर आरोपही हुसेन यांनी केला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ahmadinejad Mossad Agent: शतकातील सर्वात मोठा गद्दार? इराणला अण्वस्त्रांचे स्वप्न दाखवणारा नेताच निघाला इस्रायलचा हस्तक
या आंदोलनामुळे पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली आहे. गेल्या अनेक दशकांपासून काश्मीरच्या नावावर आंतरराष्ट्रीय स्तरावर निधी गोळा करणारे आणि राजकारण करणारे पाकिस्तानी लष्कर आता स्वतःच्याच देशात उघडे पडले आहे. जेव्हा जेव्हा हे लोक आपले हक्क मागतात, तेव्हा पाकिस्तानी लष्कर त्यांना ‘भारताचे एजंट’ किंवा ‘देशद्रोही’ ठरवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करते, असा संताप अल्ताफ हुसेन यांनी व्यक्त केला.
अल्ताफ हुसेन हे पाकिस्तानी राजकारणातील एक अत्यंत वादग्रस्त, शक्तिशाली आणि वेगळे व्यक्तिमत्व आहेत. ते मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट (MQM) चे संस्थापक आहेत, ज्यांनी प्रामुख्याने ‘मुहाजिर’ लोकांच्या हक्कांची लढाई लढली. मुहाजिर म्हणजे ते उर्दू भाषिक मुस्लिम, जे १९४७ च्या फाळणीनंतर भारतातून पाकिस्तानातील कराची आणि सिंध प्रांतात स्थलांतरित झाले होते. एकेकाळी कराची आणि पूर्ण सिंध प्रांतावर अल्ताफ हुसेन यांची एकहाती सत्ता चालायची. परंतु, पाकिस्तानी लष्कराच्या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे आणि लष्कराच्या हुकूमशाहीला आव्हान दिल्यामुळे त्यांना देशद्रोही घोषित करण्यात आले. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ते लंडनमध्ये निर्वासित म्हणून राहत असून, तिथूनच ते पाकिस्तानमधील अन्यायाविरोधात आवाज उठवत आहेत.
کشمیر میں لوگ سراپا احتجاج ہیں، بلوچستان میں لوگ میتیں لیکر دھرنا دیے ہوئے ہیں، پختونخوا کی صورتحال سب کے سامنے ہے، انڈیا نے ایٹمی آبدوزیں کھڑی کردی ہیں، پاکستان سنگین مسائل سے دوچار ہےلیکن حکمراں باہر کے مسائل میں مصروف ہیں۔کیا حکمرانوں کا یہ طرز عمل صحیح ہے؟
الطاف حسین pic.twitter.com/TR33143AhM — Altaf Hussain (@AltafHussain_90) July 15, 2026
credit – social media and Twitter
अल्ताफ हुसेन यांनी आपल्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या अकार्यक्षमतेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. पाकिस्तानातील महागाईने उच्चांक गाठला असून सामान्य जनतेला दोन वेळच्या अन्नाची भ्रांत आहे. बलुचिस्तानमध्ये मानवाधिकारांचे उघडपणे उल्लंघन केले जात आहे. बलुच मानवाधिकार कार्यकर्त्या माहरंग बलुच यांच्यासारख्या शांतताप्रिय नेत्यांना जन्मठेपेची शिक्षा देऊन लष्कर बलुचिस्तानचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Fuel Crisis : भारतात आहेत 23 तेल शुद्धीकरण कारखाने; जाणून घ्या किती वापरले जाते किती होते तेल उत्पादन?
हुसेन यांनी थेट प्रश्न विचारला, “गिलगिट-बाल्टिस्तान आणि PoJK मधील जनतेला गव्हावर मिळणारे अनुदान आणि वीज हवी आहे, बलुचिस्तानमधील मातांना त्यांच्या मुलांचे मृतदेह आणि न्याय हवा आहे, खैबर पख्तुनख्वामधील लोकांना तालिबानी दहशतीपासून सुरक्षा हवी आहे. या अंतर्गत समस्या सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेले पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर हे जगाला इराण-अमेरिका वादावर ज्ञान का पाजत आहेत? त्यांना आपल्या देशातील जनतेची कोणतीही काळजी नाही. पाकिस्तान ज्या नरकयातनांमधून जात आहे, त्याच्याशी या शासकांचा काहीही संबंध उरलेला नाही.“
या अंतर्गत यादवीचा फायदा घेत भारताने समुद्रात आपली ताकद वाढवली असून, अण्वस्त्र सज्ज पाणबुड्या पाकिस्तानच्या सागरी सीमेजवळ तैनात केल्या आहेत. जर पाकिस्तानने वेळीच आपल्या धोरणांमध्ये बदल केला नाही, तर पाकिस्तानचे अस्तित्वच धोक्यात येईल, असा गंभीर इशाराही आता आंतरराष्ट्रीय तज्ञांकडून दिला जात आहे.