फोटो सौजन्य: सोशल मीडिया
वॉश्गिंटन: अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, 20 जानेवारी 2025 रोजी शपथ घेतल्यानंतर तात्काळ मेक्सिको, कॅनडा आणि चीन या तीन देशांवर कठोर शुल्क लावणार आहे. मीडिया रिपोर्टनुसरा, ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवरुन ही माहिती देण्यात आली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, मेक्सिको आणि कॅनडातून येणाऱ्या सर्व वस्तूंवर 25% सुल्क तर चीनच्या वस्तूंवर 10% टक्के अतिरिक्त शुल्क लादणार आहेत.
स्थलांतरित, गुन्हेगारी कृत्ये आणि अमली पदार्थांचा प्रवाह रोखण्यासाठी शुल्क
मिळालेल्या माहितीनुसार, हे शुल्क स्थलांतरित, गुन्हेगारी कृत्ये आणि अमली पदार्थांचा प्रवाह रोखण्यासाठी लावले जाणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी आरोप केला आहे की, मेक्सिको आणि कॅनडाच्या सीमांवरून अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ येतात. यामुळे अमेरिकेला गंभीर संकंटाचा सामना करावा लागत आहे. ट्रम्प यांनी मेक्सिकोवर टीका करत स्पष्ट केले आहे आहे की, “मेक्सिकोमार्गे हजारो लोक अमेरिकेत येतात आणि त्यांच्या बरोबर गुन्हेगारी कृत्ये व अमली पदार्थ घेऊन येतात.”
चीनच्या तस्करीवर आळा बसवण्यासाठी शुल्क
याशिवाय, चीनलाही ट्रम्प यांनी जबाबदार धरले आहे. त्यांनी म्हटले आहे की, चीनकडून अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर फेंटानिलसारख्या घातक अमली पदार्थांचा पुरवठा होतो. “चीनने यावर नियंत्रण ठेवण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्यांनी त्याचे पालन केले नाही.” ट्र्म्प यांनी स्पष्ट केले की, चीनच्या तस्करीवर आळा बसवण्यासाठी चीनमधील अमली पदार्थ तस्करांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही, असेही त्यांनी नमूद केले. आता जोपर्यंत या आदेशाचे पालन होत नाही तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर शुल्क लागू करण्यात येणार आहे.
शपथविधीच्या दिवशीच कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी
ट्रम्प यांच्या मते, या समस्या सोडवण्याची पूर्ण जबाबदारी मेक्सिको, कॅनडा आणि चीन या देशांची आहे. त्यांनी या देशांना आवाहन केले की, या समस्यांवर तत्काळ उपाययोजना कराव्यातय अन्यथा त्यांच्या उत्पादनांवर लावलेले शुल्क कायम ठेवले जाईल. 20 जानेवारी 2025 रोजी शपथविधीच्या दिवशीच ट्रम्प यांनी यासंदर्भातील कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करण्याचे जाहीर केले आहे.
“जेव्हा पर्यंत अवैध परदेशी नागरिकांचा व अमली पदार्थांचा प्रवाह बंद होत नाही, तोपर्यंत आम्ही कठोर पावले उचलू,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्या या धोरणामुळे अमेरिकेच्या व्यापार व कूटनीतीवर लक्षणीय परिणाम होण्याची शक्यता आहे. भारताचा या यादीत समावेश झाला आहे की नाही, याबाबत अद्याप काही माहिती मिळालेली नाही. या घोषणेमुळे जागतिक व्यापारात मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.