फोटो सौजन्य AI
झेलेन्स्की यांना अमेरिकन सिनेमातील दिग्गज कलाकारांचे काम आवडते . रॉबर्ट डी नीरो आणि अल पॅसिनो यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला . द गॉडफादर या गाजलेल्या चित्रपटाचाही त्यांच्या आवडत्या चित्रपटांमध्ये समावेश आहे . विशेष म्हणजे या चित्रपटाच्या पुढील भागात रॉबर्ट डी नीरो यांनी तरुण व्हिटो कॉर्लिओनची भूमिका साकारली होती .
तर अल पॅसिनो यांनी मायकेल कॉर्लिओनची भूमिका केली होती . त्यामुळे झेलेन्स्की यांनी घेतलेल्या या नावांमुळे त्यांच्या सिनेमाच्या आवडीची झलक पाहायला मिळाली .
Ed Sheeran Tour : एका वक्तव्याने पेटलं प्रकरण; मॅकलमोरनंतर चार कलाकारांची ‘एक्झिट’!
मुलाखती दरम्यान झेलेन्सकी यांनी शॉन पेन यांनी त्यांना दिलेला ऑस्कर पुरस्कार ही दाखवला . २०२२ ,मध्ये रशियाने युक्रेनवर पूर्ण आक्रमण केल्यानंतर पेन यांनी कीव्ह मध्ये झेलेन्स्की यांची भेट घेतली होती . त्यावेळी त्यांनी आपला ऑस्कर पुरस्कार युक्रेनच्या राष्ट्राअध्यक्षांकडे सोपवला होता . पेन यांनी हा पुरस्कार युक्रेनच्या विजयावरील विश्वासाचे प्रतीक म्हणून दिल्याचे त्यावेळी सांगितले होते . झेलेन्स्की यांनी सुरवातीला हा पुरस्कार स्वीकारण्यास संकोच व्यक्त केला होता .
AI Threat : बिल गेट्स यांचा गंभीर इशारा; घातक आजार निर्माण करण्यासाठी AIचा गैरवापर होऊ शकतो!
शॉन पेन यांनी मात्र पुरस्कार स्वीकारण्यास आग्रह धरला . युद्ध संपेपर्यंत हा ऑस्कर युक्रेनमध्ये राहू शकतो . असे त्यांनी सांगितले होते . जेव्हा तुम्ही जिंकाल , तेव्हा तुम्ही तो मला परत द्याल . अशा आशयाचे यांचे शब्द झेलेन्स्की यांना आठवले . युद्ध राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंधावर चर्चा होत असताना मुलाखतीत झेलेन्स्कीच्या सिनेमाविषयीच्या या
आठवणींमुळे संभाषणाला वेगळाच रंग मिळाला . एका बाजूला युद्धाची गंभीर परिस्थिती आणि दुसऱ्या बाजूला हॉलिवूडची क्लासिक सिनेमांबद्दल त्यांची आवड , असा या मुलाखतीतला वेगळा पैलू समोर आला .






