Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Global Economy : ‘आता आमचं आम्ही बघू!’ UAEचा OPECला रामराम; पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठ्या बदलाचे संकेत

UAE OPEC Exit: संयुक्त अरब अमिरातीने ओपेकमधून बाहेर पडण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे जागतिक तेल बाजारात खळबळ उडाली आहे. याचा भारतातील इंधनाच्या किमतींवर कसा परिणाम होईल, ते जाणून घ्या.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 29, 2026 | 09:18 AM
uae leaves opec impact on india petrol diesel prices donald trump victory 2026

uae leaves opec impact on india petrol diesel prices donald trump victory 2026

Follow Us
Follow Us:
  • ऐतिहासिक माघार
  • ट्रम्प यांचा मोठा विजय
  • भारतासाठी ‘गुड न्यूज’?

Impact of UAE OPEC exit on petrol prices in India : जागतिक ऊर्जा क्षेत्रात सध्या एका मोठ्या युगाचा अंत होताना दिसत आहे. संयुक्त अरब अमिरातीने (UAE) १ मे २०२६ पासून तेल उत्पादक देशांची संघटना ‘ओपेक’ (OPEC) आणि ‘ओपेक+’ मधून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा केली आहे. इराणसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे (US-Israel vs Iran) आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील विस्कळीत तेल पुरवठ्यामुळे आधीच तेलाचे दर प्रति बॅरल ११० ते ११३ डॉलर्सच्या वर गेले असताना युएईचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

युएईने ‘ओपेक’ का सोडले? उत्पादन स्वातंत्र्याचा ‘प्लॅन’

ओपेकचा सदस्य म्हणून युएईला तेल उत्पादनावर अनेक मर्यादांचा सामना करावा लागत होता. युएईची तेल उत्पादन क्षमता मोठी आहे, मात्र संघटनेच्या नियमांमुळे त्यांना मर्यादित उत्पादन करावे लागत होते. आता संघटनेतून बाहेर पडल्यानंतर युएई आपल्या क्षमतेनुसार कितीही तेल उत्पादन करू शकेल. तज्ज्ञांच्या मते, जीवाश्म इंधनाची (Fossil Fuel) मागणी कमी होण्यापूर्वी आपल्याकडील तेलाचा साठा जास्तीत जास्त विकून आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा युएईचा हा मोठा धोरणात्मक बदल आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : April 29 : कला आणि करुणेचा अनोखा संगम! जाणून घ्या आज ‘या’ दोन खास दिवसांचे महत्च अन् रंजक इतिहास

डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘मास्टरस्ट्रोक’ आणि ओपेकला धक्का

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नेहमीच ओपेकवर टीका केली आहे. ओपेक संघटना कृत्रिमरीत्या तेलाचे उत्पादन कमी करून जगाकडून जास्त पैसे उकळत असल्याचा त्यांचा आरोप होता. युएईच्या या निर्णयामुळे ओपेकचे वर्चस्व कमी झाले असून, ट्रम्प यांच्या तेल दर कमी करण्याच्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. युएई हा ओपेकमधील तिसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश असल्याने त्यांच्या जाण्यामुळे सौदी अरेबियाची या संघटनेवरील पकड ढिली होणार आहे.

🚨 UAE leaves OPEC after 60 years — no more production limits. Millions of barrels could hit China & global markets. Energy map just shifted. Source: WAM / Reuters, April 28, 2026#UAE #OPEC #Oil #Breaking #USA pic.twitter.com/jh8jQUYWEx — WarScope📡 (@WarScopeGlobal) April 28, 2026

credit – social media and Twitter

भारताला कसा फायदा होईल? पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का?

भारत आपल्या गरजेच्या ८५% तेल आयात करतो. ओपेकचे नियंत्रण सुटल्यामुळे युएई आता भारताला अधिक प्रमाणात आणि कदाचित कमी दरात तेल पुरवू शकतो. भारत आणि युएई यांच्यातील मजबूत द्विपक्षीय संबंध पाहता, भारताला तेलाचा एक विश्वासार्ह आणि स्वस्त पर्याय मिळणार आहे. सध्या रशिया-युक्रेन आणि इराण युद्धामुळे तेलाच्या किमती वाढल्या असल्या तरी, मध्यम ते दीर्घकाळात युएईची ही माघार भारतीय ग्राहकांसाठी इंधन दर कमी करणारी ठरू शकते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Viral Video Day: इंटरनेटच्या दुनियेतील ‘व्हायरल’ क्रांती! का साजरा केला जातो ‘हा’ दिवस? वाचा नशीब बदलणाऱ्या किमयेचा संपूर्ण इतिहास

जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता

सध्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतील संकटामुळे जागतिक पुरवठ्यात १० दशलक्ष बॅरल प्रति दिवसाची घट झाली आहे. अशा स्थितीत युएईचा हा निर्णय सुरुवातीला बाजारात अस्थिरता निर्माण करू शकतो. मात्र, एकदा का युएईने स्वतःचे उत्पादन वाढवले की बाजारात तेलाचा पुरवठा वाढून किंमती स्थिर होण्यास मदत होईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: युएईने ओपेक सोडल्यामुळे भारतात पेट्रोल लगेच स्वस्त होईल का?

    Ans: लगेच नाही. सध्या इराण युद्धामुळे जागतिक पातळीवर तेलाचे दर वाढलेले आहेत. मात्र, दीर्घकाळात युएईकडून जास्त तेल उपलब्ध झाल्यामुळे किमती कमी होऊ शकतात.

  • Que: 'ओपेक' (OPEC) म्हणजे नक्की काय?

    Ans: ही जगातील १३ प्रमुख तेल उत्पादक देशांची संघटना आहे, जी जागतिक तेल पुरवठा आणि किमतींवर नियंत्रण ठेवण्याचे काम करते.

  • Que: युएईच्या या निर्णयाचा ओपेकवर काय परिणाम होईल?

    Ans: युएई हा महत्त्वाचा सदस्य असल्याने ओपेकची सामूहिक शक्ती कमी होईल आणि तेलाच्या किमतींवरील त्यांचे नियंत्रण कमकुवत होईल.

Web Title: Uae leaves opec impact on india petrol diesel prices donald trump victory 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 09:18 AM

Topics:  

  • Diesel Petrol Price
  • UAE
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Ukraine News : झेलेन्स्कींचा ‘गॉडफादर’ कनेक्शन! डी नीरो, अल पॅसिनो आवडतात; शॉन पेनचा ऑस्करही दाखवला
1

Ukraine News : झेलेन्स्कींचा ‘गॉडफादर’ कनेक्शन! डी नीरो, अल पॅसिनो आवडतात; शॉन पेनचा ऑस्करही दाखवला

EU Social Media Ban : १३ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद? १५ वर्षांपर्यंत पालकांची नजर!
2

EU Social Media Ban : १३ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद? १५ वर्षांपर्यंत पालकांची नजर!

Houthi Attacks : Saudi-Israel मध्ये गुप्त करार? मक्काच्या संरक्षणासाठी शत्रू इस्रायल खेळणार ‘अशी’ हुशार चाल; पाकिस्तानची माघार
3

Houthi Attacks : Saudi-Israel मध्ये गुप्त करार? मक्काच्या संरक्षणासाठी शत्रू इस्रायल खेळणार ‘अशी’ हुशार चाल; पाकिस्तानची माघार

AI Threat : बिल गेट्स यांचा गंभीर इशारा; घातक आजार निर्माण करण्यासाठी AIचा गैरवापर होऊ शकतो!
4

AI Threat : बिल गेट्स यांचा गंभीर इशारा; घातक आजार निर्माण करण्यासाठी AIचा गैरवापर होऊ शकतो!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.