Vladimir Putin डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर; टॅरिफवॉरदरम्यान रशिया-भारत संबंधासाठी अधिक महत्वपूर्ण (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
AFP ने दिलेल्या वृत्तानुसार, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) चीनमध्ये होणाऱ्या शांघाय शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेत पुतिन यांची भेट घेणार आहे. यावेळी त्यांच्या भारत दौऱ्याच्या तयारीवर चर्चा केली जाईल. तसेच अमेरिकेच्या भारतावरील वाढत्या दबावावरही चर्चा होईल.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर रशियाकडून तेल खरेदीमुळे 50% टॅरिफ लादले आहेत. भारत रशियाला युक्रेनविरुद्ध अप्रत्यक्ष मदत करत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. २७ ऑगस्टपासून कराची अंमलबजावणी झाली आहे.
PM मोदी आणि अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीची तारीख निश्चित; जाणून घ्या कधी होणार बैठक?
यापूर्वी पुतिन २०२१ मध्ये भारत दौऱ्यावर आले होते. ६ डिसेंबर २०२१ रोजी त्यांनी भारताला भेट दिली होती. केवळ ४ तासांसाठी भारतात आले होते. यावेळी भारत आणि रशियामझ्ये २८ करारांवर स्वाक्षरी करण्यात आली होती. दोन्ही देशांमध्ये २०२५ पर्यंत ३० अब्ज डॉलर्स व्यापाराचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते.
यामुळे यावेळी दोन्ही देशांमध्ये नवीन आर्थिक धोरणे निश्चित होण्याची अपेक्षा आहे. सध्या भारत आणि रशियामध्ये १०० अब्ज डॉलर्सपर्यंत द्विपक्षीय व्यापार करार करण्यात आला आहे.
तसेच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ऑगस्टच्या सुरुवातीला मॉस्कोला भेट दिली होती. यावेळी त्यांनी पुतिन यांची भेट घेतली. दरम्यान दोन्ही देशांमध्ये सुरक्षा, आर्थिक आणि उर्जा सहकार्यावार द्विपक्षीय चर्चेसाठी बैठक झाली.
भारत आणि रशियाचे संबंध सोव्हिएत काळापासून आहेत. यामुळे दोन्ही देशांनी आतापर्यंत धोरणात्मक भागीदारीला अत्यंत महत्व दिले आहे. यामुळे पुतिन यांची डिसेंबरमध्ये होणारी भेटही अत्यंत महत्वाची मानली जात आहे. आता लवकरच तारीखही निश्चित केली जाईल.






