Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेत भारतीय मुस्लिम कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला; धर्म विचारला अन् चाकूने सपासप वार

अमेरिकेत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका भारतीय कर्मचाऱ्याला त्याचा धर्म विचारुन त्याच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेत भारतीय कर्मचारी गंभीर जखमी असून त्याला रुग्णालात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 16, 2026 | 12:28 PM
Indian Worker Attacked in US

Indian Worker Attacked in US

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेत भारतीय मुस्लिम कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला
  • धर्म विचारला अन् चाकूने सपासप वार
  • वाचा नेमकं काय घडलं?
Indian Muslim Man Attacked in US : वॉशिंग्टन :  अमेरिकेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भारतीय कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हल्लेखोराने भारतीयाला त्याच्या धर्मविचारुन त्याच्यावर चाकूने वार केला. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

US-Iran War : ट्रम्प यांचा इराणसाठी नवा वॉर प्लॅन; अमेरिका तेहरानच्या बेटांवर ताबा मिळवणार?

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील युटा येथील वेस्ट व्हॅली सिटीमधील व्हॅली फेअर मॉलमध्ये ही घटना घडली. एका व्यक्तीने भारतीय वंशाच्या व्यक्तीला आधी त्याचा धर्म विचारला. त्याने तू मुस्लिम आहेस का असा प्रश्न केला आणि उत्तर हो मिळताच त्याच्यावर सपासप वार केले.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने तब्बव १५ वेळा सपासप चाकूने वार केला. १३ जुलै २०२६ रोजी ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातील हल्लेखोराने पीडित व्यक्तीशी सहज संवाद सुरु केला. त्याने व्यक्तीला त्याच्या धर्माबद्दल विचारले.

भारतीय व्यक्तीने आपण मुस्लिम असल्याचे सांगताच आरोपीने त्याच्यावर चाकूने हिंसक हल्ला केला. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सोहेलला प्रथम तू कुठून आला आहे? विचारले यावर सोहेलने त्याला भारतातून आलो आहे आणि आपले नाव सांगितले. यावर आरोपी लार्सनने त्याला धर्म विचारला आणि तो मुस्लिम असल्याचे कळताच त्याच्यावर चाकूने हल्ला करायला सुरुवात केली.

पीडित भारतीय कर्मचाऱ्याची ओळख सोहेल अशी पटली आहे. घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

हल्लेखोराला अटक

या घटनेप्रकरणी स्थानिक पोलिसांनी ४८ वर्षी हल्लेखोराला अटक केली आहे. पीटर मायकल लार्सन अशी या हल्लखोराची ओळख पटवण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित हल्लेखोराने आपला गुन्हा कबुल केला असून त्याने पीडिताला मुस्लिम असल्यामुळेच मारले असल्याचा सांगितले. मुस्लिमांना मारणे हाच त्याचा हेतू असल्याचे त्याने पोलिसांना सांगतिले.

पोलिसांनी आरोपीवर हत्येचा प्रयत्न आणि धोकादायक शस्त्राचा वापराच्या गंभीर आरोप दाखल केले आहेत. सध्या आरोपीला सॉल्ट लेक काउंटी तुरुंगात ठेवण्यात आले आहे. सोहेलला ओळखणाऱ्या लोकांनी त्याचे वर्णन कष्टाळू, शांत आणि कुटुंबाची काळजी घेणारा व्यक्त म्हणून केले. तो आपली पत्नी व दोन मुलांच्या उदरनिर्वाह करणारा एकमेव कमवता असून व्हॅली फेअर मॉलमध्येच कर्मचारी होता. सध्या या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे.

Russia Fuel Crisis : युद्धाचा रशियालाच मोठा फटका! युक्रेनच्या हल्ल्यांनी पुतिन चिंतेत; पेट्रोलसाठी भारताकडे धाव?

Web Title: Indian muslim worker stabbed in us over religion knife attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 12:28 PM

Topics:  

  • America
  • crime news
  • World news

संबंधित बातम्या

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द
1

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL
2

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी
3

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी

वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…
4

वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.