फोटो सौजन्य - pinterest
अमेरीकी अंतराळवीर सुनिता विलियम्स आणि मिशन कमांडर बुश विलमोर जूनच्या ५ तारखेला नासाच्या एका मिशनसाठी आंतरराष्ट्रीय स्पेश स्टेशनकडे रवाना झाले. तिथे ८ दिवसाच्या थांब्यानंतर १३ जूनला परतीचा प्रवास होणार होता. पण अंतराळयानातील बिघाडामुळे तो प्रवास लांबणीवर ढकलण्यात आलं आहे. मिंटच्या रिपोर्टनुसार, अंतराळयानात सुनिता विलियम्स आणि मिशन कमांडर बुश विलमोरसह ३४५ किलोचा अतिरिक्त सामान आहे.
काही तांत्रिक अडचणींमुळे स्टारलाइनर मिशन पुढे ढकलण्यात आले होते. ५ जून २०२४ रोजी अंरतराळयानाचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण करण्यात आले. या अंतराळ यात्रेत अंतराळवीर सुनिता विलियम्स आणि मिशन कमांडर बुश विलमोरने फक्त २५ तासात इंटरनॅशनल स्पेश स्टेशन गाठून सगळ्यात कमी वेळात स्पेश स्टेशन गाठण्याचा विश्व विक्रम केला.
मिशनच्या सुरवातीला अंतराळयानाच्या प्रक्षेपणात विलंब झाला. आता पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे परतीच्या प्रवासाला विलंब होताना दिसत आहे. एकूण ९ वेळा परतीची तारीख नासाद्वारे बदलण्यात आली. सुरवातीला परतीची दिनांक १३ जून देण्यात आली होती. पुढे ती १८ जूनवर ढकलण्यात आली. नंतर नासाद्वारे सांगण्यात आले की २२ जूनला अंतराळयान धरतीच्या दिशेने प्रस्थान करेल. मग तीच तारीख पूढे २६ जूनवर नेण्यात आली. अशा प्रकारे ९ वेळा तारीख बदलली गेली. पण अद्याप नासाकडून कम्फर्म तारीख अशी काही आली नाही आहे.
CNN च्या रिपोर्टनुसार, गेल्या शुक्रवारी NASA च्या कमर्शियल क्रू प्रोग्राम मैनेजर स्टीव स्टिचने सांगितले कि स्टारलाइनर मिशनच्या अधिकतम अवधिला ४५ दिवसांपासून वाढवून ९० दिवसांवर ढकलण्यात आले आहे. अजून अंतराळयानाची धरतीवर येण्याची कंफर्म डेट अजून सांगितली गेली नाही आहे. मिंटच्या रिपोर्टनुसार, अंतराळयानामध्ये आणखीन २४ दिवस पुरेल फक्त इतकेच इंधन आहे. तरी NASA कडून सांगण्यात आले आहे की, अंतराळवीरांना परत आणण्यात सगळे प्रयत्न केले जातील.