Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia Fuel Crisis : युद्धाचा रशियालाच मोठा फटका! युक्रेनच्या हल्ल्यांनी पुतिन चिंतेत; पेट्रोलसाठी भारताकडे धाव?

Russia Fuel Crisis : रशिया युक्रेन युद्ध अधिक तीव्र झाले असून याचा फटका आता रशियालाही बसू लागला आहे. युक्रेन रशियाच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे. हल्ल्यांमध्ये रशियाच्या तेल रिफायनरीजला लक्ष्य केले जात आहे. यामुळे रशियाच्या उर्जा पुरवठ्यावर संकट उभारले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 16, 2026 | 10:58 AM
Russia Fuel Crisis

Russia Fuel Crisis

Follow Us
Follow Us:
  • युद्धाचा रशियालाच फटका
  • युक्रेनच्या हल्ल्यांमुळे रशियात इंधन संकट
  • पुतिन यांची भारताकडे मदतीची मागणी?
Russia Fuel Crisis : मॉस्को : युक्रेन युद्धाचा रशियाला मोठा फटका बसत आहे. युक्रेनच्या रशियातील उर्जा क्षेत्रांवर हल्ल्यांमुळे इंधन संकट निर्माण झाले असल्याचे समोर आले आहे. युक्रेनने रशियाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांना ड्रोन आणि क्षेपणास्त्रांना हल्ल्यांनी लक्ष्य केले आहे. यामुळेच रशियात पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर रशियाने भारतातील रिफायनरी कंपन्यांशी अतिरिक्त पॅट्रोल पुरवठ्याची मागणी केल्याचा दावा केला जात आहे.

Modi-Putin Friendship : मोदींसाठी काहीपण! भारताच्या सांगण्यावरुन पुतिन यांनी टळला युक्रेनवरील अणुहल्ला; पोलंडचा मोठा दावा

युक्रेन हल्ल्यांमुळे रशियाचे नुकसान

मीडिया रिपोर्टनुसार, युक्रेनच्या सततच्या हल्ल्यांमुळे अनेक तेलशुद्धीकरण प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले आहे. याचा देशातील इंधन उत्पादनावर परिणाम होत असून रिफायनिंग क्षमतेत घटन झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी काही आठवडे जाऊ शकतात.

रशियाची भारताकडे धाव

रशियातील प्रमुख उर्जा कंपन्या रोसनेफ्ट, गॅझप्रोम नेफ्ट आणि लुकोइलने भारतीय रिफायनरी कंपन्यांशी इंधन पुरवठा खेरदीबाबत चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कंपन्याशी संपर्क साधला जात आहे. परंतु थेट इंधन खरेदी न करता आंतरराष्ट्रीय ट्रेडिंग कंपन्यांच्या माध्यनातून होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

भारताकडून अधिकृत प्रतिक्रिया नाही

सध्या या दाव्याबाबत भारताकडून किंवा रशियाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनाही रशियाकडून प्रस्ताव मिळाल्याचे सांगितले जात आहे. परंतु संबंधित कंपन्यांकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. यापूर्वी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी भारत रशियाला थेट इंधन पुरवत नसल्याचे स्पष्ट केले होते.

केवळ इंधन संकट नाही, तर…

युद्धाचा परिणाम केवळ रशियाच्या तेल व्यापारापुरता, उत्पादनापुरता मर्यादित राहिलेला नाही. युक्रेनने रशियाच्या अझोव्ह समुद्रातील महत्त्वाच्या सागरी मार्गांवरही हल्ले केल्यामूळे जहाजवाहूतक थांबली आहे. याचा रशियाच्या व्यापारावरही मोठा परिणाम होत आहे. तेलासह गहू, पोलाद व सूर्यफूल तेल यांसारख्या वस्तूंची वाहतूक थांबली आहे. हल्ल्यामुळे दोन महत्त्वाचे सागरी मार्ग डॉन-अझोव्ह कालवा आणि केर्च सामुद्रधुनी बंद झीली आहे. अनेक जहाजे समुद्रात अडकून पडली आहेत.

Russia Ukraine War : रशिया युक्रेन युद्ध आणखी चिघळले! राजधानी कीव्हवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा भीषण प्रहार, देशभरात हाय अलर्ट

Web Title: Russia fuel crisis ukraine attacks russian oil refineries putin seeks help form india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 10:55 AM

Topics:  

  • Russia
  • Russia Ukraine War
  • World news

संबंधित बातम्या

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक
1

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक

US-Iran Conflict: अमेरिका इराणवर करणार ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’चा वापर? जाणून घ्या काय आहे अमेरिकेची ‘ही’ गुप्त लष्करी योजना
2

US-Iran Conflict: अमेरिका इराणवर करणार ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’चा वापर? जाणून घ्या काय आहे अमेरिकेची ‘ही’ गुप्त लष्करी योजना

Air France: फ्लायदुबई घटनेनंतर, फ्रान्सने  केली पाकिस्तानच्या वैमानिकांवर कारवाई; इस्रायलला जाणाऱ्या विमान उड्डाणांवर घातली बंदी
3

Air France: फ्लायदुबई घटनेनंतर, फ्रान्सने केली पाकिस्तानच्या वैमानिकांवर कारवाई; इस्रायलला जाणाऱ्या विमान उड्डाणांवर घातली बंदी

Global Debt: कुठेतरी अव्वल! जगातील 34 सर्वाधिक कर्जबाजारी देशांनी केली युती; Pakistanला दिला त्याचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान
4

Global Debt: कुठेतरी अव्वल! जगातील 34 सर्वाधिक कर्जबाजारी देशांनी केली युती; Pakistanला दिला त्याचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.