Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia-Ukraine War: रशियाने बदलली आक्रमणाची रणनीती; युक्रेनचे गंभीर नुकसान

रशिया युक्रेन युद्ध अधिकच तीव्र होत चालले आहे. आता रशियाने युद्धाची रणनीती बदलली अधिक आक्रमक केली आहे. रशियाने युक्रेनच्या अनेक भागांमध्ये काल रात्री केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये 188 ड्रोन सोडले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 27, 2024 | 10:48 AM
Russia-Ukraine War: रशियाने बदलली आक्रमणाची रणनीती; युक्रेनचे गंभीर नुकसान

Russia-Ukraine War: रशियाने बदलली आक्रमणाची रणनीती; युक्रेनचे गंभीर नुकसान

Follow Us
Close
Follow Us:

कीव: रशिया युक्रेन युद्ध अधिकच तीव्र होत चालले आहे. आता रशियाने युद्धाची रणनीती बदलली अधिक आक्रमक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने युक्रेनच्या अनेक भागांमध्ये काल रात्री केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये 188 ड्रोन सोडले आहेत. यामुळे युक्रेनच्या हवाई दलाला गंभीर नुकसाने झाले असून अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. मात्र, युक्रेनने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या हवाई दलाने यापैकी बहुतेक ड्रोन नष्ट केले आहेत.

युक्रेनच्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान

जरी युक्रेनने काही ड्रोन नष्ट केले असले, तरीही युक्रेनच्या अनेक भागांमध्ये अपार्टमेंट इमारती, राष्ट्रीय पॉवर ग्रीड आणि अन्य महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यांमध्ये 17 भागांना लक्ष्य करण्यात आले, मात्र या हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. रशिया गेल्या काही दिवसांपासून युक्रेनच्या नागरी भागांवर ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि ग्लाइड बॉम्बसारख्या शस्त्रांचा वापर करत आहे. रशियाने युक्रेनवर हल्ले तीव्र केले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- कॅनडा, चीन आणि मेक्सिकोला ट्रम्प यांचा इशारा; राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हातात घेताच आयतीवर लादणार अतिरिक्त कर

हल्ल्यांमुळे नागरी जनतेचे जीवनमान विस्कळीत 

युक्रेनच्या हवाई दलाने सांगितले आहे की,  नागरी क्षेत्रांना लक्ष्य करून रशिया युक्रेनच्या मनोबलावर परिणाम करण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या सीमेजवळील रशियन प्रदेशात रशियाने 39 युक्रेनियन ड्रोन नष्ट केले. कीवमध्ये हवाई हल्ल्यांचा इशारा तब्बल सात तासांपेक्षा जास्त काळ सुरु होता, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ल्यांमुळे नागरी जनतेचे जीवनमान पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

रशियाची चाणाक्ष रणनीती

गेल्या 24 तासांत सुमारे 1,000 किलोमीटर लांब आघाडीवर मोठ्या चकमकी घडल्या आहेत. डोनेस्तक प्रदेशातील पोकरोव्स्क आणि कुराखोव्हजवळ विशेषतः लढाई तीव्र झाली आहे. युक्रेनच्या सैन्याने मोठ्या प्रतिकाराची तयारी केली आहे, मात्र रशियाने आपली रणनीती अधिक चाणाक्षपणे बदलल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. पाश्चिमात्य लष्करी विश्लेषकांचे मत आहे की रशियन सैन्याने गेल्या वर्षभरात युद्धभूमीवर आपला दबदबा वाढवला आहे. विशेषतः पूर्व डोनेस्तक प्रदेशात रशियन सैन्याने मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे.

पाश्चिमात्य देशांची युक्रेनला तातडीची मदत 

रशियाचा हा आक्रमक पवित्रा युक्रेनसाठी मोठे आव्हान ठरत आहे. युक्रेनवर होणाऱ्या या सततच्या हल्ल्यांमुळे नागरी जीवन कोलमडले आहे. ऊर्जा पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्यामुळे थंडीच्या दिवसांत नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. अशा परिस्थितीत पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला तातडीची मदत करण्याची गरज अधोरेखित होते. रशिया-युक्रेन युद्धाचे हे टप्पे अधिक गंभीर होत चालले असून शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता क्षीण होत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Bangladesh Hindu Violence: हिंदुंच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या चिन्मय दास यांना अटक; देशद्रोहाचा गुन्हा दाखल

Web Title: Russia changed strategy using drones to attack ukraine nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2024 | 10:48 AM

Topics:  

  • Russia
  • ukraine
  • world

संबंधित बातम्या

Trump vs Russia Oil: पुतिनच्या भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्पचे वादग्रस्त विधान! रशियन तेल खरेदीवर 500% टॅरिफचा दिला इशारा
1

Trump vs Russia Oil: पुतिनच्या भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्पचे वादग्रस्त विधान! रशियन तेल खरेदीवर 500% टॅरिफचा दिला इशारा

‘रशियासोबत व्यापार केला तर…’ ; डोनाल्ड ट्रम्प यांची जगभरातील देशांना पुन्हा उघड धमकी
2

‘रशियासोबत व्यापार केला तर…’ ; डोनाल्ड ट्रम्प यांची जगभरातील देशांना पुन्हा उघड धमकी

Issyk-Kul : सरोवराखाली दडलेले अटलांटिस! किर्गिस्तानात सापडले 600 वर्षांपूर्वीचे इस्लामिक शहर, मशीद-शाळांचे अवशेषही आले समोर
3

Issyk-Kul : सरोवराखाली दडलेले अटलांटिस! किर्गिस्तानात सापडले 600 वर्षांपूर्वीचे इस्लामिक शहर, मशीद-शाळांचे अवशेषही आले समोर

Travel News : थेट फ्लाइट्स, सुलभ व्हिसा आणि इंडियन फील; मित्रराष्ट्रातील ‘हे’ शहर बनले आहे भारतीय पर्यटकांसाठी ‘हॉट डेस्टिनेशन’
4

Travel News : थेट फ्लाइट्स, सुलभ व्हिसा आणि इंडियन फील; मित्रराष्ट्रातील ‘हे’ शहर बनले आहे भारतीय पर्यटकांसाठी ‘हॉट डेस्टिनेशन’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.