Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-Israel War: महायुद्ध संपले नाही! इराणच्या मशिदीवर ‘लाल झेंडा’, रक्ताचा बदला घेण्याची गर्जना; ट्रम्पनेही दिली ‘भयंकर’ धमकी

Jamkaran Mosque Iran : अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील संघर्ष आता उघड युद्धात रूपांतरित होताना दिसत आहे. इराण-इस्रायल युद्धात सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांच्या मृत्युने परिस्थिती आणखी चिघळली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 01, 2026 | 02:40 PM
red flag hoisted on jamkaran mosque iran revenge trump warning war updates

red flag hoisted on jamkaran mosque iran revenge trump warning war updates

Follow Us
Follow Us:
  • युद्धाचे धार्मिक परिमाण
  • ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा
  • आखाती देशांत हाहाकार

Red Flag hoisted on Jamkaran Mosque Iran : मध्यपूर्वेतील संघर्षाने (US-Israel attacks Iran) आता रणांगण सोडून थेट धार्मिक युद्धाचे रूप धारण केले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ayatollah Ali Khamenei) यांच्या हत्येनंतर इराणच्या पवित्र कोम शहरातील जमकरन मशिदीच्या (Jamkaran Mosque) निळ्या घुमटावर ‘लाल झेंडा’ फडकवण्यात आला आहे. शिया परंपरेत आणि इराणी संस्कृतीत या लाल झेंड्याचा फडकणे म्हणजे “अन्यायाचा आणि सांडलेल्या रक्ताचा सूड अद्याप बाकी आहे.” या एका कृतीने इराणने अमेरिका आणि इस्रायलला स्पष्ट संदेश दिला आहे की, आता युद्ध थांबणार नाही, तर ते अधिक भीषण होईल.

लाल झेंडा: युद्धाची अधिकृत घोषणा?

इराणी सरकारी माध्यमांनी या घटनेचे वर्णन अत्यंत गंभीर स्वरूपात केले आहे. “रक्तासाठी रक्त” (Blood for Blood) हे ब्रीदवाक्य आता इराणच्या लष्करी कारवाईचा आधार बनले आहे. जेव्हा एखाद्या महान नेत्याचे किंवा योद्ध्याचे रक्त सांडले जाते, तेव्हा त्याचा बदला घेईपर्यंत हा लाल झेंडा फडकवत ठेवला जातो. यापूर्वी जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर असा झेंडा फडकवण्यात आला होता. आता खामेनींच्या मृत्यूनंतर हा झेंडा पुन्हा दिसल्याने शिया जगामध्ये युद्धाचा ज्वर चढला असून, अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधात ‘जिहाद’ पुकारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

🇮🇷🚩 Red flag raised over Jamkaran Mosque in Iran, signaling revenge for the blood of the Supreme Leader and Commander‑in‑Chief according to state media. pic.twitter.com/DmQU4R8wOA — WAR (@warsurv) March 1, 2026

credit – social media and Twitter

अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस

झेंडा फडकवल्यानंतर काही तासांतच इराणने मध्यपूर्वेतील अमेरिकन लष्करी तळांवर आणि इस्रायलच्या प्रमुख शहरांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि आत्मघाती ड्रोनचा मारा केला. कतार आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील अमेरिकन तळांजवळ प्रचंड स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. इराणचे संसदेचे सभापती मोहम्मद बाकर गालिबाफ यांनी घोषणा केली आहे की, “तेहरान कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज आहे आणि अमेरिका-इस्रायलला त्यांनी केलेल्या कृत्याची मोठी किंमत मोजावी लागेल.” अली लारीजानी यांनीही इशारा दिला आहे की, “आम्ही असे प्रत्युत्तर देऊ जे पाश्चात्य जग कधीही विसरणार नाही.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait of Hormuz: इराणने कापली जगाची ‘लाईफलाईन’! ‘या’ देशांच्या गळ्याभोवती आवळला होर्मुझचा फास; विश्वावर आर्थिक मंदीचं सावट

डोनाल्ड ट्रम्प यांची ‘विनाशकारी’ धमकी

इराणच्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले आक्रमक धोरण कायम ठेवले आहे. ट्रम्प यांनी इराणला उद्देशून म्हटले की, “इराणने पुन्हा हल्ला करण्याची चूक करू नये. जर त्यांनी अमेरिकन सैन्याला किंवा मालमत्तेला इजा पोहोचवली, तर आम्ही अशा ताकदीने प्रत्युत्तर देऊ की जे संपूर्ण जगाने यापूर्वी कधीही पाहिले नसेल.” ट्रम्प यांच्या या विधानाने आखाती देशांमध्ये अधिकच भीती पसरली असून, अमेरिका इराणमधील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना किंवा अण्वस्त्र केंद्रांना लक्ष्य करण्याची शक्यता वाढली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ayatollah Ali Khamenei: शिया राजकारणाचा मेरुमणी कोसळला; इराणला अण्वस्त्रशक्ती बनवणाऱ्या ‘अदृश्य’ सम्राटाचा ‘असा’ होता जीवनप्रवास

पाकिस्तान आणि इराकमध्ये संतापाचा उद्रेक

खामेनींच्या हत्येचे पडसाद केवळ इराणपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. पाकिस्तानातील कराचीमध्ये संतप्त जमावाने अमेरिकन वाणिज्य दूतावासावर हल्ला करत तो पेटवून दिला, ज्यामध्ये जीवितहानी झाल्याचे वृत्त आहे. इराकमध्येही तीन दिवसांचा अधिकृत शोक जाहीर करण्यात आला असून, तिथेही अमेरिका विरोधी निदर्शने तीव्र झाली आहेत. भारतासह अनेक देशांनी आपल्या नागरिकांना या प्रदेशातून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. जगाचा श्वास आता इराणच्या पुढील पाऊलावर अड

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणमधील मशिदीवर 'लाल झेंडा' फडकवण्याचा अर्थ काय?

    Ans: शिया परंपरेनुसार, लाल झेंडा हा रक्ताचा बदला घेण्याचे प्रतीक आहे. याचा अर्थ सूड अजून बाकी आहे आणि युद्ध सुरू झाले आहे.

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कोणती नवीन धमकी दिली आहे?

    Ans: ट्रम्प म्हणाले की जर इराणने हल्ले सुरूच ठेवले, तर अमेरिका अशा प्रकारे प्रत्युत्तर देईल की जे संपूर्ण जगाला दिसेल आणि इराणचं मोठं नुकसान होईल.

  • Que: कतार आणि युएईमध्ये स्फोटांचे आवाज का आले?

    Ans: इराणने या देशांमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करण्यासाठी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन सोडल्यामुळे तिथे मोठे स्फोट झाले आहेत.

Web Title: Red flag hoisted on jamkaran mosque iran revenge trump warning war updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran Israel Conflict
  • Iran-Israel War
  • World War 3

संबंधित बातम्या

Iran War : इस्रायलवर कतार संतापला; ‘युद्धाचा फायदा घेत संपूर्ण प्रदेशात प्राणघातक हल्ले’
1

Iran War : इस्रायलवर कतार संतापला; ‘युद्धाचा फायदा घेत संपूर्ण प्रदेशात प्राणघातक हल्ले’

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा
2

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा

Iran Navy : ‘आमचे नौदल पूर्णपणे कार्यरत’; ट्रम्प यांच्या दाव्याला इराणी नौदलप्रमुखांचे प्रत्युत्तर
3

Iran Navy : ‘आमचे नौदल पूर्णपणे कार्यरत’; ट्रम्प यांच्या दाव्याला इराणी नौदलप्रमुखांचे प्रत्युत्तर

Barron Trump बॅरन ट्रम्पला कुठे मारायचे? इराणच्या हिटलिस्टवर ट्रम्प यांचा मुलगा; 10 दशलक्ष डॉलर बक्षीस अन्  3D VIDEO
4

Barron Trump बॅरन ट्रम्पला कुठे मारायचे? इराणच्या हिटलिस्टवर ट्रम्प यांचा मुलगा; 10 दशलक्ष डॉलर बक्षीस अन् 3D VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.