Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-पाकिस्तान संबंधात तुर्कीच्या एर्दोगानची पुन्हा लुडबूड; संयुक्त राष्ट्रात काश्मीर मुद्द्यावर केले भाष्य, म्हणाले..

India Pakistan Kashmir Dispute : संयुक्त राष्ट्रात पुन्हा भारत आणि पाकिस्तानमधील काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. पाकिस्तानचा मित्र देश तुर्कीने यामध्ये लुडबूड केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 24, 2025 | 02:04 PM
Turkey's Erdogan on India-Pakistan Kashmir Dispute

Turkey's Erdogan on India-Pakistan Kashmir Dispute

Follow Us
Close
Follow Us:
  • संयुक्त राष्ट्रात तुर्कीकडून भारत-पाकिस्तान संबंधावर भाष्य
  • भारत पाकिस्तानचा काश्मीर मुद्दा सोडवण्याचे संयुक्त राष्ट्राला आवाहान
  • काश्मीर हा भारत-पाकिस्तानचा अतंर्गत मुद्दा- भारताचे स्पष्टीकरण

Turkey on India-Pakistan Kashmir Dispute : इस्तंबूल : मंगळवारी (२३ सप्टेंबर)न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेचे(UNGA) ८० वे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात जगभरातली अनेक देशांचे मंत्री उपस्थित होते. यावेळी तुर्कीचे (Turkey) राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगानही उपस्थित होते. यावेळी त्यांनी इस्रायल आणि हमास युद्धावर (Israel Hamas War) आले मत मांडले. तसेच त्यांनी भारत आणि पाकिस्तानच्या संबंधावरही भाष्य केले.

तुर्कीने काश्मीर मुद्दा संयुक्त राष्ट्रात केला उपस्थित

एर्दोगान यांनी पाकिस्तानच्या बाजूने भारत आणि पाकिस्तानमधील काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी म्हटले की, एप्रिलमध्ये भारत आणि पाकिस्तानध्ये युद्ध (India Pakistan War) सुरु होते, पण आता दोन्ही देशांतील तणाव निवळला असून याचा मला आनंद आहे.

एर्दोगान यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित करताना म्हटले की, काश्मीरमधील बूध-भगिनींसाठी हा मुद्दा सुयंक्त राष्ट्राच्या मदतीने सोडवला गेला पाहिजे. त्यांच्या या विधानानमुळे भारताने पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे.

‘नरसंहारासाठी नेतन्याहूच जबाबादार’ ; तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांची गाझातील इस्रायलच्या कारवायांवर जोरदार टीका

#WATCH | New York | At the 80th session of UNGA, Turkish President Recep Tayyip Erdoğan says, “… We are pleased with the ceasefire achieved following the tensions last April between Pakistan and India, which had escalated into a conflict… The issue of Kashmir should be… pic.twitter.com/YqWx3l5X1C — ANI (@ANI) September 23, 2025

भारताचे स्पष्टीकरण

तुर्की हा पाकिस्तानचा मित्र राष्ट्र आहे. भारत पाकिस्तान युद्धातही तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला होता. तसेच तुर्कीने काश्मीर मुद्याला देखील अनेक वेळा हात लावला आहे. भारताने यावर प्रतिक्रिया देत स्पष्ट केले की, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, यावर कोणत्याही बाह्य देशाचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. तसेच दुसऱ्या देशांच्या अतंर्गत बाबींवर लक्ष देण्याऐवजी सीमापार दहशतवादाला रोखण्यावर संयुक्त राष्ट्राने विचार करण्याचे आवाहन भारताने केले.

पण तुर्कीने पुन्हा एकदा या मुद्याला संयुक्त राष्ट्रात उपस्थित करुन खळबळ उडवली आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेनंतर एर्दोगान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी चर्चा केली. यावेळ काश्मीर मुद्यावर तुर्कीचा पाकिस्तानला नेहमीच पाठिंबा राहिल असे त्यांनी म्हटले. यासाठी तुर्की सर्वोतोपरी प्रयत्न करेल अशी हमीही दिली.

पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारत पाकिस्तान युद्धात तुर्कीने पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दर्शवला होता. तुर्कीने पाकिस्तानला ड्रोन, शस्त्रे आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची मदत पुरवली होती.

FAQs(संबंधित प्रश्न)

भारत पाकिस्तानमधील काश्मीर मुद्यावर तुर्कीने काय म्हटले? 

भारत पाकिस्तानच्या काश्मीर मुद्यावर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी भाष्य केले आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्राला काश्मीरमधील बूध-भगिनींसाठी मुद्दा सोडवण्याचे आवाहन केले आहे.

भारताची एर्दोगान यांच्या विधानावर काय प्रतिक्रिया होती? 

भारताने एर्दोगान यांच्या काश्मीरच्या विधानावर भूमिक मांडताना म्हटले की, काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानचा अंतर्गत मुद्दा आहे. यावर तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही.

‘आम्ही झुकणार नाही…’ ; इराणने अणु कार्यक्रमावर अमेरिकेशी थेट चर्चा करण्यास दिला नकार

Web Title: Tutkeys erdogan on india pakistan kashmir dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 02:02 PM

Topics:  

  • India pakistan Dispute
  • Turkey
  • World news

संबंधित बातम्या

Russia Ukraine War : तुर्कीच्या मध्यस्थीने होणार युक्रेन युद्धबंदी? जे ट्रम्प करु शकले नाहीत, एर्दोगान यांना जमेल का?
1

Russia Ukraine War : तुर्कीच्या मध्यस्थीने होणार युक्रेन युद्धबंदी? जे ट्रम्प करु शकले नाहीत, एर्दोगान यांना जमेल का?

UK Political Crisis : ब्रिटनमध्ये सत्तापालटाची चिन्हे! पंतप्रधान केयर स्टारमर यांना हटवण्याचा कट?
2

UK Political Crisis : ब्रिटनमध्ये सत्तापालटाची चिन्हे! पंतप्रधान केयर स्टारमर यांना हटवण्याचा कट?

Delhi Bomb Blast : दिल्ली बॉम्बस्फोटांपासून ते काश्मीरपर्यंत…;पाकिस्तानसोबत ‘हा’ मुस्लिम देशही आहे कटात सामील
3

Delhi Bomb Blast : दिल्ली बॉम्बस्फोटांपासून ते काश्मीरपर्यंत…;पाकिस्तानसोबत ‘हा’ मुस्लिम देशही आहे कटात सामील

Delhi Bomb Blast : दहशतवादी मसूद अझहरनेच रचला दिल्लीचा कट? त्याच्या सूनेच्या थेट संपर्कात होती डॉ. शाहीन
4

Delhi Bomb Blast : दहशतवादी मसूद अझहरनेच रचला दिल्लीचा कट? त्याच्या सूनेच्या थेट संपर्कात होती डॉ. शाहीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.