Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia Ukraine War : युक्रेनची राजधानी पुन्हा रशियाच्या निशाण्यावर; बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यांनी हादरले कीव्ह

Russia Ukraine War Update : युक्रेनची राजधानी कीव्ह पुन्हा बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांनी हादरली आहे. रशियाने मंगळवारी पहाटे कीव्हवर भीषण हल्ला केला असून एका ठिकाणी आग लागल्याची घटना घडली. या हल्ल्यामुळे युक्रेनच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 14, 2026 | 10:12 AM
Russia Attack on Kyiv

Russia Attack on Kyiv

Follow Us
Follow Us:
  • युक्रेनची राजधानी पुन्हा रशियाच्या निशाण्यावर
  • बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यांनी हादरले कीव्ह
  • गेल्या आठवड्यांपासून हल्ले सुरुच
Russia Ukraine War News in Marathi : मॉस्को/कीव्ह : युक्रेनची राजधानी कीव्हला रशियाने पुन्हा लक्ष्य केले. मंगळवारी पहाटेच्या सुमारास बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा रशियाने केला आहे. या हल्ल्यापूर्वी शहरात हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आला होता. यानंतर राजधानीत मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू येऊ लागले. या हल्ल्याची माहिती मिळताच युक्रेनच्या सुरक्षा यंत्रणा तातडीने सक्रिय झाल्या आणि क्षेपणास्त्र रोखण्याचे प्रयत्न सुरु झाले.

Iran-US War : होर्मुझमध्ये पुन्हा वाढला तणाव; इराणकडून UAE च्या तेलवाहू जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ला, एका भारतीयाचा मृत्यू

मीडिया रिपोर्टनुसार, रशियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी कीव्हवर मारा केला असून या हल्ल्यात होलोसीवस्की जिल्ह्यात मोठी आग लागली होती. याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्यासाठी आणि परिस्थितीत नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न झाले. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

हा हल्ला पॅरिसमध्ये झालेल्या कोअॅलिशन ऑफ विलिंग या बैठकीनंतर एका दिवसात झाला. या बैठकीत युक्रेनला अधिक लष्करी मदत देणे, हवाई संरक्षण क्षमता मजबूत करणे आणि रशियावर युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढवण्यावर चर्चा झाली होती.

काही आठवड्यांपासून हल्ले सुरुच

गेल्या काही आठवड्यांपासून रशियाचे युक्रेनवर क्षेपणास्त्रे हल्ले सुरुच आहे. रशियाने क्षेपणास्त्रांसह ड्रोनद्वारेही हल्ले केले असून याची तीव्रता अत्यंत भीषण आहे. युक्रेनची राजधानी कीव्हला सतत लक्ष्य केले जात आहे. यामध्ये बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असून यांना रोखणे युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेसाठी मोठे आव्हान ठरत आहे.

हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू

यापूर्वी १ ते २ जुलैच्या मध्यरात्री रशियाने केलेल्या हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू झाला होता. यानंतरही रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर हल्ले सुरुच ठेवले. या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

युरोपीय देशांची मोठी घोषणा

रशियाच्या वाढत्या हल्ल्यांना रोखण्यासाठी दहा युरोपीय दशांनी संयुक्त अँटी-बॅलेस्टिक संरक्षण व्यवस्था विकसित करण्यासाठी नव्या युतीची घोषणा केली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. रशियाच्या बॅलेस्टिक आणि हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा सामना करण्यासाठी युक्रेनला अधिक आधुनिक हवाई संरक्षण यंत्रणेची गरज असल्याचे झेलेन्स्की यांनी अधोरेखित केले.

US Iran Conflict : ‘आम्ही संरक्षण करु, पण…,’ होर्मुझवर टोल वसूल करणार अमेरिका? इराणला रोखण्याचा दावा

Web Title: Russia ukraine war kyiv hit by ballistic missile attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 10:11 AM

Topics:  

  • Russia Ukraine War
  • Volodymir Zelensky
  • World news

संबंधित बातम्या

Global Debt: कुठेतरी अव्वल! जगातील 34 सर्वाधिक कर्जबाजारी देशांनी केली युती; Pakistanला दिला त्याचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान
1

Global Debt: कुठेतरी अव्वल! जगातील 34 सर्वाधिक कर्जबाजारी देशांनी केली युती; Pakistanला दिला त्याचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान

China Virus: Wuhan 2.0 ची भीती! कोरोना सोडाच, चीनने महासागरात शोधले 11,700 नवीन विषाणू; जाणून घ्या जगासाठी ते किती धोकादायक?
2

China Virus: Wuhan 2.0 ची भीती! कोरोना सोडाच, चीनने महासागरात शोधले 11,700 नवीन विषाणू; जाणून घ्या जगासाठी ते किती धोकादायक?

Israel-Palestine News : वसाहतींचा विस्तार, घरांवर बुलडोझर; तरीही पॅलेस्टिनींचा निवडणुकीत आवाज नाही!
3

Israel-Palestine News : वसाहतींचा विस्तार, घरांवर बुलडोझर; तरीही पॅलेस्टिनींचा निवडणुकीत आवाज नाही!

Strait of Hormuz: ‘युद्धनौका होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आल्या तर…’ इराणचा अमेरिकेला थेट इशारा; 5 घातक शस्त्रांसह लष्कर सज्ज
4

Strait of Hormuz: ‘युद्धनौका होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आल्या तर…’ इराणचा अमेरिकेला थेट इशारा; 5 घातक शस्त्रांसह लष्कर सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.