Vladimir Putin to Visit India Soon : नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) लवकरच भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. रशियाच्या क्रेमलिनने दिलेल्या माहितीनुसार, पुतिन येत्या डिसेंबर महिन्यात ५ ते ६ डिसेंबरला भारत दौऱ्यावर येऊ शकतात. या दौऱ्यात पुतिन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्यासोबत एक वार्षिक बैठक होणार आहे. ही बैठक रशिया आमि भारताच्या द्विपक्षीय संबंधांना मजबूत करण्यासाठी आहे. यावेळी पुतिन भारतात दोन दिवसासाठी असणार आहेत. मात्र याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यांच्या दौऱ्यापूर्वी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेऊ लावरोव भारतात येऊन पुतिन यांच्या दौऱ्याचे सर्व तपशील निश्चित करणार आहेत.
पाच वर्षानंतर पुतिन २०२१ मध्ये भारताला भेट दिली होती. त्यानंतर हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे. यामुळे त्यांची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. शिखर बैठकीपूर्वी भारत आणि रशिया आंतर सरकारी आयोगाच्या (IRIGC-M&MTC) पार्श्वभूमीवर लष्करी आणि तंत्रज्ञान सहकार्यावर विशेष बैठक होणार आहेत.
पुतिनचा डबल गेम? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करुन पाकिस्तानला करणार ‘ही’ मोठी मदत
या वार्षिक शिखर परिषदेत मोदी आणि पुतिन यांच्यात विशेष आणि विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यावर भर दिला जाईल. या चर्चेत भारत आणि रशियामध्ये संरक्षण, सुरक्षा, व्यापार, आणि उर्जा क्षेत्रातील सहकार्याचा आढावा घेतला जाईल. आतापर्यंत भारत आणि रशियामध्ये २२ वार्षिक शिखर बैठका झाल्या आहेत. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी मॉस्कोला भेट दिली होती. यावेळी भारत रशियाकडून S-400 हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करण्याची शक्यता आहे. या प्रणालीने पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती.
याशिवाय नुकते चीनमध्ये झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) परिषदेतही मोदी आणि पुतिन यांची भेट झाली होती. यावेळी दोन्ही नेत्यांनी धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याचा निश्चिय केला होता. ही बैठक अमेरिकेच्या भारतावरील टॅरिफदरम्यान अत्यंत महत्त्वाची ठरली होती. ट्रम्प यांनी भारतावर ५०% टॅरिफ लादले आहे. रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या निर्णयामुळे ट्रम्प यांनी हे शुल्क लादले आहे.
येत्या बैठकीत युक्रेन संघर्षावरही (Russia Ukraine War) चर्चा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींच्या मते, भारत आणि रशिया संबंध केवळ दोन्ही देशांसाठीच नव्हे तर जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी महत्त्वाची आहे. यामुळे डिसेंबरमधील शिखर परिषद भारत रशिया संबंधासाठी एक निर्णायक टप्पा ठरु शकते.
प्रश्न १. रशियाचे पंतप्रधान व्लादिमिर पुतिन भारताला कधी भेट देणार आहेत?
रशियाचे पंतप्रधान व्लादिमिर पुतिन भारताला डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ५-६ तारखेला भेट देणार आहेत.
प्रश्न २. पुतिन यांच्या दौऱ्यादरम्यान रशिया आणि भारतामध्ये कोणत्या विषयांवर चर्चा होणार आहे?
पुतिन आणि मोदींच्या बैठकीदरम्यान भारत आणि रशियामध्ये संरक्षण, सुरक्षा, व्यापार, आणि उर्जा क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर चर्चा होणार आहेत. तसेच रशिया युक्रेन संघर्षासह अनेक जागतिक मुद्यांवरही चर्चा होईल.
Philippines Earthquake : फिलिपिन्समध्ये भूकंपाचा कहर ; मृतांचा आकडा ६० पार, बचाव कार्य सुरुच