Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saudi-Pak Defence Pact: केवळ कागदावरचा करार की इराणला रोखण्यासाठी मोठी खेळी? आसिम मुनीर यांनी ठोकली ‘विजयाची’ थाप

Saudi Pakistan Defence Pact:सौदी संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, दोन्ही देशांमधील संयुक्त परिचालन सज्जता मजबूत करण्यासाठी पाकिस्तानने गेल्या महिन्यात सौदी अरेबियामध्ये एक लष्करी हवाई तुकडी तैनात केली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 10, 2026 | 03:55 PM
saudi pakistan strategic defense pact asim munir iran threat 2026

saudi pakistan strategic defense pact asim munir iran threat 2026

Follow Us
Follow Us:
  • ऐतिहासिक संरक्षण करार
  • आसिम मुनीर यांचा दावा
  • इराण-सौदी संघर्षात पाकची भूमिका

Saudi Pakistan Defence Pact 2026 : जागतिक भू-राजकारणात सध्या अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख (Field Marshal) आसिम मुनीर यांनी रविवारी एका विशेष भाषणात सौदी अरेबियासोबत झालेल्या संरक्षण कराराचे जोरदार स्वागत केले. हा करार म्हणजे पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणातील एक सुवर्ण टप्पा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, या कराराच्या टायमिंगवरून आणि पाकिस्तानच्या प्रत्यक्ष कृतीवरून आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

संरक्षण कराराचे स्वरूप आणि महत्त्व

सप्टेंबर २०२५ मध्ये पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात एक ‘सामरिक परस्पर संरक्षण करार’ (Strategic Mutual Defense Pact) झाला. या करारानुसार, दोन्ही देशांनी एकमेकांच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याचे वचन दिले आहे. आसिम मुनीर यांच्या मते, हा करार केवळ लष्करी सहकार्य नसून, दोन्ही इस्लामिक देशांमधील अनेक दशकांच्या मैत्रीला दिलेले एक अधिकृत स्वरूप आहे. या करारामुळे सौदी अरेबियाच्या संरक्षणाची जबाबदारी आता तांत्रिकदृष्ट्या पाकिस्तानवरही आली आहे. रावळपिंडी येथील लष्करी मुख्यालयात बोलताना मुनीर यांनी दावा केला की, यामुळे पाकिस्तानचे नेतृत्व जागतिक स्तरावर अधिक मजबूत होईल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global India:’ते सोबत रामायण अन् गीता घेऊन आले होते!’ PM कमला प्रसाद यांच्या भाषणाने भारतीय अंतर्मुख; नेल्सन बेटाचे होणार नामांतर

इराण-सौदी संघर्ष आणि पाकिस्तानची ‘बघ्याची’ भूमिका

या कराराच्या घोषणेनंतर एक विरोधाभासी चित्र जगासमोर आले. जेव्हा इराण आणि सौदी अरेबिया यांच्यात तणाव वाढला आणि इराणने सौदीवर क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले, तेव्हा पाकिस्तानने सुरुवातीला कोणतीही ठोस लष्करी मदत पाठवली नाही. सुमारे ४० दिवस सौदी अरेबिया या हल्ल्यांचा सामना करत होता, मात्र त्यावेळी पाकिस्तान केवळ शांतपणे निरीक्षण करत राहिला. आता, जेव्हा अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम झाला आहे, तेव्हा पाकिस्तानने आपली लढाऊ विमाने सौदीत तैनात केली आहेत. यावरून जाणकारांचे म्हणणे आहे की, पाकिस्तान केवळ परिस्थिती निवळल्यानंतर आपली शक्ती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.

भारतासोबतचा संघर्ष आणि ऐतिहासिक संदर्भांचा आधार

आसिम मुनीर यांनी आपल्या भाषणात भारतासोबत झालेल्या अलीकडील संघर्षाचा उल्लेख केला. त्यांनी दावा केला की, पाकिस्तानने भारताला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, ऐतिहासिक सत्य हे आहे की, १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि ९३,००० सैनिकांनी भारतासमोर शरणागती पत्करली होती. तरीही पाकिस्तानमध्ये या पराभवाचे वर्णन ‘विजय’ म्हणूनच करण्याची परंपरा आहे. त्याच धर्तीवर, आता इराण-सौदी प्रकरणात उशिराने प्रवेश करूनही मुनीर याला मोठे राजनैतिक यश म्हणून मिरवत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Operation Sindhu 2.0: ‘दुसरी संधी नक्की मिळेल!’ पंतप्रधान मोदींच्या एका इशाऱ्यानंतर ‘ही’ संरक्षण यंत्रणाच करणार पहिला वार

मध्यस्थीची नवी भूमिका?

आसिम मुनीर यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील वादात पाकिस्तानने बजावलेल्या मध्यस्थीच्या भूमिकेबद्दलही भाष्य केले. त्यांनी वॉशिंग्टन आणि तेहरानचे आभार मानले की त्यांनी पाकिस्तानला या प्रक्रियेत सामील करून घेतले. पाकिस्तानला आता आखाती देशांमध्ये एक विश्वासार्ह ‘पीसमेकर’ म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करायची आहे. मात्र, सौदीच्या पवित्र मशिदींच्या संरक्षणाचे नाव घेऊन इराणला धमकावणे, हे पाकिस्तानला महागात पडू शकते का, असा प्रश्न जागतिक तज्ज्ञ विचारत आहेत.

Web Title: Saudi pakistan strategic defense pact asim munir iran threat 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • Defence Sector
  • Pakistan News
  • Saudi Arabia
  • World news

संबंधित बातम्या

Pakistan IED Blast : बलुचिस्तानमध्ये शक्तिशाली स्फोटाने खळबळ; 2 ठार, मानवाधिकार संघटना आक्रमक अन् आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी
1

Pakistan IED Blast : बलुचिस्तानमध्ये शक्तिशाली स्फोटाने खळबळ; 2 ठार, मानवाधिकार संघटना आक्रमक अन् आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी

General Dhiraj Seth: भारत-नेपाळ लष्करी परंपरेचा सुवर्ण क्षण; जनरल धीरज सेठ यांना मिळणार नेपाळचे मानद लष्करप्रमुखपद
2

General Dhiraj Seth: भारत-नेपाळ लष्करी परंपरेचा सुवर्ण क्षण; जनरल धीरज सेठ यांना मिळणार नेपाळचे मानद लष्करप्रमुखपद

Russia-Ukraine War: झेलेन्स्कींच्या होमटाऊनमध्ये रशियाचा धुमाकूळ; लक्ष्मी मित्तल यांच्या कारखान्यावर डागली क्षेपणास्त्रे, 2 ठार
3

Russia-Ukraine War: झेलेन्स्कींच्या होमटाऊनमध्ये रशियाचा धुमाकूळ; लक्ष्मी मित्तल यांच्या कारखान्यावर डागली क्षेपणास्त्रे, 2 ठार

UPSC NDA Exam 2026: परीक्षा जवळ आलीय, आता शेवटच्या काही दिवसांत तयारी कशी करावी? जाणून घ्या
4

UPSC NDA Exam 2026: परीक्षा जवळ आलीय, आता शेवटच्या काही दिवसांत तयारी कशी करावी? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.