Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोनाल्ड ट्रम्पने अखेर ‘त्या’ भारतीयांविरोधात घेतला निर्णय; थेट लष्करी विमानांचा वापर करुन…

डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध स्थलांतरितांविरुद्ध कठोर धोरणे अवलंबली आहेत. या धोरणांतर्गत बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना त्यांच्या मूळ देशात परत पाठविण्यासाठी लष्करी विमानांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 04, 2025 | 12:18 PM
Trump begins deporting Indian migrants military flight leaves country

Trump begins deporting Indian migrants military flight leaves country

Follow Us
Follow Us:

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हाती घेताच देशातून अवैध स्थलांतरितांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध स्थलांतरितांविरुद्ध कठोर धोरणे अवलंबली आहेत. ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर बेकायदेशीर स्थलांतरितांच्या निर्णयावर स्वाक्षरी केली आणि सत्तेच्या केवळ 11 दिवसांतच 25,000 हून अधिक अवैध प्रवाशांना अटक करण्यात आली होती.  या धोरणांतर्गत बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना त्यांच्या मूळ देशात परत पाठविण्यासाठी लष्करी विमानांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.

अमेरिकेच्या लष्कराचे C-17 विमान भारतीय स्थलांतरितांना घेऊन भारताकडे रवाना झाले आहे, अशी माहिती एका अमेरिकन अधिकाऱ्याने दिली. ट्रम्प प्रशासनाने स्थलांतर धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी लष्करी मदत घेतली आहे. यासाठी अमेरिका-मेक्सिको सीमेवर अतिरिक्त सैनिक तैनात करण्यात आले आहेत. तसेच लष्करी विमानांचा वापर करून स्थलांतरितांना त्यांच्या मूळ देशात परत पाठविले जात आहे, आणि लष्करी तळांवर त्यांना तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात येत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- काय आहे USAID? ट्रम्पने घेतला बंदी घालण्याचा निर्णय; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

पेंटागनने दिली विमाने

अवैध स्थलांतरितांना पेंटागनने एल पासो, टेक्सास, आणि सॅन डिएगो, कॅलिफोर्निया येथे कैदेत ठोवले होते. आता यातील 5,000 पेक्षा अधिक बेकायदेशीर स्थलांतरितांना त्यांच्या मूळ देशात परत पाठविण्यासाठी लष्करी विमानांची उपलब्धता केली आहे. आतापर्यंत, या लष्करी विमानांनी ग्वाटेमाला, पेरू, आणि होंडुरास येथे स्थलांतरितांना पोहोचविले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, यामध्ये सर्वाधिक बेकायदेशीर स्थलांतरित भारतीय आहेत. मिळालेल्या आकडेवारीनुसार, सुमारे 725,000 भारतीय बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहत होते, यामुळे मेक्सिको आणि अल साल्वाडोरनंतर ही तिसऱ्या क्रमांकाची मोठी संख्या आहे.

भारत-अमेरिका संबंधांवर परिणाम होणार 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतीय स्थलांतरितांच्या निर्वासनाच्या कारवाईमुळे भारत-अमेरिका संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतीय सरकारने अमेरिकेशी सहकार्य करून बेकायदेशीर स्थलांतरितांची ओळख पटवून त्यांना परत आणण्याची योजना आखली आहे, यामुळे दोन्ही देशांमधील स्थलांतर धोरणांवर चर्चा सुरू आहे. ट्रम्प प्रशासनाच्या या कठोर धोरणांमुळे बेकायदेशीर स्थलांतरितांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे, आणि त्यांना त्यांच्या मूळ देशात परत पाठविण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

मेक्सिकोतून घुसखोरीच्या घटनांमध्ये मोठी घट

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानंतर प्रशासनाने कठोर सीमा नियंत्रण धोरण स्वीकारले आहे. यामुळे मेक्सिको सीमेमार्गे घुसखोरीच्या घटनांमध्ये 94% घट झाली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सत्तेच्या कालावधीत 1 जानेवारी ते 19 जानेवारीदरम्यान दररोज सरासरी 2087 घुसखोरीच्या घटना घडत होत्या, मात्र, ट्रम्प यांच्या सत्ता स्वीकारल्यानंतर हा आकडा केवळ 11 दिवसांत 126 पर्यंत खाली आला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- आता ‘या’ देशालाही मिळणार नाही अमेरिकेकडून आर्थिक मदत; ट्रम्प म्हणाले…

Web Title: Trump begins deporting indian migrants military flight leaves country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2025 | 12:18 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Illegal immigration
  • india
  • US

संबंधित बातम्या

Gulf Crisis: इराण युद्धामुळे आखाती देश अमेरिकेवर का संतापले? ‘मक्का संरक्षण करारा’ने बदलली मध्य पूर्वेची भू-राजकीय समीकरणे
1

Gulf Crisis: इराण युद्धामुळे आखाती देश अमेरिकेवर का संतापले? ‘मक्का संरक्षण करारा’ने बदलली मध्य पूर्वेची भू-राजकीय समीकरणे

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती
2

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती

India caste census: जात मोजणार, पण नेमकी कशी? जनगणना २०२७ मधील जातनिहाय आकडेवारीवरून का वाद?
3

India caste census: जात मोजणार, पण नेमकी कशी? जनगणना २०२७ मधील जातनिहाय आकडेवारीवरून का वाद?

Yash Toxic Movie: ‘टॉक्सिक’साठी यशला कम्फर्ट झोनच्या बाहेर घेऊन गेल्या गीतू मोहनदास; म्हणाला, “मला एक अ‍ॅक्टर म्हणून पुश केलं”
4

Yash Toxic Movie: ‘टॉक्सिक’साठी यशला कम्फर्ट झोनच्या बाहेर घेऊन गेल्या गीतू मोहनदास; म्हणाला, “मला एक अ‍ॅक्टर म्हणून पुश केलं”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.